Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

थेरगावमध्ये अल्पवाीन मुलीवर बलात्कार
िपपरी, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

थेरगावमधील पवारनगर भागात सुरू असलेल्या गोयलगंगा बांधकामाच्या ठिकाणी एका मजुराने तेथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. या

 

प्रकरणी पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर रामराव शिंदे (वय २२, रा. साईनाथनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिंदे याने शिनवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोयलगंगा साईटवर राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देखील आली. तिला सोमवारी सायंकाळी अचानक त्रास सुरू झाल्याने रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिच्या घरच्यांना हा प्रकार समजला. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली. अधिक तपास फौजदार प्रभाकर पवार करीत आहेत.
पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न
पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथील भागीरथी कॉम्पलेक्समध्ये असलेल्या शिवशक्ती पतसंस्थेचे शटर उचकटून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी बगाजी जाधव (वय ५४, रा. मु. पो. गुंजाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव हे शिवशक्ती पतसंस्थेत शाखाधिकारी म्हणून काम करतात. जाधव यांची पतसंस्था शनिवारी दुपारी दोन ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत बंद असताना चोरटय़ांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.