Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २ ० ० ९

लक्ष्मीची पावले : बॅंकातील दीघरेद्देशी गुंतवणूक लाभदायी!

बँकांविषयी सर्व काही : वसुली अधिकाऱ्याने मालमत्तेचा ताबा नेमका कधी घ्यावा यासंबंधी उच्च न्यायालयाचे निर्देश
।। मार्केट मंत्र ।।
आता फेरा मंदीचा
यशोगाथा : ‘टॉप गियर’
वाटा स्वयंरोजगाराच्या
जगातील मोठय़ा कंपनीचा मृत्यू : जनरल मोटार्सची गाथा
रिझव्‍‌र्ह बँक पतपुरवठा धोरण; एक चिंतन

लक्ष्मीची पावले : बॅंकातील दीघरेद्देशी गुंतवणूक लाभदायी!
‘श्रावण मासी। हर्ष मानसी।
हिरवळ दाटे चोहिकडे’
असंच चित्र शेअरबाजारातलं आहे. एकापाठोपाठ एक कंपन्या नफ्यात मोठी वाढ जून ०९ तिमाहीसाठी जाहीर करीत आहेत. जूनचे आकडे चांगले असणार नाहीत. शेअरगणिक उपार्जनात जेमतेम १० टक्के वर्षभरात वाढ दिसेल असे सांगणाऱ्यांना, गोविंदाग्रजांची ‘या चिंतातूर जंतूना एकदा मुक्ती द्या तरी। या ओळीची आठवण करून द्यायला हवी. निराशा पसरवण्यात त्यांना का आनंद वाटतो?
मागील आठवडय़ात उल्लेख केलेल्या बँकांचे आकडे खालीलप्रमाणे आहेत.

 

