Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नवी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये आठ दिवस बंद
नवी मुंबई, ११ ऑगस्ट /प्रतिनिधी

 

मुंबईतील स्वाईन फ्लू नियंत्रणात असल्याचा दावा एकीकडे राज्य करीत असतानाच नवी मुंबई महापालिकेने उद्यापासून (बुधवार) शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय आज घेतला. नेरूळ येथील सीवूड वसाहतीत रहाणाऱ्या रिटस् बॅनर्जी या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीस स्वाईन फ्लू झाल्याचे आज निदान झाले. मागील तीन दिवसात शहरांत स्वाईन फ्लूची लागण झालेला सलग पाचवा रुग्ण सापडल्याने महापालिका आयुक्त विजय नहाटा यांनी आज तातडीने हा निर्णय जाहीर केला.
पुणे, मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण सापडू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी आयुक्त नहाटा यांनी शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयांमधील मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मागील दोन दिवसात शहरातील खासगी तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी मोहीमही महापालिकेने हाती घेतली होती. असे असले तरी स्वाईन फ्लूची लक्षणे जाणवणारे अनेक रुग्ण सध्या महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात तपासणीसाठी येऊ लागले आहेत.
ठाण्यातील पालिका शाळा बंद
ठाण्यातील अे. के. जोशी आणि हिरानंदानी शाळेतील दोन विद्यार्थ्यांसह ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे नऊ रुग्ण आढळले. यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांना आठवडाभर सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून अनेक खासगी शाळांनी रविवापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.ठाण्यातील अे. के. जोशी आणि हिरानंदानी शाळेतील दोन विद्यार्थ्यांसह ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे नऊ रुग्ण आढळले ठाण्यात दोन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने महापालिकेच्या सर्व शाळांना आठवडाभर सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून अनेक खासगी शाळांनी रविवापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.