Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

रंगुनि रंगांत साऱ्या..!
नटाला आवश्यक छापपाडू व्यक्तिमत्त्व नाही; लेखक म्हणून चेहऱ्यावर जे बुद्धीचं तेज असायला हवं, तेही नाही; नजरेत दिग्दर्शकाची जरब वा दबदबा नाही.. आणि तरीही अरुण होर्णेकर हा माणूस हे सगळं काही आहे. एक, दोन नव्हे, गेली तब्बल पस्तीसेक वर्षे! शिवाजी मंदिरच्या तिकीट खिडकीपाशी कुणाशीतरी गप्पा मारत उभे असलेले वा एखाद्या नाटकाला बसलेले अरुण होर्णेकर नेहमी भेटत असतात. त्यांच्याशी ‘काय कसं काय, बरं आहे ना?’ यापलीकडे सहसा संवाद घडत नाहीत. बघितलेल्या नाटकावर कॉमेन्ट करताना ते दिसत नाहीत. सगळी नाटकं मात्र ते आवर्जून पाहतात. स्वत:च्या नाटकाखेरीज दुसऱ्या कुणाचंही नाटक सहसा न पाहणाऱ्या नाटकवाल्यांत ते एक अपवाद आहेत.

आयआयटीयन्सना हवे आहे स्वातंत्र्य!
संशोधन विद्यापीठांच्या शैक्षणिक स्तरावर विविध प्रकारच्या समस्या आढळतात. यातील बहुतांशी समस्यांना या विद्यापीठांमधील प्राध्यापक, संस्थेतील व्यवस्था कारणीभूत असल्याचे १९९८ मध्ये अमेरिकेतील पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बॉयर’ समितीने दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. संशोधन आणि तांत्रिक विद्यापीठांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. या अहवालात दिलेल्या मुद्यांना साजेशी परिस्थिती देशात उच्चस्तरावरील तांत्रिक शिक्षण देणाऱ्या आयआयटीमध्ये आहे.