Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

‘बम् बम् भोले’च्या गजराने दुमदुमली त्र्यंबकनगरी
नाशिक / प्रतिनिधी

‘ऊँ नम शिवाय’ च्या गजरात रविवार रात्री पासूनच त्र्यंबकनगरीत गर्दी केलेल्या भाविकांनी मध्यरात्रीनंतर परंपरेनुसार प्रदक्षिणा सुरू केली आणि त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण परिसर बम् बम् भोलेच्या घोषणांनी दुमदुमला. नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रासह दूरदूरहून आलेल्या भाविकांनी यंदाही नेहमीच्याच उत्साहात आपली परिक्रमा पूर्ण केली. सोमवारी दुपापर्यंत तीन लाखाहून अधिक शिवभक्तांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. परिसरात अधुनमधून पडणाऱ्या हलक्या पाऊस सरी तरुणांचा उत्साह वाढविण्यास कारणीभूत ठरल्या.

‘स्वाईन फ्लू’च्या प्रतिबंधासाठी स्थानिक प्रशासन गतिमान
प्रतिनिधी / नाशिक

दुसरा संशयित रुग्ण दाखल
खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी गर्दी
जाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना
प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांची रॅपिड अॅक्शन टीम
मास्क न मिळाल्यास रुमालाची घडीही उपयुक्त
राज्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दुसरा संशयित रुग्ण दाखल झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, साधा ताप, सर्दी यामुळे ग्रस्त असलेले १०० ते १२५ रुग्ण देखील आपल्या आजाराबाबत खातरजमा करण्यासाठी दररोज शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.

कुणी मास्क देता का मास्क !
‘स्वाईन फ्लू’च्या धसक्याने नाशकातही मास्कला प्रचंड मागणी
प्रतिनिधी / नाशिक

राज्यभरात सध्या खळबळ उडवून दिलेल्या ‘स्वाईन फ्लू’च्या धसक्याने नाशिककरांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क खरेदीला प्रश्नधान्य दिल्याच्या परिणामी शहरातील ‘मास्क’चा जवळपास सर्वच साठा संपुष्टात आला आहे. दरम्यान, या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारे ‘एन-९५’ मास्कचा येथे आधीपासून तुटवडा असताना आता इतर पर्यायी मास्कची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या अभूतपूर्व तुटवडय़ामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा मास्क मिळणे अवघड झाले आहे.

चांदवड येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा
मारहाणीत चार जखमी, हजारोंचा ऐवज लंपास
वार्ताहर / चांदवड

शहरातील घोडकेनगर व महालक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकताना लाठय़ा-काठय़ा व कोयत्याने बेदम मारहाण करून चार जणांना जखमी केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चांदवड बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या भागात मध्यरात्री हा दरोडय़ाचा प्रकार घडला. रात्री दीडच्या सुमारास वकील संघाचे अध्यक्ष दिनकर ठाकरे यांच्या घोडकेनगर येथील घरामध्ये चार दरोडेखोरांनी प्रवेश केला.

‘सिद्धीविनायक’ संस्थेच्या चौकशीची मागणी
वार्ताहर / जळगाव

येथे सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सिद्धीविनायक एज्युकेशनल अॅण्ड डेव्हलपमेंट संस्थेबद्दल शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली असून या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसापासून संस्थेचे कार्यालय बंदच असल्याचे सांगण्यात येते. शहरात गेल्या काही दिवसापासून सिद्धीविनायक एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट संस्थेव्दारा त्यांच्या प्रतिनिधी मार्फत पत्र लिहीणे हा घर बसल्या व्यवसाय करून दर महिन्याला दोन हजार रुपये कमवा असा प्रचार करण्यात येत आहे.

क. का. वाघ तंत्रनिकेतनचे यश
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून तृतीय वर्षात संकेत हुलगे यांनी ९२.५१ गुण मिळवत संस्थेत तसेच नाशिक विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला. यांत्रिकी विभागातील रोहित अग्रवाल व दिपक मदाने यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. एमएसबीटीई परीक्षेत द्वितीय वर्षात संदेश आंधळे हा ८७.५० गुण मिळवत महाविद्यालयात तर पहिल्या वर्षातील गौरव सोनवणे ८८.७३ टक्के गुण मिळवत प्रथम आला. इलेक्ट्रानिक्स व टेलिकम्युनिकेशनचा निकाल ९८ टक्के लागला. त्यामध्ये अंकिता चढ्ढा ८८ टक्के गुण मिळवत विभागात प्रथम आली. इलेक्ट्रीकल विभागाचा निकाल ९४.११ लागला असून त्यात अभिजीत कांकरीया ८१.९०, संगणक विभागाचा निकाल ९१.१७, त्यात नरिता पांन्धे ८३.५३, केमिकल इंजिनिअरींग ९७ टक्के - सायली चिडे ८७ टक्के, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी व सिव्हील इंजिनिअरींगचा निकाल अनुक्रमे ९७.२९ व ९१.८३ टक्के लागला. त्यात बॅटरीवाला अलिअसगर, मुर्तुझा बलियावाला विभागात पहिले आले.