Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

संसर्गजन्य वॉर्डाची सफाई वाढविण्यात यावी झ्र् दर्डा
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

सध्या स्वाइन फ्लूमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक चिंताग्रस्त झालेला आहे. स्वाइन फ्लूचा प्रश्नदुर्भाव होऊ नये म्हणून ओ.पी.डी. नंतर दुपारी एक ते दुसऱ्या दिवशी

 

आठपर्यंत अपघात विभागात तपासणी आणि औषधांची वेगळी व्यवस्था व्हायला हवी. तसेच संसर्गजन्य वॉर्डाची सफाई वाढविण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांना आमदार दर्डा यांनी पत्र लिहिले आहे. पुरेसे मास्क, टॅमीफ्लू गोळ्या आणि पुरेसे कर्मचारी पुरविण्यात यावेत, घश्यांच्या लाळीचे नमुने तातडीने पुण्याला पाठवावेत आणि त्याचे अहवाल तातडीने मागविण्यात यावेत आणि औरंगाबाद शहरात जनजागृतीच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना आमदार दर्डा यांनी केली आहे. औरंगाबाद शहरात महानगरपालिकेचे किमान चार रुग्णालये वेगवेगळ्या भागात २४ तास सुरू करण्यात यावेत. तेथील डॉक्टरांना गरज वाटेल त्या रुग्णांनाच शासकीय इस्पितळात पाठविण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेले दोन दिवस औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी आमदार दर्डा यांना काही त्रुटी जाणवल्या आहेत. त्या त्रुटींचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. संसर्गजन्य वॉर्डात दोन खोल्या स्वाईन फ्लूच्या संभाव्य रुग्णांसाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत चार खाटा आहेत. या ठिकाणी पुरेशा सवलती नसल्यामुळे बहुतेक रुग्ण तेथे भरती होण्यास नकार देतात. दोन वैद्यकीय अधिकारी आणि काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर शहरातील व बाहेरच्या रुग्णांचा ताण पडत आहे. रुग्णांचीसुद्धा गैरसोय होते. शासकीय इस्पितळात फक्त ५ एन. - ९५ मास्क पुरविले आहेत. तसेच चार रुग्णांना पुरतील इतक्याच टॅमीफ्लूच्या ४० गोळ्या पुरविल्या आहेत. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.