Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

भाजपच्या ‘जेलभरो’ला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद
ठिकठिकाणी रास्ता रोको
हजारो कार्यकर्त्यांना अटक
सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
नागपूर, ९ ऑगस्ट/ प्रतिनिधी / वार्ताहर
महागाई, साठेबाजी व नफाखोरीच्या मुद्यावर आणि इतर आघाडय़ांवरील राज्य सरकारच्या अपयशाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी विदर्भात ठिकठिकाणी ‘जेलभरो’ करण्यात आले. ‘आघाडी सरकार चले जाव’च्या घोषणा देत मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार, शहर, मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले. आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

.. पुन्हा क्रांतीचा गर्जा जयजयकार!
चंद्रकांत ढाकुलकर

ताडोबा-अंधारी अभयारण्याच्या परिसरात कोळसा खाणी सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मागील आठवडय़ात चंद्रपूरकरांनी जो लढा दिला त्याला तोड नाही. प्रश्नरंभी कोलांटउडय़ा मारणाऱ्या वनखात्यानेच त्यांना आता परवानगी नाकारली आहे. हा या आंदोलनाचा विजय आहे. असला कोणताही प्रस्तावच अद्याप वन व पर्यावरण मंत्रालयाला प्रश्नप्त झालेला नाही आणि आला तरीही सर्व संबंधित नियमांच्या कसोटीवरच निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितल्याने तर नोव्हेंबर २००८ पासून सुरू झालेल्या या जनक्षोभाला बळकटी प्रश्नप्त झाली असून अदानी उद्योग समूहाचा कोळसा खाणींचा आग्रह कोणत्या आधारावर आणि कुणाच्या वरदहस्ताने सुरू होता, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

संपाबाबत सरकारच्या अनास्थेमुळे नगरपालिकेचे कर्मचारी संतप्त
ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून
नागपूर, ९ ऑगस्ट

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाबाबत राज्य सरकारच्या अनास्थेवर कर्मचारी संतप्त झाले आहेत. कारंजा-लाड- आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२२ नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी ३ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाच्या संदर्भात ६ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. याप्रसंगी ‘नगर परिषद कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे’ मुख्यमंत्री म्हणाले. हा प्रकार म्हणजे नगरपालिका कर्मचाऱ्यांविषयीची अनास्था दर्शवणारा असल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले.

आदिवासी आश्रमशाळांच्या दुरवस्थेची लक्तरे
न.मा. जोशी, यवतमाळ, ९ ऑगस्ट

‘आपलेच लोक’ आपल्याच लोकांचे शोषण करून, त्यांना कष्टी, दु:खी पाहून प्रसन्न होतात, हे कटू सत्य रामायणात रावणाने आपला बंधू विभिषण याला सांगितले होते. त्याची आठवण आदिवासी जमाती कल्याण समितीने आदिवासी आश्रम शाळा आणि एकूणच आदिवासींच्या दुरवस्थेची जी लक्तरे चव्हाटय़ावर आणली ती पाहून झाल्याशिवाय राहत नाही.

वर्धा जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अतिरिक्त १५ टक्के सवलत
वर्धा, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्यावतीने कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के सवलतीशिवाय १५ टक्के अतिरिक्त सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा सहकारी बॅकेने घेतला असून यामुळे जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

भंडारा जिल्ह्य़ात चंडीपुराचे २० रुग्ण
भंडारा, ९ ऑगस्ट / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात चंडीपुरा आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले असून नागरिकांनी चंडीपुरा व इतर कीटकजन्य आजारांपासून खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात ‘वायरल इंसेफलाइटिस’चे २० रुग्ण आढळले असून त्यांचे रक्त नमुने परीक्षणासाठी पुण्याच्या एनआयबी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

होमिओपॅथीक कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार
चंद्रपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

पुरुषोत्तम बागला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार व पालक मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. गो.वा. अंदनकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ. विजय धनगर, प्रश्नचार्य एस.वाय. साखरकर, डॉ. पी.एस. कासटवार, डॉ. किशोर जेनेकर, डॉ. राजश्री पोटदुखे, शेखर कोटेवार उपस्थित होते.

