Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

संप आणि बंद
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा
नागपूर, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयातील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी संपावर गेल्याने सोमवारी राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये बंद होती. शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. राज्य शासनाने विभिन्न विभागांमधील कर्मचाऱ्यांना भरभरून वेतनवाढ दिली आहे. मात्र ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न अनेक वषार्ंपासून प्रलंबित आहे. त्यांना किमान वेतन मिळावे, अशी मागणी ग्रंथालय संघाने यापूर्वी वेळोवेळी राज्य शासनाकडे लावून धरली, मात्र त्याला आजवर प्रतिसाद मिळालेला नाही.

विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी भाजपचीही आज जिल्हानिहाय मॅरेथॉन बैठक
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भाच्या ४१ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी उद्या, मंगळवारी सर्व जिल्ह्य़ातील पदाधिकारी आणि नेत्यांना बोलावले आहे. सोबतच इच्छुकांचीही चाचपणी करण्यात येणार आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेश प्रभारी खासदार कप्तानसिंग सोलंकी, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सहसंघटन सचिव सतीश वेलणकर, प्रदेश संघटन सरचिटणीस रघुनाथ कुळकर्णी आणि सचिव आमदार अशोक मानकर यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजतापासून रवीभवनात जिल्हानिहाय मॅरेथॉन बैठक होणार आहे.

दहीहंडीसाठी गोविंदा पथकांनी बाशिंगे बांधली
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

कृष्णजन्मोत्सव सोहोळ्यानिमित्त विदर्भात १३ ऑगस्टला विविध धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांसोबतच दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाची तयारी मोठय़ा उत्साहात सुरू आहे. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच शहरातील कृष्ण मंदिरांमध्येही मोठय़ा प्रमाणावर जन्माष्टमी साजरी केली जात असून त्यासाठी लागणारे रंगीबेरंगी माठ व अन्य पुजा साहित्याने बाजारपेठही सजली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने १३ ऑगस्टला वर्धा मार्गावरील गोरक्षण मंदिरातून श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ राहणार आहेत. गोरक्षण मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रश्नरंभ होणार आहे.

स्वाईन फ्लूविरुद्ध लढा
नागपूर, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

प्रशासनाने कंबर कसली
रुणांची तपासणी स्वतंत्र इमारतीत
काळाबाजार करणाऱ्यांना इशारा
नागपूर शहरात अद्याप स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. तथापि, स्वाईन फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरादारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरून न जाता, याचा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. शहरात आतापावेतो २६ संशयित रुग्णांच्या लाळेचे आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

खाजगी शाळा, महाविद्यालये बंद
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

शासनाने खाजगी अनुदानित शाळा व महाविद्यालयांचे थकित वेतनेतर अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पुकारलेल्या आंदोलनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद लाभला. नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह इतरही जिल्ह्य़ातील शैक्षणिक संस्थांच्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा आज सुरू होत्या. शाळांचे थकित अनुदान त्वरित मिळण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने शाळा बंद ठेवण्याचे आवाहन सर्व शिक्षण संस्था चालकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत नागपूरसह विदर्भातील शैक्षणिक संस्थांशी सबंधित असलेल्या शाळा आज बंद होत्या. शनिवारीच याबाबत संस्थांनी त्यांच्या शाळांना सूचना दिल्याने आज विद्यार्थी शाळेत आलेच नाही. महापालिका, जिल्हा परिषद आणि कायम विनाअनुदानित तत्वावर चालणाऱ्या शाळाच आज सुरू होत्या. ग्रामीण भागात या संपाची तीव्रता अधिक होती. शहरात मात्र ती जाणवली नाही. संप यशस्वी झाल्याचा दावा मंडळाचे अध्यक्ष देवीसिंह शेखावत यानी केला आहे.

ललित कला भवनात उद्यापासून राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव
नागपूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नामांतराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इंदोरातील ललित कला भवनात येत्या १२ व १३ ऑगस्टला राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा ठिकाणाहून राज्यस्तरीय स्पध्रेत पुरस्कारप्रश्नप्त समरगीत, लोकनृत्य, भजन, सुरश्री, लावणी तथा औद्योगिक व व्यावसायिक नाटय़ स्पध्रेतील प्रथम क्रमांक प्रश्नप्त ‘४७ एके ४७’ या नाटकाचा प्रयोग आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ललित कला भवनात पुनर्बाधणी केलेल्या सभागृहाचा उद्घाटन समारंभसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. १२ ऑगस्टला दुपारी २ वाजता माजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी कामगार राज्यमंत्री व मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत उपस्थित राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर माया इवनाते, विभागीय आयुक्त संजीवकुमार, पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, दक्षिण मध्य सांस्कृतिक संचालनालयाचे निर्देशक जे.पी. गुप्ता उपस्थित राहतील, असे नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त पुरुषोत्तम इखार यांनी केले आहे.

