Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अत्यावश्यक सेवा विस्कळीत
कळमेश्वर, ७ ऑगस्ट / वार्ताहर

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने राज्य नगरपालिका संघटनेने ३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.
राज्य कर्मचारी संघटनेच्या पाठीशी एकजुटीने मागण्या पदरी पाडून घेण्यापर्यंत शासनाच्या विरोधात

 

३ ऑगस्टपासून कळमेश्वर पालिका संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाली असून पाचव्या दिवशी पालिका कार्यालयात शुकशुकाट होता.
राज्य पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने गेल्या ६ जुलैला शासनासोबत विविध मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये ६ वा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विनाअट लागू करावा, शैक्षणिक पात्रतेनुसार संवर्ग पदावरील कर्मचाऱ्यांमधून ५० टक्के कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी, आदींचा समावेश होता. शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. हे विशेष. ६ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत मागण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झालेली बोलणी फिसकटली असल्याने पालिका कर्मचारी संघटना यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा घेतला. येथील ७७ कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला असल्याने पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य सेवा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या विस्कळीत झाल्या आहे. शासनाने या मगरमिठीतून सोडण्यासाठी संपाची दखल घ्यावी, असे आवाहन कर्मचारी संघाचे अध्यक्ष आर.व्ही. श्रीखंडे, सचिव निशिकांत पाटील, उपाध्यक्ष एम. नवले, पी.एन. आकरे, धन्नू बसकरे, मुन्ना चमके यांनी केले असून संपाचे नेतृत्व करीत आहेत.