Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

अकोल्यातील संशयित रुग्णांची संख्या ३
अकोला, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

सर्वत्र पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ ची दहशत अकोला परिसरातही असून, रविवारी रात्री दाखल झालेल्या संशयित रुग्णानंतर या रुग्णांची एकूण संख्या तीन झाली आहे. आकोट शहरातील अमीनपूर भागात राहणाऱ्या अब्दुल वहीद अब्दुल बशीर (३४) या रुग्णाला रविवारी रात्री ११.३० वाजता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या भिवंडी परिसरात कामानिमित्त गेलेले अब्दुल वहीद अब्दुल बशीर प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे अकोला येथे परतले.

नगरपालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
चंद्रपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी जिल्हय़ातील सात नगरपालिकेतील दोन हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्हय़ातील चंद्रपूर, मूल, राजुरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, वरोरा व भद्रावती या सात नगरपालिकेतील दोन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

लोकांच्या कामांना प्रश्नधान्य
श्रीनाथ वानखडे

शेतकऱ्यांबाबत असलेली आत्यंतिक तळमळ आणि युवक शक्तीवर असलेला विश्वास यामुळे चांदूर रेल्वे विधानसभा मतदारासंघातील समस्या सोडवण्यात आमदार प्रश्न. वीरेंद्र जगताप यांना यश प्रश्नप्त झाले. विकासाचे ‘नेक्स्ट व्हिजन’ म्हणून आगळीवेगळी ओळख त्यांनी मतदारसंघासोबतच अमरावती जिल्ह्य़ात निर्माण केली. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात केलेला प्रवेश, हिमाचलच्या राज्यपाल प्रभा राव यांचा आधार, कृषी क्षेत्रावर असलेले पहिले प्रेम यामुळेच राजकीय क्षेत्रात प्रश्न. जगताप यांनी ‘वजन’ निर्माण केले. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करत आमदार जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आणि मतदरसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला.

वणीत शिवसेनेचा तुतारी मोर्चा
वणी, १० ऑगस्ट / वार्ताहर

मारेगाव, वणी, झरीजामणी हे तीनही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, दुबार, तिबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, आदी अनेक मागण्यांसाठी आज वणी येथे शिवसेनेचे आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा ‘तुतारी मोर्चा’ काढण्यात आला. आमदार विश्वास नांदेकर आणि शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख श्रीकांत मुनगीनवार यांनी वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन पाठवले. आज दुपारी बारा वाजता स्थानिक पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावरून शिवसेनेचा ‘तुतारी मोर्चा’ निघाला.

बुलढाण्यात मनसेची ‘भीक मांगो’ दिंडी
बुलढाणा, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिजामाता सहकारी कारखान्याची झालेली दुरवस्था, खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी वाटपातील असमतोल व अन्य प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय सहाय्यक विठ्ठल लोखंडकार व जिल्हा परिषद सदस्य विनोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली धुसरबीड ते बुलढाणा अशा दीडशे कि.मी. पायी ‘भीक मांगो’ दिंडी काढण्यात आली. दिंडीचे आज बुलढाण्यात आगमन झाले त्यावेळी दिंडीत जिल्ह्य़ातील हजारो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेड राजा मतदारसंघातील जिजामाता सहकारी साखर कारखाना आता शेवटच्या घटका मोजत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्रह्मपुरीत निर्धार मेळावा
ब्रह्मपुरी, १० ऑगस्ट/ वार्ताहर

