Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

‘एल अॅण्ड टी फायनान्स’ रोखेविक्रीतून १००० कोटी उभे करणार
व्यापार प्रतिनिधी:
अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी लार्सन अॅण्ड टुब्रो लिमिटेडची उपकंपनी ‘एल अॅण्ड टी फायनान्स’ने आपल्या प्रस्तावित रु. ५०० कोटींच्या सिक्युअर्ड रिडीमेबल अपरिवर्तनीय रोख्यांच्या (डिबेंचर) खुल्या विक्रीसाठी राष्ट्रीय शेअर बाजारात आणि ‘सेबी’कडे प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीच्या प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य रु. १००० असून यातून कंपनी रु. ५०० कोटींचे भांडवल उभारणार आहे, तसेच अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद लाभल्यास आणखी रु. ५०० कोटींचे भांडवल उभारण्याचा पर्याय कंपनीने स्वत:पाशी राखून ठेवला आहे.

ऑनलाइन बातम्या वाचण्यासाठी आता लवकरच पैसे मोजावे लागणार
व्यापार प्रतिनिधी:
जागतिक माध्यम समूह ‘न्यूज कॉर्प’ ही कंपनी आपल्या मालकीच्या वृत्तपत्रांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करीत असल्याचे या कंपनीचे अध्यक्ष रूपर्ट मर्डॉक यांनी सांगितले. या निर्णयामुळे मंदीच्या खाईत सापडलेला वृत्तपत्र उद्योग बाहेर येईल व जाहिरातींचे उत्पन्न वाढेल असा एक मतप्रवाह असला तरी काही तज्ज्ञांच्या मते यामुळे जाहिरातींचे उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. माध्यम विश्लेषक डॉ. केन डॉक्टर यांनी सांगितले की, कंपनीला असा निर्णय घेणे अत्यंत धोक्याचे आहे. या निर्णयामुळे संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या घटण्याबरोबरच जाहिरातीच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.

अभिनेता सैफ अली खानचे ‘बजाज अलियान्झ’सह संयुक्त अभियान
व्यापार प्रतिनिधी:
टीव्हीवरील सध्या झळकत असलेल्या ‘बजाज अलियान्झ-लव्ह आज कल’ को-ब्रॅण्डेड जाहीरात मोहिमेतून अभिनेता सैफ अली खान सर्व वयोगटातील प्रेक्षकांपुढे ‘जियो बेफिकर’ हा अनोखा संदेश घेऊन साकार झाला आहे. सैफ आणि दीपिका पडुकोन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह आज कल’ या आगामी चित्रपटाशी बजाज अलियान्झने अनोखे नाते जुळविताना, सुरक्षितता आणि निर्भिकतेचा अनोखा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारी ही जाहिरात मोहिम व विशेष स्पर्धा पुढे आणली आहे. स्पर्धेतील विजेत्याला सैफची व्यक्तिश: भेट घेण्याची संधी प्रदान केली जाणार आहे.

‘प्रश्नॅव्हिडंट हाऊसिंग’चा बंगळुरूतील पहिला महत्त्वपूर्ण प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी:
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अग्रेसर कंपनी पूर्वाकर प्रश्नेजेक्ट्स लिमिटेडची उपकंपनी ‘प्रश्नॅव्हिडंट हाऊसिंग लिमिटेड’ने बंगळुरूमधील आपला पहिला प्रकल्प ‘वेलवर्थ सिटी’ची घोषणा केली आहे. लो कॉस्ट हाऊसिंग क्षेत्रातील कंपनीचा हा भारतातील दुसरा प्रकल्प असून, वेलवर्थ सिटी या गृहवसाहतीत एकूण ३३६० संपूर्ण सोयीसुविधांनी युक्त स्वस्त आणि प्रिमियम धाटणीची घरे असतील. ऑगस्ट २००८ पासून कार्यान्वित झालेल्या या कंपनीत रु. ४८० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. अवघ्या १२ महिन्यांच्या काळात कंपनीचा दुसरा प्रकल्पही सुरू होत आहे. बंगळुरू शहरातील एलहंका दोड्डाबल्लापूर मेन रोड या भागातील या गृहवसाहतीत दोन वेगवेगळ्या प्रकारची घरे असतील. त्यात तीन बेडरूम अपार्टमेंट आणि एक दोन बेडरूम हॉल अपार्टमेंट्स असतीतल आणि त्यांच्या किमती अनुक्रमे रु. १८.९० लाख आणि रु. १४.९० लाख अशा निश्चित करण्यात आल्या आहेत. सात-सात मजली इमारतींच्या या गृहवसाहतीत तळमजल्यावर पार्किंग सुविधा, इमारतीत लिफ्ट्स, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, मोठे तसेच छोटय़ांकरिता स्विमिंग पूल, जिम्स, पूल टेबल, बास्केट बॉल पोस्ट, मल्टिपर्पज हॉल, सुपर मार्केट, जॉगिंग ट्रॅक, टेबल टेनिस आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.

