Leading International Marathi News Daily

सोमवार, १० ऑगस्ट २००९

क्रीडा

ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
जॉन्सनचे पाच बळी
इंग्लंडवर १ डाव आणि ८० धावांनी मात

लीड्स, ९ ऑगस्ट / एएफपी

अॅशेस कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेऊन ही मालिका जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या यजमान इंग्लंडचा या मालिकेतील चौथ्या कसोटीत मात्र स्वप्नभंग झाला. ऑस्ट्रेलियाने एकतर्फी झालेल्या या सामन्यात एक डाव आणि ८० धावांनी विजय मिळवित या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता ओव्हल येथे २० ऑगस्टपासून होणाऱ्या अंतिम कसोटीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका विजयासाठी चुरस असेल.ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या १०२ धावांत गुंडाळल्यानंतर आपल्या पहिल्या डावात ४४५ धावा करून ३४३ धावांची आघाडी घेतली होती. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा या सामन्यावर वरचष्मा स्पष्ट झाला होता. त्यातच इंग्लंडची काल दुसऱ्याच दिवशी ५ बाद ७८ अशी वाईट अवस्था झाली होती.

चांगली कामगिरी नोंदविण्याचे दडपण - सायना नेहवाल
प्रमोद माने, औरंगाबाद, ९ ऑगस्ट

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा तोंडावर असताना कांजिण्या झाल्यामुळे सरावाला मोठा फटका बसला. तब्बल सहा दिवस कांजिण्यामुळे सरावच करता आला नाही, असे भारताची जागतिक क्रमवारीतील सहावी मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या स्पर्धेत माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या प्रेक्षकांसमोर मला चांगली कामगिरी नोंदवायची आहे, याची जाणीव आहे; त्यामुळे दबाव जाणवत असल्याची कबुली सायना नेहवालने दिली.

साऱ्यांच्या नजरा सायनावर
विश्व अिजक्यपद बॅडमिंटन
हैदराबाद, ९ ऑगस्ट / पीटीआय

दहशतवादी संघटनेकडून आलेली धमकी आणि त्या पाश्र्वभूमीवर इंग्लंडच्या संघाने घेतलेली माघार अशा स्थितीत उद्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला येथील गच्चीबोली स्टेडियमवर सुरुवात होत आहे. भारताचे सारे लक्ष सायना नेहवालच्या कामगिरीकडे असून भारताच्या दृष्टीने या स्पर्धेत तेच एक प्रमुख आकर्षण असेल. भारताचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या कथित धमकीनंतर कुणीही घाबरण्याचे कारण नाही आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था असेल असे आश्वासन काल दिले होते.

जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर पहिल्या पन्नासात
मुंबई, ९ ऑगस्ट/क्री.प्र.

एअर इंडियाचे व ठाण्याच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे बॅडिमटनपटू जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर यांनी पुरुष दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत सेहेचाळीसाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष दुहेरीच्या गटात चीन, इंडोनेशिया, मलेशिया, डेन्मार्क या आघाडीच्या देशाचे सवरेत्कृष्ट खेळाडू खेळत असल्याने तीव्र चुरस आहे. सध्याच्या जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीत पहिल्या पन्नास जोडय़ांत स्थान मिळवणारी ती दुसरी भारतीय जोडी आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेने नवी आंतरराष्ट्रीय क्रमवारी कालच जाहीर केली असून त्यात जिष्णू व अक्षय व्यतिरिक्त भारताची सवरेत्कृष्ट जोडी सनावे थॉमस व रुपेश कुमार यांना अठरावे स्थान आहे.

कांगा साखळी क्रिकेट; हर्षद भोजनाईकचे शतक
मुंबई, ९ ऑगस्ट / क्री. प्र.