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. प्रश्नथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या निर्धार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उद्धव शिंगाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळासाहेब साळुंके उपस्थित होते. ज्या उमेदवाराला निवडणूक लढण्याची संधी प्रश्नप्त होईल, त्याच्या पाठीशी एकदिलाने सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे राहतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. ब्रह्मपुरी मतदारसंघासाठी अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रकाश मारकवार, उद्धव शिंगाडे व दामोदर मिसार हे इच्छुक उमेदवार आहेत. या मेळाव्याला हे सर्व उमेदवार हजर होते. या सर्वानी श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे शपथेवर जाहीर केले. याप्रसंगी रमेश बनपूरकर, हरिदास लाडे, प्रश्न. रवी रणदिवे, प्रश्न. प्रकाश बगमारे, दमयंती बागडे, संचिता मेश्राम, किशोर भोयर, पंकज तुमाने, नरेंद्र तांगडे, सुनील बोमनवार, गणेश नवलाखे, सचिन पंचभाई, दीपक डेंगे, मारोतराव मेश्राम, नामदेव लांजेवार आदी उपस्थित होते.

बसच्या धडकेने तरुण ठार
भंडारा, १० ऑगस्ट / वार्ताहर

जवाहरनगरजवळील नांदोरा येथून सर्पेवाडाला परतणाऱ्या एका तरुणाच्या सायकलला भरधाव बसने मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नांदोरा येथे बहिणीकडे राखी बांधावयासाठी निखिल नंदकिशोर रामटेके (१८) हा तरुण आपला मित्र सुरेश ईश्वर कुंभरे (१८) याला सोबत घेऊन गेला होता. राखी बांधून सर्पेवाडाला सायकलने परतत असताना शहापूरनजीक भरधाव बसने (क्र. एम.एच.३१/एपी-९४२८) सायकलला धडक दिली. यात सायकल चालक सुरेश कुमरेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सायकलवर मागे बसलेला निखिल रामटेके हा जबर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघातानंतर चालकाने थेट बसस्थानक गाठले व बस ठेवून पसार झाला. या प्रकरणाची जवाहरनगर पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस कर्मचारी अश्विनकुमार मेहर, हेमणे करीत आहेत.

भाद्रपद महोत्सव २२ ऑगस्टपासून चंद्रपुरात
चंद्रपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

श्री रामदेव बाबा यांचा भाद्रपद महोत्सव येत्या २२ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भाद्रपद शुक्लद्वितीया ते दशमीपर्यंत विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला असून २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबीर होणार आहे. २२ ऑगस्ट भाद्रपद शुक्ल द्वितीयेच्या दिवशी सकाळी घटस्थापना व अभिषेक करण्यात येईल. दररोज सकाळी पूजा अर्चना व रात्री ८.३० वाजता महाआरती करण्यात येईल. रविवारला दशमीच्या दिवशी संध्याकाळी रामदेव बाबा यांची शोभायात्रा काढण्यात येईल. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रामदेव बाबा मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तसंक्रमण विभागाचे कर्मचारी रक्तसंग्रह करतील. जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र खजांची, सचिव सत्यनारायण तिवारी, कोषाध्यक्ष सुधीर बाढीया, निर्दोष पुगलिया, शांतीकुमार जैन, प्रकाश कोठारी, मुरलीमनोहर व्यास, प्रकाशचंद्र अग्रवाल, जयचंद पुगलिया आदींनी केले आहे.

झाडे स्मृती पुरस्कारांचे वितरण
उमरेड, १० ऑगस्ट / वार्ताहर

सी.मो. झाडे स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंतांचा सत्कार नुकताच येथे करण्यात आला. उद्घाटक आमदार राजेंद्र मुळक होते. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप गवई, राजू पारवे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रश्न. म.द. माजगावकर होते. या कार्यक्रमात एस.एस.सी.त प्रथम आलेल्या सुरभी गोतमारे व एच.एस.सी. मधून प्रथम आलेली पल्लवी कामडी या विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन राजेंद्र मुळक व संदीप गवई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी आमदार मुळक यांनी उमरेड तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवन बांधकामासाठी साडे सात लाख रुपये देण्याची घोषणा केली. प्रश्न. म.द. माजगावकर यांच्या हस्ते शाळ-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मुळक यांचा सत्कार करण्यात आला. तर उमरेड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक म.द. माजगावकर यांनी ७६व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचाही शाल-श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन सुरेश बोरकर यांनी केले तर प्रश्नस्ताविक जिल्हा अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी केले. संचालन के.के. मिश्रा यांनी केले. आभार यू.व्ही. सिंह यांनी मानले. या कार्यक्रमानंतर पत्रकाराची कार्यशाळा झाली. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, भगवान लांडगे यांनी मार्गदर्शन केले.

