Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

सौंदर्यदृष्टी
‘अभिजात’ सौंदर्याची जाणीव काही जणांकडेच असते, त्यामुळे असे सौंदर्य काही जणांनाच भावते, अशी आपली समजूत होते. पिकासोसारख्या चित्रकाराने मानवी चेहऱ्याचीच नव्हे, तर समोर दिसणाऱ्या कोणत्याही वस्तूमधील प्रपोर्शन बदलून टाकताना एक नवी सौंदर्यदृष्टी निर्माण केलेली असते. जे आपल्याला माहीत आहे, तेच फक्त वेगळ्या कोनातून मांडणे हे प्रतिभेचे काम असते.

साऱ्याच लढती अटीतटीच्या
परभणी जिल्ह्य़ातल्या परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी सध्या आपले देव पाण्यात ठेवले आहेत. आपल्या समर्थकांसह पक्षातल्या नेत्यांच्या गाठीभेटी, संधी मिळेल तेव्हा शक्तिप्रदर्शन असे सारे सुरू आहे.जिल्ह्य़ात पाथरीचे आमदार बाबा जानी हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांच्या मतदारसंघात सिंगणापूर विधानसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग आलेला आहे, तर राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांचा सिंगणापूर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत लोप पावला आहे.

राजेश टोपेंपुढे आव्हान कुणाचे?
पाचपैकी एक विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जालना जिल्ह्य़ात सध्या काँग्रेसचा एकही विधानसभा सदस्य नाही. पाचपैकी तीन राष्ट्रवादीचे आणि शिवसेना,भाजपचा प्रत्येकी एक विधानसभा सदस्य आहे. जिल्ह्य़ातील ६० टक्के भागासाठी भाजपचा तर ४० टक्के भागासाठी शिवसेनेचा खासदार आहे. जिल्हा परिषद, जालना नगर परिषद, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे जालना आणि बदनापूर पंचायत समित्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अधिपत्याखाली आहेत.


‘काय रे बाबल्या, तोंडार मास्क लावन नाय फिरणसय नाय?’
‘मी नाय भिणय त्या तापाक’
‘तू मोठो शूर आसय त्येची कल्पना आसा आमका. पण स्वाईन फ्लूचो विषाणू तुका घाबरणासा नाय तेचा काय? तो तुझ्यार खयसरय आणि केवाय घालो घालू शकता.’
‘तात्यानू एवढे त्या फ्लूक घाबरतात कसले. तापासारखो ताप तो. तुमी घाबरून शरीराक कितको ताप दिसतात.’
‘अरे मेल्या तू साथीच्या रोगाचा थैमान अजून बघूक नाय आसय. आमी आमच्या डोळ्यान प्लेगची साथ बघलीसा. लोक या साथीन पटापट मरीत. आता जिवंत असलेल्याची कधी फटकन इकेट जाय ता समजा नाय.’
‘तो काळ गेलो. डेंग्यू, चिकन गुन्या हे रोग गेल्या पाच वर्षांत कसे इले आणि कसे गले ता समजूक नाय. जेची आयुष्याची दोरी तोकडी तो बाबडो खटकन या साथीच्या रोगाचा निमित्त करुन वर गेलो. आता तुमी घाबरतात कसले.’
‘तुजा म्हणणा पटता माका पण या फ्लूची भीतीय वाटता. काय सांगूक येणा नाय.’
‘आता तुमी बघा पुण्यात फ्लू नसताना तोंडार फडक्या बांधून अतिरेक्याच्या वेषात स्कूटरीवरसून जाणारे काय कमी होते. पण शेवटी फ्लू पसारलोच मॉँ. मग तुमी तोंडार मास्क लावन तुमका फ्लू जावचोच नाय येची कोण खात्री घेयत काय?’
‘तसा नाय रे बाबल्या, खबरदारी घेणा आपला काम आसा.’
‘खबरदारी घ्या हो, पण आता सगळाच संपला असा समजून गळपटल्यासारखे वागू नकात ना. आता माका सांगा, मुंबयतली सगळ्यात गलिच्छ वस्ती म्हणून धारावी जगात फेमस आसा. पण अजूनय या धारावीत एकय स्वाईन फ्लू चो पेशंट सापडूक नाय बघ. आता या प्रश्नांचा उत्तर आसा काय तुमच्याकडे.’
‘स्वाईन प्लू नको म्हणूस बाबा, त्या तापाचा नाव बदलला आसा. आणि हो ताप डूकरामुळे होणा नाय. उगाच बिचाऱ्या त्या डूकरांची बदनामी नको.’
‘होय या मात्र खरा आसा. हो माणूस मोठो स्वार्थी आसा. आपण रोग जन्माक घालता आणि प्राण्यांची त्येका नावा दिता. पेटा आणि मनेकाच्या अजून ही नजरेत ही गोष्ट येवक नाय आसा. नाय तर हे प्राणी मित्र हमखास आंदोलन करतीत.’
‘पण कायय म्हणा तात्यानू, आमच्या बिल्डिंगमधली पोरा खूष आसत. अनपेक्षितरित्या सुट्टी मिळालीसा. पण मॉलमधली थिएटरा बंद आसत म्हणान नाराजय आसत.’
‘पण सरकारान काय चुकीचा करुक नाय. साथ रोकूक होच योग्य मार्ग आसा.’
‘पण जर पुढे आठ दिसान ही साथ आटोक्यात येवक नाय तर साळेचा काय जातला.’
‘काय जातला, साळा कायमची बंद जातली.’
‘आणि मॉलचा..’
‘सगळी लोका जमण्याची ठिकाणा आता बंद. आता यंदांच्या धयकाल्याकय तोंडार फडक्या लावन काय ते नाचा.’
‘आणि गणपती उत्सवाचा आणि नवरात्रीचा काय..?’
‘यंदा गणपती पण असोच तोंडार फडको लावन करा. नवरात्रीत मात्र गोची जायत. तोंडार फडको असल्यामुळे पोरांक पोरी ओळखूक येवचो नाय. त्यामुळे गडबडी जातीत. पण तेचो इचार आपण करु नये.’
‘बाबल्या, तुझ्याकडे खूप मोठी दूरदृष्टी आसा. कितको लांबचो इचार करतय.’
‘काय करतलय. सध्या तोच एकमेव इचार चलल्लोसा. दुसरो काय इचारच नाय. फक्त इचार फ्लू चोच.’
‘तू आपलो इचार करीत रव. तवसर साथ आटोक्यात येत.’
‘तसा झाला तर तात्यानू तुमच्या तोंडात (डायबिटीस असल्यान) शुगर फ्री साखरेचो खडो पडो..’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com