‘आर कॉम’च्या नफ्यात ८.३ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी:
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडने ३० जून २००९ रोजी संपलेल्या तिमाहीचा लेखा परीक्षण झालेला एकत्रित असा आíथक अहवाल जाहीर केला असून त्यानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८.३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट होते. रिलायन्स इन्फ्राटेल ही कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सची दुय्यम कंपनी असून या कंपनीने नवीन वायरलेस सेवा देणाऱ्या ‘इटीसॅलॅट डीबी’ कंपनीशी दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन करार केला आहे. या कराराने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या महसुलात १० हजार कोटी रुपयांनी (२.२ अब्ज अमेरिकी डॉलर) वाढ होईल. बॅण्डविड्थ/फायबर, देशी व आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याच्या माल वाहतूक सेवा आदि पायाभूत घटकांच्या सहकार्याबाबतीतही रिलायन्स कम्युनिकेशन्सने भरीव असा करार केला आहे. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने कृभको रिलायन्स किसान लिमिटेड, जेव्ही कंपनी या हातात हात घालून काम करणाऱ्या पहिल्याच कंपन्या होत. रिलायन्स कम्युनिकेशन्स अल्काटेल ल्यूसेंट जेव्ही या कंपन्यांनी एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला. केवळ एका वर्षात जेव्हीचे व्यवहार ३,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असून ‘ऑपरेशनल कॉस्ट’ मध्ये २० ते २५ टक्के बचत करण्यात यश मिळविले. ‘ईटी ब्रॅण्ड इक्विटी सव्र्हे-२००९’ च्या पाहणीत रिलायन्स मोबाईल हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह सíव्हस ब्रॅण्ड असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘टाटा स्काय’वर डिस्ने गेम्सची जादू
व्यापार प्रतिनिधी:
टाटा स्काय लिमिटेडने विशेष कन्टेंट स्वरूपाचे सहकार्य म्हणून वॉल्ट डिस्ने कंपनी इंडियाबरोबर सामंजस्याचा करार जाहीर केला आहे. या माध्यमातून डिस्ने व त्यातील लोकप्रिय कॅरॅक्टर्सचे जगत टाटा स्कायच्या ‘अॅक्टिव्ह स्टोरीज्’ आणि ‘अॅक्टिव्ह विझकिड्स’ या संवादरूपी व्यासपीठावर जिवंत होणार आहे. यातून सर्व वयोगटांतील कुमार-बालकांना सर्वोत्तम डिस्ने स्टोरीजचा खजानाचा खुला होणार आहे. त्यात सिन्ड्रेलाची परीकथा, स्नो व्हाइट अॅण्ड विनी द पूह, कार्स आणि लिलो अॅण्ड स्टीच या सारखी नवीन लोकप्रिय मालिकाही धमाल पद्धतीने सादर होणार आहे. मुलांना दररोज आणि दिवसातील कोणत्याही वेळी त्यांच्या सवडीने या कोऱ्या करकरीत डिस्ने कथांचा आनंद अनुभवता येणार आहे.

‘एसजीएम’कडून श्री गणेशाचे दागिने
व्यापार प्रतिनिधी:
येऊ घातलेल्या गणेशोत्सवात घरगुती गणपतीला सजवण्याची चढाओढ मराठी कुटुंबांमध्ये सुरू असते. या पाश्र्वभूमीवर नवनव्या संकल्पना राबविणाऱ्या एसजीएम ज्वेलर्स, दादर यांनी गणरायाचे नवनवीन दागिने बाजारात आणले आहेत. दागिन्यांबरोबरच गणपतीच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून देता येतील अशा विविध वस्तूही प्रथमच एसजीएमकडून बनविण्यात आल्या आहेत. हे सर्व दागिने व भेटवस्तू चांदी, सोने व एक ग्रॅम सोन्याच्या बनविल्या असून त्यांच्या किमती रु. १००० व त्या पुढे आहेत.