Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

श्रुतीच्या मृत्यूने हळहळ; शाळेत सर्वतोपरी दक्षता
पुणे, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

आठवीच्या वर्गातील श्रुती गावडेच्या मृत्यूने अहिल्यादेवी प्रशालेत हळहळ व्यक्त करण्यात येत असून, शाळेमधील अन्य कुणाला संसर्ग होणार नाही, याची सर्वतोपरीने खबरदारी घेण्यात येत

 

आहे.
श्रुतीचे कुटुंब मूळचे मुळशी तालुक्यातील लवळे गावातील. तिच्या आई-वडिलांचे माती गणपतीच्या चौकात भाजीचे दुकान आहे. तिचा लहान भाऊ नवीन मराठी शाळेत चौथीत आहे. अतिशय कष्टाळू व संवेदनशील मुलगी म्हणून श्रुती मैत्रिणी व शिक्षकांमध्ये प्रिय होती. घरच्या बेताच्या परिस्थितीतही श्रुती मोठय़ा तन्मयतेने शिक्षण घेत होती. त्यामुळेच तिच्या मृत्यूमुळे शिक्षकवर्गामधून हळहळ व्यक्त करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, संचालक किरण शाळिग्राम, शाला समितीच्या अध्यक्षा विनिता लेले, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी आज गावडे कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला.
श्रुतीसंदर्भात माहिती देताना काकतकर यांनी सांगितले की, ‘आजारी पडल्याने श्रुती एक ऑगस्टपासून शाळेत येत नव्हती. त्यानंतर तिची ‘स्वाइन फ्लू’ चाचणी करण्यात आली. त्यामध्ये श्रुती ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे गेल्या शनिवारी समजले. त्यानंतर लगेचच मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या सहकार्याने श्रुतीच्या वर्गातील सर्व विद्यार्थिनींच्या पालकांना संपर्क साधण्यात आला. त्यांच्या मुलीमध्ये ‘स्वाइन फ्लू’ची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सोमवारपासून सोसायटीच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच एक तांेरखेपासून श्रुती शाळेतच येत नसल्याने अन्य विद्यार्थिनींना संसर्ग होण्याची भीती तुलनेने कमी आहे. तरीही कोणताही धोका न पत्करता र्निजतुकीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे श्रुतीच्या भावाची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे.’