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन क्रीडांगण
चंद्रपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील छोटूभाई पटेल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला. यावेळी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागातर्फे नवनिर्मित क्रीडांगणाला पाहुण्यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री व सरदार पटेल स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर वेकोलि क्षेत्राचे अध्यक्ष व महाव्यवस्थापक गर्ग, सचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सिंग, सक्सेना, मुखर्जी, तिवारी, रमेश मामीडवार, निनाद गड्डमवार, विनोद दत्तात्रय, ठाकूर उपस्थित होते. या भेटीत विद्यार्थ्यांशी क्रीडांगणावरील समस्या जाणून घेण्यात आल्या. गर्ग यांनी वेकोलितर्फे भविष्यात क्रीडांगणावर आधुनिक सोयीसुविधा देण्याचे आश्वासन दिले.

भारतीय परंपरा व मूल्यांचा सन्मान -शिवाचार्य महाराज
चिखली, १० ऑगस्ट / वार्ताहर

हा वैयक्तिक स्वरूपात माझा नव्हे तर भारतीय थोर परंपरा व मूल्यांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. चिखली अर्बन बँकेच्या ४८ व्या आमसभेत बँकेच्यावतीने देण्यात येणारा दुसरा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. बँकेचे ज्येष्ठ संचालक माणिकलाल लाहोटी यांनी प्रश्नस्ताविक केले. शिवाचार्य महाराजांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. ‘मनुष्य संस्काराने घडवला जातो व संतांचे विचार संस्कारातून समाज घडवतो’, असे सांगून राजकारण्यांनी नव्हे तर साधू-संतांनी हा देश घडवल्याचा दावा शिवाचार्य महाराजांनी केला. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी लवकरच बँकेच्या सर्व १६ शाखांमध्ये ‘कोर बँकींग’ सुरू करीत असल्याचे यावेळी जाहीर केले. बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त यावर्षीपासून व्याख्यानमाला आयोजित करण्याचीही घोषणा त्यांनी केली. चाळीसगाव येथील राजलक्ष्मी नागरी बँक व धुळे येथील पीपल्स सहकारी बँक यांच्या विलीनीकरणास या आमसभेत मान्यता घेण्यात आली. वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखा प्रमुखांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

पश्चातापाच्या अग्नीत चुकांची आहुती द्या स्वामी अनंतराज यांचा कैद्यांना उपदेश
यवतमाळ, १० ऑगस्ट / वार्ताहर

कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या आणि आरोपी असलेल्या कैद्यांच्या जीवनातील नैराश्य दूर करून, कळत न कळत त्यांच्याकडून झालेल्या अपराधांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी गेल्या सहा वर्षापासून अखंडपणे दर महिन्याच्या दुसऱ्या व चवथ्या शनिवारी यवतमाळातील कारागृहात सकाळी बरोबर आठ वाजता हजर राहून प्रवचन देणाऱ्या स्वामी अनंतराज बिडकर यांनी ‘सेवाव्रती कर्मयोगी’ ही उपाधी सार्थ केली आहे. रक्षाबंधनानिमित्त स्वामी अनंतराज यांनी कैद्यांसमोर दिलेल्या प्रवचनात सांगितले की, कारागृहातील जीवन अल्पकाळ आहे, जीवनात हाही अनुभव घेणेही तुमची नियती आहे. चांगले कर्म करा, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पश्चातापाच्या अग्नीत आपल्या चुकांची आहुती द्या आणि सन्मानाने नव्या उमेदीने पुन्हा जीवन उन्नत करा, असा उपदेश अनंतराज महाराज यांनी केला. महानुभाव पंथीयांचे तीर्थस्थान समजल्या जाणाऱ्या जांभोरा येथून यवतमाळच्या कारागृहात गेल्या सहा वर्षापासून ते अखंडपणे प्रवचन देत आहेत. या कार्यक्रमात पत्रकार न.मा. जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी कारागृह अधीक्षक डी.जी. पवार, सामाजिक कार्यकर्ते मोहन साठवणे, उज्ज्वला भाविक, अमोल ढोणे, पप्पू गावंडे, रत्नमाला उपगानलावार आदी उपस्थित होते. ज्या ३९५ कैद्यांसमोर अनंतराज यांनी प्रवचन दिले, त्यात काही आरोपी अधिकारी व डॉक्टर्सही होते. ते सारेच प्रवचनाने भारावून गेले.

