Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कराडच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेची ४२ कोटींची निविदा मंजूर
कराड, ११ ऑगस्ट/वार्ताहर

कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत सुधारित नळपाणीपुरवठा योजनेची ४२ कोटी रुपयांची निविदा वाटाघाटीनंतर मंजूर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा जाधव होत्या.

 

विषयपत्रिकेवरील ३३ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
कराड शहर परिसरातील सन २००६ मध्ये नवीन नळपाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली होती. त्याचवेळी या योजनेसाठी २९ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या योजनेची निविदा मे २००९ मध्ये काढण्यात आली असता, त्याचा सुधारित खर्च ४२ कोटीइतका झाला आहे. ही योजना संगणकीकृत असून, अडीच वर्षात पूर्ण होणार आहे. यानंतर शहराला २४ तास पाणी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या सुधारित योजनेत पाच नव्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातून २० फुटांपर्यंत उंचावर समान दाबाने पाणी मिळणार आहे. पुण्यातील विजय साळुंखे या ठेकेदारास सभेवेळी सभागृहात बोलावून त्याच्याबरोबर वाटाघाटी करून नंतरच ही निविदा मंजूर करण्यात आली.
या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अ‍ॅग्वा पंप प्रश्नयव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीस देण्यात आले आहे. ही योजना चार टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चार स्वतंत्र कामाच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा चर्चेअंती सभागृहात मंजूर करण्यात आल्या.