Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बिग बझारमध्ये उद्यापासून ‘५ दिवस महाबचत’
औरंगाबाद, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

बिग बझारने वार्षिक राष्ट्रीय योजना ‘५ दिवस महाबचत’ स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आणली आहे. बुधवारी (दि.१२) सुरू होणाऱ्या या योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन बिग

 

बझाने केले आहे.
ही ऑफर सर्वच विभागांतील वस्तूंवर उपलब्ध असून त्यात अन्नधान्य, कपडे, पादत्राणे, खेळणी, लगेज, स्वयंपाकघरातील वस्तू, बेड, होम डेकोर, बाथरूम साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश असेल. बिग बझारचे देशभरात ११६ स्टोअर्स आहेत आणि सर्व ठिकाणी १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत महाबचत योजना राबविण्यात येईल. योजनेचे हे चौथे वर्ष आहे. लाखो ग्राहकांसाठी ‘व्हॅल्यू शॉपिंग’ संकल्पनेचा एक भाग ठरलेल्या या योजनेची प्रतीक्षा ग्राहक करीत असतात, असा विश्वास बिग बझार कन्सेप्ट विभागाचे अध्यक्ष सदाशिव नायक मानतात.
यंदाची महाबचत योजना आधीपेक्षा मोठी आहे. प्रत्येक घरासाठी अत्यंत आकर्षक ऑफर देऊ केल्या आहेत. स्वागत बेडरूम सेट ९९९९ रुपयांत, इन्टेल प्रश्नेसेसरसह एस्सर लॅपटॉप १९ हजार ९९० रुपयांत, फोर्ब्स यूव्ही वॉटर प्युरीफायर ३९९० रुपयांत, तिलडा खूश लांब ग्रेन तांदळाचे पाच किलो पॅक- फॉच्र्युन तेल पाच लिटर जार आणि पाच किलो साखर पाकीट केवळ ५७९ रुपयांत, पुरुषांची ५९९ च्या जीन्सवर एक जीन्स मोफत, ७९९ च्या साडीवर दोन साडय़ा मोफत, तीन माईल स्टोन ट्रॉलीज सेट ३२९९ रुपयांत अशा ऑफर्स आहेत, अशी माहिती असिस्टन्ट स्टोअर मॅनेजर सोहेल खाजा यांनी दिली.
सहा महिन्यांपासून योजनेची तयारी केली जाते आणि आलेल्या आपल्या प्रत्येक ग्राहकाला याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो, असा विश्वास मार्केटिंग मॅनेजर सोनाली पाध्ये यांनी व्यक्त केला. योजनेदरम्यान ५५ लाखांहून अधिक ग्राहक देशभरातील बिग बझारमध्ये खरेदीचा आनंद घेतील. यावेळी योगेश थोरात उपस्थित होते.