Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

यंत्रमाग कारखान्यातील कापड चोरणाऱ्यास शिताफीने अटक
इचलकरंजी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

खिडकीचे गज कापून यंत्रमाग कारखान्यातील ३० हजार रुपये किंमतीचे १५ कापड ताग चोरी केल्याप्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी पाच तासात चोरटय़ास शिताफीने अटक केली.

 

रमेश बाबुराव मोरे असे संशयीताचे नांव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
इचलकरंजीतील विक्रमनगर येथे मुक्तसैनिक सोसायटी येथे राहणारे बाबुराव ज्ञानू शिंत्रे यांचा ३४ यंत्रमागाचा कारखाना आहे. १० ऑगस्ट रोजी यंत्रमाग कारखान्यातील गोडावूनमधील कापडतागे असलेला गठ्ठा कमी दिसू लागल्याने दिवाणजीला संशय आला. गोडावूनमध्ये पाहणी केल्यानंतर खिडकीचे गज कापल्याचे लक्षात आले. ३० हजार रूपयांचे १५ कापड ताग चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावभाग पोलिसांत फिर्याद देण्यात आली.
पोलिस निरिक्षक व्ही.डी.नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन सिध्द मििलद साळुंखे, राजू नलवडे, जगन्नाथ पाटील यांनी तपासाची चक्रे गतीमान करून १० ऑगस्ट रोजी संशयीतरित्या फिरणाऱ्या रमेश मोरे या तरूणास अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यांनतर त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी मुद्देमालही जप्त केला आहे.