Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शारीरिक शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर
वर्धा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

शाळांमधून सामूहिक कवायत बंद करण्यात आली असली तरी विशेष तासिका देण्यात आल्याने शारीरिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र क्रीडा व शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरद धारूळकर यांनी केले.

 

आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने येथील लोकविद्यालयात शारीरिक शिक्षकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच झाले. याप्रसंगी बोलताना महासंघाचे अध्यक्ष धारूळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजक संस्थाध्यक्ष दे.सी. हेमके, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, सचिव डॉ. गजानन कोटेवार, महासंघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल आदमने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश बुटे यांनी शासनाच्या क्रीडाविषयक योजनांची माहिती दिली. नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना क्रीडांगणाकडे वळविण्यास प्रवृत्त करणार असून क्रीडा शिक्षकांनी मैदानावर स्वत: नियमित उपस्थित राहून शाळेचे नाव क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल करण्यास योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत सोनवणे यांनी शारीरिक शिक्षकांना सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी महेंद्र आरेपार, माणिकराव देशमुख, अरविंद पांडे, संजय कोटेवार, व्ही.एन. चौधरी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. प्रश्न. विकास काळे व चमूने पाहुण्यांचे स्वागत केले. सुजाता जोशी व अनंत भाकरे यांनी संचालन केले.