Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात स्वाइन फ्लूचे ८ संशयित रुग्ण दाखल
सातारा, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

साताऱ्यात आज नव्याने ८ संशयित रुग्ण दाखल झाले असून, येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील आपात्कालीन स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात तपासणीसाठी संशयित रुग्णांची

 

आज दिवसभर झुंबड उडाली होती. २५१ लोकांनी तपासणी करून घेतली.
जिल्हा रुग्णालयात आज दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये पाचगणीचे २, मुंबईचे ३, पुणे येथील २ व कराड येथून आलेल्या १ संशयित रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी पुणे येथील दोन रुग्ण परत गेले असून, सध्या जुने ५ व नवीन ५ असे एकूण १० रुग्णांवर पथकातील डॉक्टर्स उपचार करीत आहेत.
जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी स्वाइन फ्लू साथीचा आढावा दररोज सायंकाळी ५ नंतर प्रसारमाध्यमांना देण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्या आहेत. तरीही माहिती मिळवण्यासाठी यातायात करूनही माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याने पुरेशी व अचूक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत २५१ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुणे, कराड, नायगाव, लिंब, आनेवाडी येथील रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी किती लोकांचे स्वाइन फ्लूसाठी नमुने तपासणीसाठी घेतले ते समजू शकले नाही.