Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन..!
शाळेचे तिसरीचे वर्ष संपले. उन्हाळ्याच्या सुट्टीत इतर मैत्रिणी भातुकलीचा खेळ मांडून बसलेल्या असतानाच अपूर्वाला दोरीच्या मल्लखांबाने भुरळ घातली होती. ती मल्लखांबाच्या प्रेमातच पडली होती म्हणा ना! तिथपासून अविरत कष्ट, जिद्द आणि भरपूर उत्साह यांच्या जोरावर आज तिने यशाचे शिखर गाठले आहे. अपूर्वा उदय सुर्वे मल्लखांब क्रीडा प्रकारात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २००७-०८ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. ती जुहू येथील एस. व्ही. टी. महाविद्यालयाच्या होम सायन्सची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

आगे सारा आसमान अभी बाकी है..!
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची नावे जाहीर झाली आणि गोरेगावच्या लक्षधाम शाळेत क्रीडा प्रशिक्षक असलेल्या कल्पेश जाधवचा फोन खणखणू लागला. मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी २००७-०८ चा सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला हा सन्मान मिळाला होता. मालाड येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबियांसाठी अभाळ ठेंगणे झाले होते. तू या खेळाकडे कसा वळलास? असं विचारताच कल्पेशऐवजी त्याची आईच म्हणाली, ‘लहानपणापासूनच त्याला खेळाचे आकर्षण होते. घरात उडय़ा मारत राहण्यापेक्षा व्यायामशाळेत गेला तर त्याला एक चांगली दिशा मिळेल या विचाराने पहिलीत असतानाच प्रयोग मालाड व्यायामशाळेत दाखल केले.

ऑनलाइन कॅट!
या वर्षीपासून IIM (Indian Institute of Management) या संस्थेने CAT (Common Admission Test) ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरविले आहे. दरवर्षी संपूर्ण देशातून या स्पर्धेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. ही परीक्षा कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी देऊ शकतो. या परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान, गणित अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जातात व प्रत्येक प्रश्नासाठी त्यांना चार पर्याय दिले जातात. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा व GDPI च्या मार्कावरून IIM मध्ये प्रवेश मिळतो. या पद्धतीमुळे परीक्षा घेण्याची प्रक्रिया सोपी जाईल. कारण आधी परीक्षा एकाच तारखेला, एकाच वेळी संपूर्ण देशात घेतली जात होती.

दिल से..
प्रिय सावनी,

कालच ‘लव्ह आज कल’ पाहिला. पिक्चर तसा काही खास नाहीये, पण काही सीन अप्रतीम झालेयत. त्यातल्या हरलीन कौर म्हणून एक अतिशय गोड कॅरेक्टरच्या सध्या मी प्रेमात पडलोय. (पण तुला घाबरण्याची गरज नाही) I wish we would have watched this movie together. I am really missing you dear तुझी तक्रार अगदी योग्य आहे. I am very sorry for that. आजूबाजूचं वातावरण व चर्चेमुळे स्वत:बद्दल विचार करायचाच जवळपास विसरूनच गेलो होतो. तुझं पत्र वाचलं आणि तुझी आठवण येऊन खूप रडलो. वाटलं तू जवळ का नाही आहेस. अचानक एकटं असल्यासारखं वाटायला लागलं. बाहेर जोरात पाऊस पडत होता पण तसाच काही न घेता भिजत सरळ रस्त्याने चालू लागलो. खूप रडू येत होतं.

आयआयटीचे टॉपर्स म्हणतात..
कुणाला सौरऊर्जेची यंत्रणा तयार करायची आहे, कुणाला ‘हाय एनर्जी फिजिक्स’मध्ये आवड आहे, तर कुणी पुढील सहा महिने आपल्या प्रश्नध्यापकांसोबत त्यांच्या प्रश्नेजेक्टमध्ये काम करणार आहे, अशी इच्छा आयआयटीमधील टॉपर्सनी व्यक्त केली आहे. नुकताच पार पडलेल्या आयआयटीच्या दीक्षांत समारंभात सुमारे १,६१६ विद्यार्थ्यांनी ‘मी माझ्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी करेन’ अशी शपथ घेतली. या विद्यार्थ्यांना नेमके काय वाटते, त्यांची करिअरची दिशा नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी काही पदकप्रश्नप्त विद्यार्थ्यांशी नीरज पंडित यांनी साधलेला हा संवाद.

रुईयाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
आपत्ती व्यवस्थापन हे कार्य फक्त शासनापुरते मर्यादित नसून, समाजातील प्रत्येक घटकाने ते आत्मसात केले पाहिजे आणि हाच ध्यास घेतला आहे रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने. आपल्या नवनवीन कल्पक योजनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रुईया एन.एस.एस.ने या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला असून त्याद्वारे स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडे दिले जात आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांमधून इतरांची व स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी हे या शिक्षणाद्वारे विद्यार्थी आत्मसात करतात, याच कक्षांतर्गत ‘फ्लोट मेकिंग’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या व जाळीने तयार केलेले हे फ्लोट संकटसमयी ९० किलो वजन पाण्यामध्ये वाहू शकतात. दैनंदिन वापराच्या बाटल्यांद्वारे जीवनरक्षक उपकरण तयार करून रुईया एन.एस.एस.ने एक नवीन पर्व सुरू केले आहे. हे फ्लोटस् विद्यार्थ्यांनीच तयार केले असून, अगदी माफक खर्चात हे फ्लोटस् तयार केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे व त्यात रुईयाचा हा विभाग सचोटीस खरा उतरला आहे.
कॅम्पस मूड प्रतिनिधी