Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

हिंगोली विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी
हिंगोली, १० ऑगस्ट/वार्ताहर

विधानसभेचा हिंगोली मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय जनता पक्षाची जागा गेल्या निवडणुकीत शिवसेनेला सुटली. शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. लोकसभा व

 

विधानसभा शिवसेनेला सोडल्याने भा.ज.प.च्या कार्यकर्त्यांत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंगोलीची जागा भा.ज.प.ला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू असल्याचे संकेत मिळाल्याने पक्षाच्या जिल्हास्तरीय पदादिकारी, कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
हिंगोली विधानसभेवर भाजपचे बळीराम कोटकर दोन वेळा निवडून आले होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाअंतर्गत वादामुळे भाजपच्या वरिष्ठांनी जागाच शिवसेनेला सोडून दिल्याने माजी आमदार बळीराम कोटकर यांनी भाजपला जय श्रीराम ठोकून निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांचा पराभव झाला मात्र पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले. परंतु जि.प. सदस्य तानाजी मुटकुळे यांनी गेल्या साडेचार वर्षात विविध कार्यक्रमांतून भाजपाचे संघटन मजबूत केले. याची दखल घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी तानाजी मुटकुळे यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे.
पक्षाचे प्रदेश सचिव सुरजीतसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भा.ज.प.मध्ये प्रवेश केला. यासाठी बाबाराव बांगर यांनी प्रयत्न केले. पक्षाच्या जेलभरो आंदोलनानिमित्त जमलेला हजारोंचा जमाव चर्चेचा विषय बनला होता. जेलभरो आंदोलनाच्या निमित्ताने भा.ज.प.ने केलेल्या शक्ती प्रदर्शनाची दखलज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. बापूसाहेब करमळकर यांनी घेऊन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.