Leading International Marathi News Daily
रविवार, ९ ऑगस्ट २००९

प्रशंसनीय यशाचा काळ
गुरू, राहू सहयोग, बुध, शुक्र अनुकूल आणि मंगळ-गुरूचा नवपंचम योग यामुळे मेष व्यक्ती अवघड समीकरणं सोडवून प्रशंसनीय यश मिळवतील. नवीन क्षेत्रातला प्रवेश आणि प्रवास सोपा होईल. त्यात नवे परिचय होतील. कर्तृत्वाला उत्थान मिळेल. मंगळ-शनी केंद्रयोग होत असल्याने अचानक समस्या समोर येतात. विचलित होऊ नका. शनिवारच्या चंद्र-गुरू नवपंचम योगामुळे व्यापार, राजकारण, कला, साहित्य या विभागात बाजी मारून जाता येईल. गोकुळाष्टमी, स्वातंत्र्यदिन स्मरणात राहणाऱ्या घटनांचे ठरतील.
दिनांक : १२ ते १५ प्रगतीचा काळ.
महिलांना : कल्पना कृतीत येतील. समाजात प्रभाव वाढेल, प्रपंच खूश होईल.

सतर्क राहा, यश मिळेल
भाग्यात गुरू, राहू आणि प्रसन्न शुक्राचं सहकार्य असूनही मंगळ-शनी केंद्र योगाच्या प्रखर विरोधाशी सामना करून व्यवहाराची समीकरणं सांभाळावी लागतील. चुका, साहस, प्रलोभनं, वाहनांचा वेग या संबंधात सतर्क राहणे आवश्यक आहे. रवी-केतू सहयोग असेपर्यंत अधिकार आणि आरोग्याच्या प्रश्नांना गंभीर स्वरूप येऊ शकते. परिचितांचे सहकार्य, मिळणारा पैसा, अचानक समोर येणाऱ्या संधी यांचा उपयोग केला तर शनिवारच्या चंद्र-गुरू नवपंचम योगापर्यंत समीकरणं सफलतेत रूपांतरित करता येतील.
दिनांक : १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : झगडावे लागेल, पण यश निश्चित मिळेल.

आव्हान देणारा ग्रहकाळ
व्ययस्थानी मंगळ, द्वितीयात रवि-केतू सहयोग, अष्टमात गुरू-राहू आणि मंगळ, शनी केंद्रयोग नवी नवी आव्हानं समोर येतील. त्यात बलवान शत्रू असतील. कडक तगादे करणारे सावकार असतील. शासकीय प्रकरणं त्यात सहभागी होतील. त्यातून आरोग्य अडचणीत येऊ शकते. तरीही बुध-शुक्र युती उत्साहाचा पुरवठा करणार असल्याने छोटे-मोठे मार्ग शोधून झाकली मूठ मजबूत ठेवता येईल. दुसऱ्यांवर विश्वासून कार्यक्रम आखू नका. गोकुळाष्टमी, स्वातंत्र्यदिन समाधान देतील.
दिनांक : ९ ते १३ शुभकाळ.
महिलांना : प्रवास होतील, शुभकार्ये ठरतील, आप्तांच्या भेटी होतील.

घटनांवर लक्ष ठेवा
साडेसाती आणि मंगळ-शनी केंद्रयोग सप्ताहातील प्रत्येक दिवसातील घडामोडींवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कोणत्याही प्रसंगावर प्रतिक्रिया देऊ नका. त्यामुळे बऱ्याच समस्या सहज रोखू शकाल. यावेळी जवळचीच मंडळी प्रश्न निर्माण करतात आणि सहकार्यातून फसवणूकही करतात. त्यातून प्रापंचिक, आर्थिक, व्यावसायिक प्रकरणात संभ्रम तयार होतो. सप्तामातील गुरू, राहू ऐनवेळी आधार देतील आणि शनिवारचा चंद्र-गुरू नवपंचम योग आपत्तीमधून बाहेर काढील. परमेश्वरी प्रार्थना सुरू ठेवा.
दिनांक : ११ ते १५ शुभकाळ.
महिलांना : हुशारीने पेचप्रसंग टाळा, कार्यभाग साधा.