बँकांतील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी व पेन्शनसाठी गेल्या आठवडय़ात संप केला होता. या वेतनवाढीचा परिणाम बँकांच्या २०१० मार्चच्या आकडय़ांवर होणार असला तरी या सप्टेंबरनंतर त्यांच्या ठेवींवरील व्याजखर्चात थोडी घट येईल. शिवाय बँकांचे अतिरिक्त उत्पन्नही वाढणार आहे. स्टेट बँकेच्या या वेळच्या नफ्यात अन्य उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. तिचे कर्जावरील व्याजाचे उत्पन्न १२,३५७ कोटी रुपये होते. गुंतवणुकीवरील व्याज ४३३८ कोटी रुपये होते तर अन्य उत्पन्न ४३४५ कोटी रुपये होते. नक्त नफा २३३० कोटी रुपये होता. व शेअरगणिक उपार्जन तिमाहीसाठी ३६.७१ रुपये होते. सध्याचा भाव हा वाढला असल्याने १८५० रुपयांपर्यंत चढला आहे. पण तो १६५० रुपयाला नजिकच्या भविष्यात मिळू शकेल. त्या भावाला वार्षिकीकृत उपार्जनाच्या
ज्या बँकांचे आकडे यापूर्वीच्या लेखात दिले आहेत त्यात ९० रुपयांच्या जवळपास मिळणाऱ्या अलाहाबाद बॅंक व इंडियन ओव्हरसीज किं/उ गुणोत्तर अनुक्रमे ३.४ पट व ४.१ पट दिसते. या बॅंकांच्या गुंतवणुकीवर वर्षात किमान ४० टक्के नफा व्हायची अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
भारतीय बँकांची आंतरराष्ट्रीय बेसल नियमानुसार, भांडवल पर्याप्तता भरपूर आहे. तरीही बॅंक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट, युको बँक अशा बँकांना येत्या काही वर्षातील, व्यवसायवृद्धीसाठी भांडवल कमी पडू नये म्हणून केंद्र शासन, जागतिक बँकेकडून २०,००० कोटी रुपयांचे कर्ज सवलतीच्या व्याजदराने घेऊन त्या बँकांच्या भांडवलात भर घालणार आहे. त्यामुळे उपार्जनात थोडीशीच वाढ यापुढे दिसेल. तरीही बँकांतील गुंतवणूक चांगली ठरेल.
मार्च १० वर्षासाठी निर्देशाकांतील कंपन्यांचे एकत्रित उपार्जन ११५० रुपये व मार्च ०११ साठी १३०० रुपये होईल व त्यासंदर्भात १६,००० चा निर्देशांक १५ पट किं/उ गुणोत्तर दाखवेल व ही फार महाग पट आहे, असे परदेशी विश्लेषकांतर्फे दूरदर्शनवरील काही चॅनेल्स सतत लोकांच्या माथी मारीत असतात. ही पट अगदी बारावर आणली व ती सरासरीच आहे, असेही गृहीत धरले तरी याच फूटपट्टीवर कित्येक शेअर्स पुनर्मापन (Re-rating) करायला हवे. स्टेट बँक, पंजाब नॅशनल, बॅंक ऑफ बडोदा, युनियन बँक यांना जर १२ पट गुणोत्तर दिले तर सध्यापेक्षा या भावात कितीतरी वाढ हवी. अलाहाबाद बँक, आय.बी.ओ., देना बॅंक, युको बॅंक यांच्यासाठी आठपट गुणोत्तर वाजवी धरले तर सध्याचे भाव दुप्पट होतील. शासनाने या बँकांत विदेशी गुंतवणुकीची टक्केवारी वाढवायला हवी.
पण लोकांचा तो बाब्या, आपलं ते कार्ट अशी उलटी म्हण सांगण्यात जोपर्यंत आपलेच विश्लेषक, चॅनेल्स, प्रसारमाध्यमे, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या या जोपर्यंत ‘आपला तो बाब्या’ म्हणायला लागत नाही तोपर्यंत परदेशीयांच्या ओंजळीतूनच आपले रेटिंग बघितले जाईल. पण ‘ये भी दिन जायेंगे’ आणि ‘दिस जातील, दिस येतील। दु:ख सरेल, सुख येईल’ या ओळींवर सामान्य निवेशकाने लक्ष ठेवायला हवे. २००३ मध्ये कॅनरा बँकेच्या प्रश्नथमिक विक्रीला ३५ रुपयांचा भाव लोकांना जास्त वाटला होता. मारुती उद्योगाची प्रश्नथमिक भागविक्री १२५ रुपयाला काही वर्षापूर्वीच झाली होती. आज कॅनरा बँकेच्या शेअरचा भाव २९९ रुपयांपर्यंत वर गेला आहे, तर मारुतीने १४९० रुपयांपर्यंत झेप घेतली आहे.
अन्य कंपन्यांच्या बाबतच्या वार्ताही समाधानकारक आहेत. अ‍ॅबन ऑफ शोअरची दोन रिग्ज दर दिवशी एक लक्ष डॉलर्स व सव्वा लक्ष डॉलर्स या दराने आता भाडय़ाने गेली आहेत. कोरसचा खर्च कमी करण्याबाबत टाटा समूह पराकाष्टा करीत आहे. लार्सेन टुब्रोला ८५३ कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. भेललाही २२०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. अडानी पॉवरच्या प्रश्नथमिक विक्रीला २१ पट प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विक्रीचा भाव १०० रुपये ठेवला गेला आहे. नॅशनल हायड्रोपॉवरची या आठवडय़ात विक्री सुरू होत आहे. तिलाही चांगला प्रतिसाद मिळेल. एनएमडीसीचेही निर्निवेशन पाठोपाठ येईल.
मारुती सुझुकी व टाटा मोटर्सची जुलै महिन्याची विक्री वाढलेली आहे. टाटा मोटर्सला ब्रिटिश सरकार कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मदत करणार आहे. त्यासाठी लागणारी हमी स्टेट बॅंक बहुधा देईल. रिलायन्स इन्फ्राला मुंबई मेट्रो रेलचे ११,००० रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. अ‍ॅक्सिस बँक ६००० कोटी रुपयांचे भांडवल जीडीआरद्वारा उभे करणार आहे. ग्रेट ऑफ शोअरसाठीचा देकार आता ५२० रुपयांवर गेला आहे.
पुण्याची श्री श्रीकोटेड स्टील ही पोलादाचे रंगीत पत्रे करणारी कंपनी एस्सार स्टीलने ६०० कोटी रुपयाला विकत घेतली आहे. आफ्रिकेतील एम.टी.एन. कंपनीच्या वाटाघाटी ३१ ऑगस्टपर्यंत पुऱ्या करण्याचे भारती एअरटेल व एम.टी.एन.ने करण्याचे ठरवले आहे. थोडक्यात श्रावणसरींनी आकांक्षांचे सुरेख इद्रधनुष्य उभे केले आहे. निवेशकानी आता ‘त्या कमानीखाली नाच’ करायची तयारी ठेवायला हवी.
वसंत पटवर्धन
फोन - ०२०-२५६७०२४०