दशनाम गोस्वामी समाजातील गुणवंत व समाजसेवकांचा सत्कार
नागपूर,१० ऑगस्ट / प्रतिनिधी

सनातन दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने दशनाम गोस्वामी समाजातील मार्च २००९ या सत्रात दहावी व बारावीच्या परिक्षेत ५५ टक्क्याहून अधिक गुण प्रश्नप्त करणाऱ्या नागपूर विभागातील गुणवंतांचा सत्कार व समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दशनाम गोसावी समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत संस्थेचे कार्यालय सिद्धेश साई महिमा अपार्टमेंट, सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर, नागपूर येथे ११ ते ६ या वेळेत १४ ऑगस्टपर्यंत पाठवावी. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्र. २७४६४७७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव विजयगिरी गोस्वामी व सहसचिव रवींद्र भारती, डॉ. अविनाश भारती यांनी केले आहे. तसेच, दिवं. बापू गिरी स्मृती पुरस्कार सन २००९मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराच्या अधिक माहितीकरता निश्चल शांतिक पुरी यांच्याशी ९३२५५२५५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन योगेश बन यांनी केले आहे.

राजगृहसंस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

राजगृह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुभाषनगरातील समाज भवनात पश्चिम नागपुरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या प्रश्न. लता गजभिये व प्रमुख पाहुणे म्हणून प्रश्न.डॉ. गौतम कांबळे, माजी महापौर विकास ठाकरे, भैय्याजी खेरकर होते. या कार्यक्रमात ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यापैकी अत्यंत गरीब असलेल्या दोन विद्यार्थ्यांना मिलिंद वासनिक यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये रोख मदत देण्यात आली. पाल्यांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी जीवघेण्या चढाओढीतून बाहेर पडून त्यांची आवड कशात आहे, याचा पालकांनी विचार करून योग्य मार्गदर्शन करायला हवे, असे मत प्रश्न.डॉ. गौतम कांबळे यांनी व्यक्त केले. अनिल कांबळे यांनी संस्थेच्या आजवरच्या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीबद्दल सांगितले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक संस्थेचे अध्यक्ष रमेश गोंडाणे यांनी केले. शुद्धोधन बडवने यांनी आभार मानले.

ज्ञानविकास महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन
नागपूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

कुंभार जसे मडके घडवतो तसेच, शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. विद्यार्थी घडवताना कुंभाराप्रमाणेच आतून हाता देऊन वरून थोपटावे देखील लागते, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाचे सचिव सी.आर. बोरकर यांनी व्यक्त केले. ज्ञानविकास माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील नूतनीकृत संगणक कक्षाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश मारवडकर होते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी व्ही.व्ही. मेश्राम यांनी दहावीनंतरच्या विविध व्यवसायोन्मुख कोर्सेसची माहिती दिली. तसेच, शाळेत चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. याप्रसंगी पहिली ते नववीपर्यंतच्या प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या शिक्षकांच्या शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के राहिला अशा नीरजा नायक, विनोद नखाते, नरेंद्र चिचमलकर, उत्तम मेश्राम यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक व संचालन सुनील नायक यांनी केले.

गळफास लावून तरुणाची आत्महत्या
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विवेक केशव झोडपे (रा. नासुप्र संकुल, रघुजी नगर) हे त्याचे नाव आहे. घराच्या न्हाणीघरातील शॉवरला त्याने ओढणीने गळफास घेतला़ हे समजताच हुडकेश्वर पोलीस तेथे गेले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. विवेक मनोरुग्ण होता़ या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली़
दुर्गा प्रकाश अलोणे (रा. जगदीशनगर झोपडपट्टी) या महिलेचा सोमवारी दुपारी पाऊण वाजता मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती पेटली होती. आशीष अशोक नाईक (रा. कृष्णा नगर) याचा रविवारी रात्री साडेअकरा वाजता मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर एक वाजताच्या सुमारास तो पेटला होता. या दोन्ही प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आधारतर्फे रविवारी ‘ही वाट दूर जाते’
नागपूर, १०, ऑगस्ट / प्रतिनिधी

आधारतर्फे १६ ऑगस्टला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या काव्यजीवनावर आधारित ‘ही वाट दूर जाते’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे. निवेदिका मंगला खाडिलकर यांची संकल्पना, संहिता आणि प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक रवींद्र बिजूर आणि माधुरी करमरकर शांताबाईंच्या कविता आणि गीते सादर करणार आहेत. शांताबाईंच्या अलौकिक प्रतिमेवर प्रकाश टाकणारा आणि त्यांच्या स्मृतीना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन आधारतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शंभर आणि पन्नास रुपये देणगी प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून ११ ऑगस्टपासून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आयएमए सभागृहात प्रवेशिका मिळतील.

