Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सम्यक साहित्य पुरस्कारांचे आज वितरण
वरोरा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

यंदाचा सम्यक साहित्य पुरस्कार सोलापूरचे गौतम निकाळजे, अमरावतीचे सुनील यावलीकर, नागपूरचे प्रश्न. जावेद पाशा, चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, ‘लोकसत्ता’चे जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र गावंडे व ‘लोकमत’चे नितीन पखाले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या, ८ ऑगस्टला दुपारी बारा वाजता येथील हिरालाल लोहिया सभागृहात

 

आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
स्मृतिशेष दादाजी भोयर फाऊंडेशन, अक्षर मानव साहित्य कट्टातर्फे आयोजित या सोहोळ्याचे उद्घाटन ‘सकाळ’चे प्रमोद काळबांडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी हेमंतकुमार कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रकाश बोरा, प्रश्न. जावेद पाशा, प्रश्न. इसादास भडके, डॉ. शुभांगी भोयर उपस्थित राहणार आहेत. राजन खान यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला असून अध्यक्षस्थानी डॉ. विनोद मारांडे तर प्रमुख मार्गदर्शक अशोक पवार, प्रश्न. जावेद पाशा, प्रश्न. इसादास भडके, प्रश्न. सुधाकर पेठकर ‘राजकारणातील साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता आयोजित कविसंमेलनात प्रश्न. अशोक थोरात, प्रश्न. अजय खडसे, महेंद्र गायकवाड, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, मुकेश सरदार, शिवनयन ठाकरे, प्रश्न. मधुमती वानखेडे, नरेंद्र सोनारकर, ताहीश शेख, राजेश डंभारे, राजेश गेडाम, दिलीप वरखडे, राजेश मडावी, हर्षवर्धन डांगे आदींचा सहभाग राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सोनल गोस्वामी तर संयोजक खेमराज भोयर आहेत. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुशील सिरसाट, रवी खाडे, बाळू जीवने, हितेश राजनहिरे यांनी केले आहे.