Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

तलाठय़ांना लॅपटॉप दिल्याने अधिक पारदर्शकता येईल- गृहमंत्री
इस्लामपूर, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

वाळवा तालुक्यातील तलाठय़ांना लॅपटॉप देण्याचा उपक्रम क्रांतीकारी उपक्रम असून, महसूल प्रशासनात संगणक प्रणालीमुळे अधिक पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुखता निर्माण होऊन जनतेला सेवा सत्वर उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे

 

बोलताना व्यक्त केला.
वाळवा तालुक्यातील तलाठी आणि सर्कल यांना लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम तहसीलदार कार्यालयाच्या प्रश्नंगणात गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास नगराध्यक्ष चिमणभाऊ डांगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, राजारामबापूज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापूवस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, महानंदाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, विष्णुपंत िशदे, प्रश्नंताधिकारी धनाजी पाटील आदि उपस्थित होते.
सध्या सर्वक्षेत्रात संगणकाचा वापर वाढला असून प्रत्येकाला संगणक ज्ञान असणे काळाची गरज बनली आहे. संगणक शास्त्राचा महसूल प्रशासनात अधिकाधिक वापर करुन जनतेला तत्पर सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करुन गृहमंत्री पाटील म्हणाले, संगणक प्रणालीद्वारे सर्वकार्यालये एकमेकांना जोडण्यात आली असून जिल्हा स्तरावर असणारे सेतू कार्यालय आता तालुक्याबरोबरच सर्कल पातळीवर निर्माण करण्यात शासनाने आघाडी घेतली आहे. वाळवा तालुक्यात सर्कल पातळीवर सेतू कार्यालये कार्यान्वित करुन शासनाची व्यवस्था जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम राज्य शासनाने प्रश्नधान्याने हाती घेतले आहे.
तलाठय़ांना लॅपटॉप उपलब्ध झाल्याने संगणकीय प्रणाली आता खऱ्या अर्थाने गावागावात पोचली असल्याचे समाधान व्यक्त करुन गृहमंत्री श्री. पाटील म्हणाले, या नव्या व्यवस्थेमुळे जनतेस त्यांच्या मिळकतीचे दाखले, उतारे क्षणार्धात गावातच उपलब्ध होणार आहेत. महसूल प्रशासनाचा गावपातळीवरील कणा असलेल्या तलाठय़ाकडील सेवा अधिक सक्षम आणि तत्पर करुन जनतेस प्रशासकीय सुविधा कार्यक्षमपणे देण्याचा महसूल प्रशासनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. महसूल प्रशासनाबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्येही आधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे कामकाज व्हावेअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिरगाव येथील वृत्तपत्र विक्रेते गजानन चौगुले यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक लाखाच्या मदतीचा धनादेश गृहमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कुंडलिक चौगुले यांचेकडे सुपुर्त करण्यात आला. या प्रसंगी डॉ. एन. टी. खट्टे, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष शेखर परब, प्रश्नंताधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार संदेश शिकै यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यांनी महसूल प्रशासनात संगणक प्रणालीचा चालविलेल्या वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार शेखर परब यांनी आभार मानले.
बाळासाहेब पाटील, बी. के. पाटील, आर. के. पाटील, उप नगराध्यक्ष मुकुंद कांबळे, मुख्याधिकारी डॉ. उदय टेकाळे, गट विकास अधिकारी सत्यजित बडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक तालुक्यातील तलाठी, सर्कल उपास्थित होते.