Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘भाजयुमो’चे इस्लामपुरात ‘जेल भरो’ आंदोलन
इस्लामपूर, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक विक्रम पाटील यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करीत राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारला ‘चले

 

जाव’चा इशारा दिला, तर भाजपचेच ज्येष्ठ नेते नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांनी भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस श्रीमती नीता केळकर यांना साथीला घेऊन महिलांचा स्वतंत्र असा थाळीनाद मोर्चा काढून इस्लामपूर नगरपालिकेपासून ते केंद्र सरकारपर्यंत नाकर्त्यां शासनकर्त्यांचा निषेध करीत भाजपमधील गटबाजीचेही प्रदर्शन केले.
भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी सरकारला ‘चले जाव’चा इशारा देण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनात वाळवा तालुक्यातील भाजपही सहभागी झाला होता. येथील तहसील कार्यालयावर भाजपअंतर्गत असलेल्या गटबाजीतून दोन गट नेत्यांनी स्वतंत्रपणे मोर्चा काढून आपापली ताकद एकमेकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भाजप प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरुण विभागातून राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा आला. तहसील कार्यालयासमोर शासनाच्या निषेधाच्या घोषणांबरोबरच शंखध्वनीही करण्यात आला. या मोर्चाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन तहसीलदार संदेश शिर्के यांनी स्वीकारले.या मोर्चात सांगली शहर भाजप महिला आघाडी उपाध्यक्षा श्रीमती लताताई शहा व श्रीमती अनिता कोठारी यांच्यासह अन्य महिला मोठय़ा संख्येने सामील झाल्या होत्या. ताई वैद्य यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदेश शिर्के यांना दिले.