Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला अटक
पुणे, ९ ऑगस्ट / प्रतिनिधी

कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व साक्षीदाराला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला

 

विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. अलका चित्रपटगृहाजवळील भारती विद्यापीठ भवनात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
सुलेखा वसंत नलावडे (वय ३५, रा. शिवनगर, फुरसुंगी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या शिपाई आशिया वजीर शेख (वय २४) यांनी नलावडे हिच्याविरुद्ध फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरू होते. त्यावेळी शिपाई शेख आणि एका प्रकरणातील साक्षीदार असे दोघेजण न्यायालयात हजर होते. त्यावेळी नलावडे यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांशी तेथील कामकाजाबाबत वाद घालण्यास सुरूवात केली. नलावडे यांनी आरडाओरड करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर शेख व साक्षीदार या दोघांनाही नलावडे यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून नलावडे यांना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एम.बी. सूर्यवंशी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.