गाडगेबाबांच्या स्मारकासाठी जिवंत समाधी घेण्याचा इशारा
अंजनगावसुर्जी, ९ ऑगस्ट / वार्ताहर
श्रीसंत गाडगेबाबांची जन्मभूमी असलेल्या शेंडगाव (खासपूर) ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय गव्हाळे यांनी १० ऑगस्टला जिवंत समाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनास उपेक्षित जन आघाडीचे अध्यक्ष प्र.ज्ञा. इंगळे यांनी पाठिंबा दिला आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पूर्वीच देण्यात आले आहे.

वसंतराव दांडगे यांची बसपला सोडचिठ्ठी
खामगाव, ९ ऑगस्ट / वार्ताहर
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षातर्फे भाग्य अजमावणारे वसंतराव दांडगे यांनी बसपला ‘जय भीम’ ठोकून मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते मनसेतून लढणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत वसंतराव दांडगे हे तिसऱ्या स्थानावर होते. पराभूत झाल्यापासून दांडगे नव्या पक्षाच्या शोधात होते. त्यांनी विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन मनसेत प्रवेश केला. यावेळी सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, शिशिर सावंत, उपाध्यक्ष विनोद खोतकर, श्याम भुतडा आदी उपस्थित होते.

सावकाराने वाद्ये हडपली
नरखेड, ९ ऑगस्ट / वार्ताहर

तालुक्यांतर्गत खरसोली येथील सावकाराने एका मातंग कर्जदाराचे वाजंत्री वाद्यांसह सोन्याचे दागिने हडपल्याची तक्रार नरखेड पोलिसांकडे करण्यात आली आहे. खरसोली येथील कचरू बळीराम वानखेडे यांनी चार वर्षापूर्वी उपजीविकेचे साधन असणारे वाजंत्री वाद्य अवैध सावकाराकडे गहाण ठेवले होते पण, सावकाराने ते वाद्य दुसऱ्यास देऊन टाकले व वानखेडे यांना परत करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.

फुटबॉल स्पर्धेत महर्षी विद्या मंदिर अव्वल
भंडारा, ९ ऑगस्ट / वार्ताहर
येथील शिवाजी स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या जिल्हा सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महर्षी विद्या मंदिरने प्रथम स्थान प्रश्नप्त केले. उपांत्य फेरीत सेंट पॉल शाळेला ४-० ने हरवून अंतिम सामान्यात ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर शाळेला अटीतटीच्या सामन्यामध्ये २-० ने पराभव करून जिल्हा पातळीवरील स्पर्धेत अव्वल स्थान प्रश्नप्त केले. विजयी संघामध्ये अक्षय तिवारी, आयुध सार्वे, सनी यादव, राहुल यादव, श्रेयस ओहळे, अजय वंजारी, किरण भोयर, नीलेश रामटेके, शुभम सार्वे, प्रतीक सुपारे, अक्षय बुरघाटे, अजय बाहे, कार्तिक श्रीरामनेने, देवांशू शर्मा, सार्थक भोवते, सचिन पारधी यांचा समावेश होता. तसेच महर्षी विद्या मंदिर शाळेच्या चमूची विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

ज.मु. पटेल महाविद्यालयाचे सुयश
भंडारा येथील शिवाजी क्रीडा संकुलात सुभ्रतो बॅनर्जी कप फुटबॉल स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात ज.मु. पटेल महाविद्यालयाची चमू विजयी झाली. यासाठी झालेल्या अंतिम सामन्यात ज.मु. पटेल महाविद्यालयाने आर्डिनन्स फॅक्टरी स्कूल जवाहरनगरचा २-१ ने पराभव केला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. विकास ढोमणे, पर्यवेक्षक प्रश्न. बावनकर, चमूचे व्यवस्थापक प्रश्न. सीम गोंडाणे, प्रशिक्षक प्रकाश सिंग यांनी चमूचे अभिनंदन केले आहे.

फुटबॉल संघटनेची स्थापना
भंडारा जिल्हा शालेय ७-ए साईड फुटबॉल संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाशसिंग, सचिवपदी हेमंत धुमनखेडे यांची निवड करण्यात आली. शिवछत्रपती पुरस्कारप्रश्नप्त अशोक राजपूत प्रमुख आश्रयदाते आहेत. इतर पदाधिकाऱ्यात विजय खोब्रागडे, उपाध्यक्ष नदीम खान, सहसचिव शैलेंद्र राजपूत, कोषाध्यक्ष अकुंश तलदार यांचा समावेश आहे. सदस्य म्हणून संजय चिचमलकर, इरफान खान, संजय निर्वाण, दीपक डहारे, प्रवीण फुलसुंगे, साजीद अंसारी, यांची निवड करण्यात आली.