कारागृहातील बंदीकरिता प्रशिक्षण कार्यशाळा
चंद्रपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

‘युक्ती’ मल्टीपरपज सोसायटीच्यावतीने कारागृहातील बंदींसाठी ‘संवाद व उद्योग जगत’ या विषयावर कार्यशाळा जिल्हा कारागृहात नुकतीच पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘एमईएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. पाल, उपमुख्य व्यवस्थापक त्रिपाठी, सहाय्यक व्यवस्थापक चक्रवर्ती उपस्थित होते. बंदीवानांनी कारागृहातील वेळ हा सत्कारणी व आपले वाईट विचार त्याज्य करण्यासाठी लावावा, असे त्रिपाठी यांनी सांगितले. चक्रवर्ती यांनी समाजाचा बंदीवानांविषयीचा असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी स्वत:त सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात आयटीआयचे प्रश्नचार्य सुशील बुजाडे यांनी विचार व्यक्त केले. कारागृह अधीक्षक वासनिक यांनी उद्योग जगताने होतकरू बंदीवानांना त्यांची शिक्षा झाल्यावर आपल्यात सामावून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन कारागृहातील मोहिते यांनी केले. आभार संस्थेच्या अध्यक्ष अनुपमा नगरकर यांनी मानले.

मुरलीधर देवस्थानची जमीन ‘कुळा’तून मुक्त
उमरेड, १० ऑगस्ट / वार्ताहर

उमरेड येथील सर्वात जुने मुरलीधर देवस्थान यांच्या मालकीची उदासा येथील शेती न्यायालयाच्या आदेशाने कुळातून मुक्त होऊन देवस्थानाच्या ताब्यात आली आहे. या संबंधात सविस्तर माहिती अशी मुरलीधर देवस्थानचा मालकीची उदासा या गावची सुमारे १२ एकर जमीन विश्वस्त मंडळाने डोमा दरणे या शेतकऱ्यास ६० वर्षापूर्वी कसारावर दिली होती. कुळ कायद्याचा आधार घेऊन त्यांनी ती जमीन स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावे कुळात लावून आपल्या ताब्यात घेतली होती. देवस्थानच्या शेतीला कुळ कायदा लागू नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात जमीन देवस्थानाला परत मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्यावर देवस्थानच्या बाजूने निकाल लागल्याने शासनाकडून तब्बल ६० वर्षानंतर देवस्थानला त्याच्या मालकीच्या जमिनीचा ताबा मिळाला. या खटल्यात देवस्थानाकडून अ‍ॅड. पिंपळकर यांनी काम पाहिले. ताबा घेताना कुळाच्या नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस कार्यवाहीपुढे त्यांना नमते घ्यावे लागले.

