Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

टिळेकरांच्या निधनाने हडपसरवर शोककळा
हडपसर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

हडपसर परिसरातील औषध विक्रेते संजय भाऊसाहेब टिळेकर यांचे स्वाइन फ्लूमुळे निधन झाल्याने हडपसर परिसरात आज शोककळा पसरली आहे. आज सकाळी हडपसर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरातील नगरसेवकांसह अनेकजण उपस्थित

 

होते.
महंमदवाडी येथे ‘गणेश मेडिकल’ या नावाने औषध विक्रीचे दुकान चालविणारे संजय भाऊसाहेब टिळेकर यांनी फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या पत्नी ज्योतीनेही हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्या व्यवसायातही पतीला मदत करीत असत. औषध विक्रीच्या व्यवसायातूनच त्यांना ‘स्वाईन फ्लू’चा संसर्ग झाला. ऐन उमेदीच्या काळातच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली आणि टिळेकर कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी झाले.
संजय टिळकेर यांच्यावर प्रश्नथमिक उपचार सुरू असताना त्यांना ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. पराकोटीचे प्रयत्न करूनही टिळेकरांचे प्रश्नण वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि काल रात्री त्यांची प्रश्नणज्योत मावळली.
मूळचे यवत येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील असलेल्या टिळेकर यांनी काही वर्षापूर्वी महंमदवाडी परिसरात स्वत:चे दुकान सुरू केले होते. त्यांचा स्वभाव शांत होता. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. अलीकडेच या परिसरात त्यांनी घरही घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे तीन वर्षापूर्वीच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.