कंवलदीपकौरला सुवर्णपदक
चंद्रपूर, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९६ व्या दीक्षांत समारंभात सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थिनी कंवलदीपकौर रगबिरसिंग सलुजा या विद्यार्थिनीला शैक्षणिक सत्र २००७-०८ उन्हाळी परीक्षेमध्ये बी.कॉम. अंत्य या परीक्षेत ‘अ‍ॅडीटींग अ‍ॅण्ड इनकमटॅक्स’ या विषयात रा. तु. म. नागपूर विद्यापीठात सर्वाधिक गुण प्रश्नप्त केल्याबद्दल ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया’ हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
भंडारा, ९ ऑगस्ट / वार्ताहर
लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलखान्याकडे जाणारी ८१ जनावरे पकडून त्यांची रवानगी गो-शाळेत केल्यानंतर हे कार्य करणाऱ्या १८ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधातच पोलिसांनी संबंधित ठेकेदाराच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.

टिळक, साठे यांना अभिवादन
पुसद, ९ ऑगस्ट / वार्ताहर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली. वसंतराव नाईक वाचनालय परिसरात शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रकाश चापके, सिम्पल राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विविध विकास कामांचे आज आर्वीत भूमिपूजन
आर्वी, ९ ऑगस्ट / वार्ताहर

आर्वी मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन १० ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार दत्ता मेघे, आमदार अमर काळे उपस्थित राहणार आहे. आर्वी शहरातील एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत महाराणा प्रताप वॉर्ड व रेल्वे जवळील ८ कोटी खर्चून तयार होणाऱ्या ३२९ घरकुलाचे भूमिपूजन व केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत मॉडेल ज्युनिअर कॉलेज तळेगाव (शा.पं.) रस्त्याचे चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन यावेळी होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री झाल्याबद्दल विलासराव देशमुख यांचा सत्कार भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर सकाळी ११ वाजता होत असून यावेळी कलावती वाकोडकर, नागोराव लोडे, कांचन लोहे ,मोहन टिपले उपस्थित राहणार आहेत.

पुसद तालुक्यातील शेतकरी चिंतातूर
पुसद, ९ ऑगस्ट / वार्ताहर

पंधरा दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यात केवळ खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी उडीद, मूग, तूर या पिकांचा समावेश आहे. एवढय़ात पाऊस आला तर हा खरीप हंगाम कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा राहू शकतो परंतु, मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आत्ताच शेतकरी काळजीत आहे. शिवाय पूस धरणात केवळ पाच टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पुसद नगरपरिषद एक वेळ शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या विचारात आहे. ऑगस्ट महिन्यात पाण्याची इतकी भीषण टंचाई यापूर्वी कधीच निर्माण झाली नाही. पाण्याची जेमतेम वाढलेली पातळी एकदम घसरत चालली आहे. गुरांना प्यायला ओढय़ा-नाल्यात आज पाणी नाही. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून कडब्याचा भाव पाचपट वाढला आहे. दुधापेक्षा सरकी-ढेपाचे भाव वाढलेले आहेत. अशी भीषण परिस्थिती आहे. मात्र, एवढय़ात पाऊस आला तर बऱ्याच समस्या सुटतील.

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
उमरेड, ९ ऑगस्ट / वार्ताहर

नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन येथे नुकतेच झाले. कार्यक्रमाला नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, आमदार राजेंद्र मुळक, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अतुल कोटेजा, नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर उपस्थित होते.
आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. आमदार राजेंद्र मुळक, मुजीब पठाण, अतुल कोटेजा, गंगाधर रेवतकर, दिलीप गुप्ता, अध्यक्ष गंगाधर देशमुख, नंदा नारनवरे, पद्माकर कडू, हरिभाऊ ढगे, तोवर, प्रभाकरराव चव्हाण, उपसभापती राजेंद्र गारघटे, सोपान दडवे, शिरीष मेश्राम, मनोज गावंडे, विशाल देशमुख, विकास जवादे आदी उपस्थित होते.