Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

िपपरीत विद्यार्थिनीस ‘स्वाइन फ्लू’ रुग्णांची संख्या अकरा; संशयित २१४
िपपरी, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

िपपरीतील अजमेरा कॉलनी येथील एका १५ वर्षीय मुलीला स्वाइन फ्लू झाल्याचे आज निश्चित

 

निदान झाले. तथापि, पुण्यातील नायडू व औंध रुग्णालये ‘फुल्ल’ झाल्याचे सांगत औषधे देऊन घरीच उपचार करण्याचा सल्ला मुलीच्या पालकांना देण्यात आला. येथील आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने त्या पालकांना चांगलाच मनस्ताप झाला.
िपपरी पालिकेच्या सेवेत असलेला हा इसम अजमेरा कॉलनीत राहतो. िपपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. त्याच्या शेजारी बसणाऱ्या या मुलीमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्याने पालकांनी पुण्यात तिची तपासणी केली. तेव्हा तिलाही स्वाइन फ्लूचे आज निश्चित निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात नायडू अथवा औंध रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, ते त्या ठिकाणी गेले. प्रत्यक्षात तेथे त्यांना वेगळाच अनुभव आला. रुग्णालयात जागा नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने त्यांनी आपली व्यथा परिचितांकडे मांडली. त्यांनी हे प्रकरण महापौर अपर्णा डोके यांच्याकडे नेले. महापौरांनी पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली. मात्र कागदी घोडे नाचविणाऱ्या या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने या कुटुंबीयास आज बराच मनस्ताप झाला. अखेर, स्वाइन फ्लूची औषधे देऊन त्या मुलीला राहत्या घरीच उपचार देण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय, कुटुंबीयांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘स्वाइन फ्लू’ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील ३५० शाळा तसेच सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कालच घेतला. शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता अकरा झाली असून २१४ रुग्ण संशयित आहेत. पालिकेच्या विभागीय रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रांत नागरिकांची संख्या वाढते आहे. स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झालेल्या शहरातील रुग्णांपैकी तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सात रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. एक रुग्ण गंभीर असून त्यावर ससून रुग्णालयात विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना पालिकेच्या विभागीय रुग्णालयांमधून औषधे देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त आशिष शर्मा यांनी दिली. याशिवाय, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तळमजल्यावर स्वाइन फ्लूच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी थेट प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण असल्यास पालिकेला रिपोर्ट करण्याचे आवाहन करीत आयुक्तांनी त्या रुग्णांना तातडीने औषधे देण्याची व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले. पालिकेची उद्याने तसेच नाटय़गृहे बंद ठेवण्याबाबतचा विचार सुरू असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
िपपरी पालिकेची ‘हेल्पलाइन’
स्वाइन फ्लू संदर्भात िपपरी पालिकेच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी दिली. चव्हाण रुग्णालयातील २७१००३४४ तसेच डॉ. मरकडे (९९२२५०१३११) व डॉ. अनिल रॉय (९९२२५०१११८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. कुणचगी यांनी केले आहे.