Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शाहू मिल सेवानिवृत्तांचा कोल्हापुरात मोर्चा
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली शाहू छत्रपती मिल शासनाने तोटय़ाची सबब पुढे करून २००३ साली कायमस्वरूपी बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांना शाहू मिल

 

आवारातील मोकळी जागा घरे बांधण्यासाठी देण्यात यावी, निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी शाहू मिलच्या निवृत्त कर्मचारी कामगारांचा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
इंटकचे पश्चिम महाराष्ट्र संघटक ई डिसोझा, शाहू मिल कामगार संघाचे माजी सचिव पी.एस.पाटील, माजी अध्यक्ष नेताजी कवाळे, सुरेश नंदगावकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शाहू मिल बंद करण्यासाठी त्यावेळी कामावर असलेल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडून त्यांचे राजीनामे घेतले. सध्या हे कामगार कर्मचारी बेरोजगार आहेत. आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. शाहू मिल बंद करताना कामगार कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने कांही आश्वासनेही दिली गेली होती. पण ती पाळली गेली नाहीत. शाहू मिलची मोकळी जागा आहे. ती जागा घरे बांधण्यासाठी देण्यात यावी. बेकार कामगार कर्मचाऱ्यांना दारिद्र्यरेषेखालील कुटुंब म्हणून पिवळ ेरेशनकार्ड देण्यात यावे, निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.