संयम शिस्त आवश्यक
साडेसाती त्यात मंगळ-शनी केंद्रयोग आणि गुरू, राहू, केतू यांची नाराजी एवढय़ा प्रतिकूल ग्रहांशी संयम, शिस्त, प्रार्थना यांच्या सहभागाशिवाय सामना करता येणार नाही. रविवारच्या चंद्र, हर्षल प्रतियोगापासून काही चमत्कारिक प्रसंगांना प्रारंभ होणं शक्य आहे. वाद, स्पर्धा, प्रलोभने, व्यसनं यापासून कटाक्षाने दूर राहा. प्रकृती, खर्च, वाहनांचा वेग यावर नियंत्रण ठेवा. मंगळ, गुरू नवपंचम योग धोक्याच्या सीमारेषेवरून सहीसलामत मागे घेऊन येईल. नाहक चिंता करीत बसू नका.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : संसारात वाद नको, समाज कार्यात स्पर्धा टाळा, प्रार्थना सत्कारणी लागेल.

शब्द सूर सांभाळा
पंचमात गुरू, राहू भाग्यात, मंगळ दशमात, शुक्र आणि मंगळ- गुरूचा नवपंचम योग सत्कारणी परिश्रमाचा आनंद या ग्रहांमधून मिळतो. साडेसातीबरोबर बुध असल्याने शब्दांचा सूर मात्र शनिवारच्या चंद्र-गुरू नवपंचम योगापर्यंत दूषित होऊ देऊ नका. याचाच लाभ कार्य कृतीमध्ये व्यापार, राजकारण, कलाप्रांत यामध्ये होणार आहे. श्री मारुतीची उपासना, आराधना, मन:शांतीची ठरणारी आहे. मंगळ- शनी केंद्रयोगात वाहन जपून चालवावे लागेल, गर्दीत घाई नको.
दिनांक : १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : नेत्रदीपक यशातून प्रभाव वाढेल. मन प्रसन्न राहील.

समस्यांच्या वळणांवर सांभाळा
भाग्यांत शुक्र लाभात बुध-शनी यांच्यामुळे नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. संपर्क, संबंध राहातील. त्यातून प्रतिष्ठा आणि प्राप्ती यांना सांभाळता येईल. परंतु चतुर्थात गुरू, राहू अष्टमांत मंगळ असल्याने समस्यांच्या वळणांवर अपघात होऊ नये यासाठी सतर्क राहून प्रवास सुरू ठेवणे आवश्यक आहे. रवी-केतू सहयोग समाजकार्यात नवी आव्हानं उभी करतो. मंगळ-शनी केंद्रयोगांत साहसी प्रयोग कटाक्षाने टाळायचे असतात. पैसे सांभाळून वापरा. जुने मित्र-मैत्रिणी भेटण्याचे योग आहेत.
दिनांक: १०, ११, १४, १५
महिलांना: शक्ती-बुद्धीच्या सीमारेषा सांभाळा. विचारपूर्वक कृती करा.

गर्दीत सावध राहा
पराक्रमी गुरू, राहू दशमांत बुध-शनी, भाग्यांत सूर्य, सप्तमात मंगळ-वृश्चिक व्यक्तींची गाडी बहुतांशी क्षेत्रातून वेगाने पुढे सरकत राहणारी आहे. बहुधा कराल ती पूर्व अशाच घटनांचा प्रत्यय येणार आहे. त्यात मंगळ-गुरू नवपंचम योग आहे. तुमच्या कर्तृत्वाला उत्थान देणारी अशीच या आठवड्याची ग्रहस्थिती आहे. व्यापार, नोकरी, राजकारण, संशोधन यांमध्ये आघाडीवर राहाल. मंगळ-शनी केंद्रयोगांत मार्ग मिळेपर्यंत गर्दीच्या रस्त्यावर सावध राहणे आवश्यक असते.
दिनांक: १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना: अपेक्षित यश मिळवता येईल. आनंददायी घटना घडतील.