कांगा साखळी क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ डिव्हिजनमध्ये आज एकही सामना निकाली ठरला नाही. हर्षद भोजनाईकने केलेल्या ११७ धावांमुळे यंग महाराष्ट्र क्रिकेट क्लबने शिवाजी पार्क जिमखान्याविरुद्ध ७ बाद २०७ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला ५ बाद ८८ असे अडचणीत टाकले. वरळी स्पोर्ट्स क्लबच्या प्रतीक डेंगळे (नाबाद ६६), बृहन्मुंबई पोलिस स्पोर्ट्स क्लबच्या राजेश तांडेल (४-४०), पय्याडे स्पोर्ट्स क्लबच्या राहिल शेख (४-४९) यांनीही चमक दाखविली. निकाल - ‘अ’ डिव्हिजन : एमआयजी क्रिकेट क्लब १०-१८२ (बालकृष्ण शिर्के नाबाद ७६, राहिल शेख ४-४९) अनिर्णीत वि. पय्याडे स्पोर्ट्स क्लब (४-५४). अपोलो क्रिकेट क्लब १०-१७५ (निलेश राऊत नाबाद ४७) अनिर्णीत वि. कर्नाटक स्पोर्टिग असोसिएशन २-६१. व्हिक्ट्री क्रिकेट क्लब ४-१९९ (अमित पाटील ७८, श्रीरंग कापसे ४०) अनिर्णीत वि. फोर्ट विजय क्रिकेट क्लब (४-१५०; प्रतीक प्रभू ६५).यंग महाराष्ट्र क्रिकेट ७-२०७ (हर्षद भोजनाईक ११७, श्रेयस खानविलकर ४-५१) अनिर्णीत वि. शिवाजी पार्क जिमखाना (५-८८). वरळी स्पोर्ट्स क्लब ७-१४८ (प्रतीक डेंगळे नाबाद ६६) अनिर्णीत वि. शिवाजी पार्क यंगस्टर्स स्पोर्ट्स क्लब बिनबाद ९८ (राहिल शेख नाबाद ५२), पार्कोफिन क्रिकेटर्स १०-१९७ (रेहमानी सुफियाँ नाबाद ५२; रॉबिन मॉरिस ४९, राजेश तांडेल नाबाद ५४), न्यू हिंद स्पोर्ट्स क्लब ६-१५४ (सोहम सिन्हा ५५) अनिर्णीत वि. पारसी जिमखाना ८-१२३(शशांक सिंग नाबाद ४८).

आयसीएलमध्ये ‘फिक्सिंग’; ध्वनिमुद्रित संभाषणामुळे वाद
कराची, ९ ऑगस्ट/वृत्तसंस्था

इंडियन क्रिकेट लीगच्या सामन्यांमध्ये फिक्सिंग झाले होते, असा दावा करणारे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे ध्वनिमुद्रित संभाषण आज प्रसिद्ध झाल्याने एक नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे संभाषण येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाठविण्यात आले आहे, तसेच यूटय़ूब या संकेतस्थळावरही ते उपलब्ध करण्यात आले आहे. या ध्वनिमुद्रिकेत पाकिस्तान निवड समितीचे एक सदस्य मोहंमद इलियास हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलीम अल्ताफ यांना आयसीएलचे सामने कसे फिक्स केले जातात हे सांगत असल्याचे दिसून येते. इलियास यांचा जावई असलेला इम्रान फरहात हा या स्पर्धेत खेळला होता.

जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर पहिल्या पन्नासात
मुंबई, ९ ऑगस्ट/क्री.प्र.

एअर इंडियाचे व ठाण्याच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे बॅडिमटनपटू जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर यांनी पुरुष दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत सेहेचाळीसाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष दुहेरीच्या गटात चीन, इंडोनेशिया, मलेशिया, डेन्मार्क या आघाडीच्या देशाचे सवरेत्कृष्ट खेळाडू खेळत असल्याने तीव्र चुरस आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक प्रगती करण्याचा मानस या दोघा ठाणेकरांनी बोलून दाखवला. सध्याच्या जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीत पहिल्या पन्नास जोडय़ांत स्थान मिळवणारी ती दुसरी भारतीय जोडी आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेने नवी आंतरराष्ट्रीय क्रमवारी कालच जाहीर केली असून त्यात जिष्णू व अक्षय व्यतिरिक्त भारताची सवरेत्कृष्ट जोडी सनवे थॉमस व रुपेश कुमार यांना अठरावे स्थान आहे.

राज्य सीनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा १९ ऑगस्टपासून
मुंबई, ९ ऑगस्ट/क्री.प्र.

महाराष्ट्र राज्य सीनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा एम.आय.जी. क्लब तर्फे १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील सामने एमआयजी आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन कोर्टवर होणार आहेत. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट असून या प्रवेशिका संबंधित जिल्हा असोसिएशनद्वारा पाठवणे आवश्यक आहे.

पाकिस्तानने अखेरचा सामना जिंकला
कोलंबो, ९ ऑगस्ट / एएफपी

पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने केलेल्या ७६ धावांमुळे पाकिस्तानने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला १३२ धावांनी नमविले. प्रेमदासा स्टेडियमवरील या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २७९ धावा केल्या. त्यात युनूस खानच्या ७८ धावांबरोबरच मिसबाहच्या नाबाद ७३ धावांचा समावेश होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ मात्र १४७ धावांतच गारद झाला. पाकिस्तानने याआधीचा सामनाही जिंकला होता. पण श्रीलंकेने ही मालिका आधीच ३-० अशी जिंकलेली होती. तरीही पाकिस्तानने पिछाडी भरून काढण्याची कामगिरी केली. त्याआधी, कसोटी मालिकाही श्रीलंकेने जिंकली होती.