देवानंद लोणारे यांना विशेष सेवा पदक
अचलपूर, १० ऑगस्ट / वार्ताहर

नक्षलवाद विरोधी मोहिमेत सक्रिय भाग घेऊन लढा देणारे अचलपूर येथील पोलीस उपनिरीक्षक देवानंद लोणारे यांच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. येत्या १५ ऑगस्टला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल अचलपूर पोलीस ठाण्यात तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
देवानंद लोणारे यांनी मार्च २००५ मध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्य़ात भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत त्यांची नियुक्ती करण्यात आली. मन्न्ोराजाराम या गावात त्यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन नक्षलवाद्यांविरुद्ध जनजागृती केली. नक्षलवाद्यांशी त्यांनी अनेकदा सामना केला. शासनाने प्रदान केलेल्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून नक्षलवाद्यांना पिटाळून लावण्यात यांनी महत्त्वाची भूमिका वठवली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. याबद्दल प्रभारी ठाणेदार गजानन शेळके, ठाणेदार रमेश तायवाडे, विश्वास गवई, दिलावरखां हुसेनखां, माजी नगराध्यक्ष नरेंद्र फिसके, फिरोजखान, डॉ. मदन बिसने, मिलिंद तोरो, रज्जाक खान, संजय अग्रवाल आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चर्मकार समाजाची भंडारा शहरात आकर्षक मिरवणूक
भंडारा, १० ऑगस्ट / वार्ताहर

पारंपरिक पद्धतीने ‘गौर’ डोक्यावर घेतलेल्या महिला, सजवलेल्या घोडय़ांवर देवदेवतांच्या रूपात स्वार पुरुष व ढोल-शहनाईच्या गर्जनेत शहरात निघालेली चर्मकार समाजाची मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरले. संत रविदास नगरातील संत शिरोमणी रविदास महाराजांच्या मंदिरातून महाराष्ट्रीय चर्मकार संघाच्यावतीने ही मिरवणूक काढण्यात आली. मनोहर खरोले, नरेंद्र भोंडेकर, गोवर्धन चौबे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार मेश्राम यांनी मंदिरात केलेल्या पूजनानंतर ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीचे नेतृत्व महाराष्ट्रीय चर्मकार संघाचे तालुका अध्यक्ष कैलास जगवीर व उपाध्यक्ष पृथ्वीराज तांडेकर यांनी केले. महिला आघाडीचे नेतृत्व कविता खरोले, सुनीता चौबे, सुशीला तांडेकर, लक्ष्मी तांडेकर यांनी केले. या मिरवणुकीत कैलास तांडेकर, यादोराव चौबे, भीमराव कुंभरे, युवराज बर्वे, संजू बर्वे, रुस्तम तांडेकर, प्रभाकर बर्वे, रमेश खरोले, ललित चौबे, मुलचंद बर्वे, शरद तांडेकर, देवानंद भोंडेकर, मुकेश झाडे, विनोद कनोजे सहभागी झाले होते.

प्रकल्पग्रस्तांची भरपावसात निदर्शने
भंडारा, १० ऑगस्ट / वार्ताहर

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने नवेगाव विर्सी येथे नदीच्या काठावर भरपावसात निदर्शने करण्यात आली. सरकारने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, जगण्याचे पर्यायी साधन उपलब्ध करून द्यावे, पर्यायी जमीन देण्यात यावी किंवा एकमुस्त आर्थिक अनुदानाचे पॅकेज द्यावे, नोकऱ्या द्यावा अथवा पाच लाख रुपये द्यावे, पुनर्वसन केल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नये, आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. घोषणा देत प्रकल्पग्रस्त चिखल तुडवत नदीकाठावर आले. पोलिसांनी मोर्चा अडवताच निदर्शने करण्यात आली. यावेळी विलास भोंगाडे, प्रदीप खोब्रागडे, जगदीश गाढवे, राजाराम डुंभरे, अंगद ठाकरे, राजकुमार गाढवे, विश्वनाथ देशमुख, विनोद गणवीर, दिलीप डुंभरे उपस्थित होते. राज्य सरकार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे. पुनर्वसन केल्याशिवाय धरणात पाणी अडवत आहे. त्याकरिता प्रकल्पग्रस्त आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला. यानंतर कुहीचे नायब तहसीलदार जोधे, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उपविभागीय अधिकारी वगाडे, ठाणेदार मडावी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.