Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लूच्या अहवालाला विलंब होणार!
औरंगाबाद, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या संशयावरून एखाद्या रुग्णाचे नमुने घेतल्यानतंर ४८ तासांत त्याबाबतचा अहवाल येणे अपेक्षित असते. या वेळी मात्र ४८ तासांत अहवाल मिळण्याची शक्यता नसल्याचे वैद्यकीय

 

सूत्रांनी स्पष्ट केले.
पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी दोन हजारांवर नमुने दिले आहेत. प्रयोगशाळेची क्षमता लक्षात घेता अहवालासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रुग्णाचे नमुने घेतल्यानंतर कर्मचाऱ्याच्या हाती लगेच ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. लगेच तपासणी होऊन ४८ तासांच्या आत त्याचा अहवाल प्रश्नप्त झाल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात येतात.
शनिवारपासून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल ४८ तासांत म्हणजे सोमवारी प्रश्नप्त होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापि हे नमुने प्रयोगशाळेच्या प्रतीक्षायादीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी तर सोडाच पुढील शनिवारी या नमुन्यांचे अहवाल मिळाले तर उशिर झाला असे म्हणता येणार नाही, असे एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. संशयीत रुग्णांमध्ये नेमकी कशाची लक्षणे आहेत, हे कळण्यास विलंब होणार आहे. नव्याने संशयितांची नमुने पाठविण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.
पुण्याच्या प्रयोगशाळेची दररोजची क्षमता किती आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र स्वाइन फ्लूच्या या फैलावामुळे अधिक तज्ज्ञांची नियुक्ती करून लवकरात लवकर अहवाल कसा मिळेल, यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले.