Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

चंद्रपुरात उद्या विषयतज्ज्ञांची राज्यव्यापी परिषद
चंद्रपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

सर्वशिक्षा अभियांनांतर्गत कंत्राट पद्धतीवर नेमणूक करण्यात आलेल्या विषयतज्ज्ञांनी प्रश्नथमिक शिक्षणात त्यांची भूमिका व गरज या विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या ९ ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृहात विषयतज्ज्ञांची पहिली राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित

 

करण्यात आली आहे.
परिषदेचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विषयतज्ज्ञ कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष किशोर सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ गणेश हलकारे, हरीश इथापे उपस्थित राहणार आहेत. २००६-२००७ मध्ये सर्वशिक्षा अभियांनांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विषयतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. शाळाबाह्य़ अभ्यासात मागे राहणारे अप्रगत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातले विविध प्रशिक्षणे घेऊन तालुकास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शाळा भेटी, पालक भेटी आदी कार्ये विषयतज्ज्ञांवर आहे. विषयतज्ज्ञांना हे कार्य करताना भूमिका स्पष्ट व्हावी व त्यांचा या कार्यात सहभाग वाढावा यासाठी या शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्ह्य़ाचे विषयतज्ज्ञ कृती समितीचे अध्यक्ष विनोद निकुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या परिषदेला राज्यभरातून २ हजारावर विषयतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षात विषयतज्ञांचे मानधन दहा हजाराहून चार हजार करण्यात आले होते. व इतर सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या या सर्व अन्याया विरोधात आमदार मुनगंटीवार व राज्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी विषयतज्ज्ञ संघटनेला मदत केली व त्याचीच फलश्रुती म्हणून सर्व विषयतज्ज्ञांच्या वतीने आमदार मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार सोहोळाही घेण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या पहिल्या विषयतंज्ज्ञांच्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला राज्यातील सर्व विषयतज्ज्ञांना उपस्थित राहण्याची महाराष्ट्र राज्य विषयतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष किशोर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन टाले, संदीप पडोळे, विवेक राऊत यांनी केले आहे.