प्रगतीचा ग्रहकाळ
गुरूची कृपा, शनीचं सहकार्य, राहू अनुकूल यांचे परिणाम षष्ठातील मंगळामुळे निर्वेध होत राहतील. धनू व्यक्ती पुढे सरकत राहतील. गुरुवारच्या मंगळ-गुरू नवपंचम योगाच्या आसपास काही घटना अविस्मरणीय ठरू शकतील. शेतीकार्यात यश मिळेल. व्यापारातून पैसा हाती येईल. राजकारणांत प्रबल होऊ शकाल. नोकरीचा खटाटोप कारणी लागेल. प्रपंचातील प्रश्न मार्गी लागतील. अष्टमांत रवी-केतू सहयोग असेपर्यंत प्रकृतीची पथ्ये तुम्हाला काळजीपूर्वक सांभाळावी लागतील.
दिनांक: ९, १२, १३ शुभकाळ.
महिलांना: प्रपंचात प्रसन्न राहाल, समाजात सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर राहाल.

प्रयत्नांनी नियंत्रण राहील
राशीस्थानी गुरू-राहू पंचमात मंगळ यांना शिकस्तीच्या प्रयत्नाची साथ दिलीत, तर सुरू असलेल्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवता येईल. आणि अनिष्ठ शनी-बुधाचे परिणाम काही प्रमाणात टाळता येतील. गुरुवारचा मंगळ-गुरू नवपंचम आर्थिक, प्रापंचिक, राजकीय, शैक्षणिक समस्या सोडविण्यात उपयुक्त ठरणारा आहे. स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी आकर्षक घटनांनी लक्षात राहतील. शनी-मंगळ केंद्रयोगांत अपरिचित विभागांत जपून पावलं उचलणे आवश्यक असते.
दिनांक: १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना: विचारपूर्वक कृती करा. यश निश्चित मिळेल.

दडपणं येतील, लक्ष ठेवा
व्ययस्थानी गुरू-राहू चतुर्थात मंगळ यातून नवी नवी दडपणं येत राहतात. ठरवलेली समीकरणं चुकण्याचा संभव असतो. काही दिवस तरी अवास्तव साहस, भलती आश्वासनं, प्रवासाचा वेग यावर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. प्रसन्न बुध-शुक्र अनुकूल शनी उत्साह आणि प्रयत्न यातून नवा मार्ग दाखवतील आणि नियमित उपक्रम इभ्रत सांभाळली जाईल; अशा बेताने सुरू ठेवता येतील. दुसऱ्यांवर विश्वासून कोणतीही कृती करू नका. स्वत:च्या मनाने, विचारपूर्वक कृती करा.
दिनांक: १० ते १३ शुभकाळ.
महिलांना: झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या. मन मजबूत करा.

घोटाळे टाळा, यश मिळेल
लाभात गुरू-राहू पराक्रमी मंगळ चतुर्थात शुक्र याच ग्रहांमधून विचारांना वेग येईल. प्रपंचात प्रसन्न घटना घडतील. व्यावहारिक उलाढाली व्यापक होतील. आणि राजकीय प्रतिमा उजळून निघेल, यामध्ये गुरुवारचा गुरू नवपंचमयोग नवी आकर्षकता निर्माण करू शकेल. षष्ठांत शनी-बुध सहयोग असेपर्यंत शत्रू आणि शब्द यांनी घोटाळे करू नये. यासाठी लक्ष देवून संयम ठेवणे आवश्यक राहील. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक: १० ते १४ शुभकाळ.
महिलांना: शुभवार्ता कळतील. महत्त्वाची प्रकरणं मार्गी लावता येतील.