अपात्र शिक्षकांकडून पेपर तपासणी; प्रश्नचार्याची बैठक चहापानानंतर गुंडाळली
नागपूर, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या प्रश्नचार्याची बैठक नेहमीप्रमाणेच चहापान्याच्या कार्यक्रमानंतर समाप्त झाली. नवीन महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी ओळख एवढय़ापुरताच आजची बैठक मर्यादित राहिली, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बी.सी.ए.) आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (बी.सी.एस.) मध्ये नियमित प्रश्नध्यापक नसल्याने अपात्र शिक्षकांकडून पेपर तपासले गेल्याने बी.सी.ए. आणि बी.सी.एस. या अभ्यासक्रमांचे निकाल कमी लागल्याच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करून विद्यापीठासमोर आंदोलने केली. यासंदर्भात आज गुरूनानक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत कुलगुरू व प्र-कुलगुरूंची नेहमीच्या पठडीतील भाषणे पार पडली. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींनी (प्रश्नचार्य किंवा अध्यक्ष) त्यांच्या अडचणी सांगितल्या. कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी ताकीद देऊन आजच्या बैठकीत चहापानानंतर बैठक समाप्त झाली. नियमाप्रमाणे नवीन महाविद्यालयांना प्रथम संलग्निकरण देणे विद्यापीठावर बंधनकारक असल्याने संलग्निकरण दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठाला घ्याव्याच लागतील.

नभ प्रकाशनचे साहित्यिकांना आवाहन
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

नभ प्रकाशनच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी या चार भाषेतील स्वतंत्र कथा व काव्यसंग्रहासाठी कविता मागविण्यात येत आहेत. नभ प्रकाशनने अवघ्या दहा वर्षात मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी भाषेतील ५८५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये स्वतंत्र प्रकाशित होणाऱ्या प्रतिनिधिक कथासंग्रहात प्रकाशित केले जाणारे साहित्य हे जीवनमूल्य व सामाजिकमूल्यांना प्रेरित करणारे असावे. संग्रहात समाविष्ट केली जाणारी कथा ही ६०० शब्दांची असावी. चारही भाषांमध्ये वेगवेगळे कथा आणि कवितासंग्रह प्रकाशित केले जाणार आहेत. साहित्यिकांनी साहित्य १५ सप्टेंबरपूर्वी मिळेल, या बेताने नभ प्रकाशन, शामनगर, अमरावती या पत्त्यावर पाठवावे किंवा ९८६०१४५५०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाश मिलिंद डहाके यांनी केले.

प्रश्नध्यापकांचे आज जेलभरो आंदोलन
नागपूर, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून प्रश्नध्यापक उद्या जेलभरो आंदोलन करणार आहेत. सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच प्रश्नध्यापकांच्या समग्र मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. युजीसीने नेट-सेटधारक उमेदवारांची शिफारस केली असली तरी १९९१-१९९९ या कालावधीत नेट-सेट पात्रता परीक्षा कायद्याने लागू केली नव्हती, ही बाब विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केली आहे. म्हणूनच त्या कालावधीपासून सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तया नियुक्तीच्या दिनापासून स्थान निश्चितीकरता गृहित धरल्या पाहिजेत, अशी मागणी अद्यापही शासनाने मान्य केलेली नाही. त्यासाठी उद्याचे जेलभरो आंदोलन होत आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी सविनय कायदेभंग करून जेलभरो आंदोलन करणार असल्याचे नुटाचे सरचिटणीस डॉ. एकनाथ कठाळे यांनी सांगितले. दुपारी १२ नंतर नुटा कार्यालयापासून प्रश्नध्यापकांची रॅली निघेल. त्यात जास्तीत जास्त प्रश्नध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नुटातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे शिबीर स्थगित
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाकडे विशेषत नागपूरकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. उद्या, मंगळवारी होणारे शिबीर स्थगित झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या गुरुवारी नागपुरात येत आहेत. मात्र, त्यांच्या व्यस्त दौऱ्यात पक्षाचा एकही कार्यक्रम नाही, हे विशेष. शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक तयारीसाठी उद्या, मंगळवारी देशपांडे सभागृहात शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग आणि माजी मंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी मुंबईत बैठकांचा सपाटा सुरू झाल्याने नेत्यांचे दौरे रद्द झाले असून शिबीर स्थगित करण्यात आले आहे. जूनमध्ये विदर्भाचा मेळावा रद्द झाला, यानंतरही स्थानिक पातळीवरील मेळाव्यांसाठी नेत्यांकडून वेळ मिळाला नाही. शिबिरातील प्रमुख वक्ते प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांच्या महत्त्वाच्या बैठकांमुळे त्यांचा दौरा रद्द झाला असून शिबीर स्थगित करण्यात आल्याचे शहर अध्यक्ष अशोक धवड यांनी कळवले आहे.