Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

प्रश्नदेशिक परिवहन कार्यालय सोलापुरात तातडीने सुरू करू-नाईक
सोलापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

सोलापुरात उपप्रश्नदेशिक परिवहन विभागाचा दर्जा वाढवून प्रश्नदेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने दाखल केल्यास त्यास लगेचच म्हणजे आगामी विधानसभेची निवडणूक आचारसंहिता अमलात येण्यापूर्वीच मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही परिवहनमंत्री सुरूपसिंग नाईक

 

यांनी दिली.
येथील उपप्रश्नदेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या सुमारे दोन कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीचे व अद्ययावत चाचणी धावपट्टीचे उद्घाटन तसेच तेथील संगणकीय लर्निग लायसन्स परीक्षा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी श्री. नाईक हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह महापौर अरुणा वाकसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुमन नेहतराव, आमदार नरसय्या आडम मास्तर, आमदार जयवंत जगताप आदींची उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात जिल्ह्य़ातील पारधी, डवरी, नाथपंथी, वैदू, मसनजोगी, मरिआईवाले, नंदीबैलवाले, सापवाले, डोंबारी आदी विमुक्त भटक्या जमातीच्या व्यक्तींना जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच उपप्रश्नदेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांच्या व्यवस्थापनाखालील सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या १९ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आल्याचे पत्रही संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात परिवहन विभागाचे खऱ्या अर्थाने ‘परिवर्तना’ चे कार्य होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत वाहने चालविण्याच्या संदर्भात विशेषत वाहन चालविण्याचा परवाना देण्याच्या कामात अधिक दक्षता घेण्याची गरज प्रतिपादन केली. परिवहन विभागात अनेक चांगले व कार्यक्षम अधिकारी आहेत. परंतु वाईट प्रवृत्तीमुळे या विभागाची बदनामी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मोहिते-पाटील यांनी राज्यात वाढत्या वाहन अपघातांमुळे चिंता व्यक्त केली व त्याबाबत योग्य दक्षता घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राचे परिवहन खाते अधिक कार्यक्षम असल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. परिवहन आयुक्त दीपक कपूर व सोलापूरचे उपप्रश्नदेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने तसेच जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या प्रशासकीय सेवेचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला.
या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री म्हेत्रे, महापौर वाकसे, आमदार आडम मास्तर, सोलापूर मोटारमालक संघाचे अध्यक्ष महादेव चाकोते आदींची भाषणे झाली. परिवहन आयुक्त दीपक कपूर यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. सोलापुरात ७.५० एकर क्षेत्रात उपप्रश्नदेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीचे २१ हजार चौरस फूट बांधकाम असून त्यासाठी दोन कोटी खर्च झाला तर बाजूलाच २४ लाखांचा खर्च करून अद्ययावत चाचणी धावपट्टी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी संगणकीय शिकाऊ वाहन चालविण्याचे परवाने देण्यात येणार असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. राज्यात ४५ पैकी २३ परिवहन कार्यालये स्वमालकीच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. येत्या पाच वर्षात उर्वरित सर्व २२ कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याची योजना आहे. तसेच ३१ पैकी सोलापूरसह १४ कार्यालये प्रश्नदेशिक परिवहन म्हणून वाढीव दर्जा देऊन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती दीपक कपूर यांनी दिली. या समारंभाचे सूत्रसंचालन कु.ज्योती वाघमारे यांनी केले तर पुणे प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल यांनी आभार मानले.
वीजप्रश्नावर फिरणे कठीण
राज्यात विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याबद्दल परिवहनमंत्री सुरूपसिंग नाईक यांनी चिंता व्यक्त केली व हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना साकडे घातले. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना विजेचा प्रश्न सोडविला नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावरून फिरता येणार नाही, अशी भीतीही खुद्द या मंत्र्याने व्यक्त केली.