Leading International Marathi News Daily
बुधवार,१२ ऑगस्ट २००९
  हाय प्लेसेस’ची घोडदौडी
  फूड व डेअरी टेक्नॉलॉजीतील आकर्षक संधी
  जमाना वेबकास्टिंगचा
  अभ्यासक्रमात बदल क्रमप्रश्नप्त
  असामान्य कर्तृत्व
  हार्डवेअर व नेटवर्किंग एक हमखास करिअर क्षेत्र
  स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पदाची तयारी
  उद्योग व्यवसायातील पदार्पणासाठी..
  मनोरंजन क्षेत्रातील संधी आणि आव्हान
  सिनेमात जाण्यासाठी..
  कॉस्मेटोलॉजी व हेअर डिझायनिंग स्कॉलरशिप

‘हाय प्लेसेस’ची घोडदौड
गेली अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आऊटडोअर मॅनेजमेन्ट प्रश्नेग्राम्स राबविणाऱ्या पुण्यातील ‘हाय प्लेसेस’ या संस्थेने अलीकडे मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट सेंटर सुरू केले आहे. त्याचबरोबर साहसी पर्यटनाकडेही त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे मंदीच्या तीव्र झळा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, उलटपक्षी, त्यांची घोडदौड वेगवेगळ्या वाटांनी सुरू राहिली आहे.
मध्यंतरीच्या काळात कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स, त्यांची कंपनीशी बांधिलकी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास यासाठी कॉर्पोरेट जगताने आऊटडोअर मॅनेजमेन्ट प्रश्नेग्राम्सची संकल्पना चांगलीच उचलून धरली होती. मात्र मंदीच्या लाटेत पहिला घाव
 

बसतो तो अशा उपक्रमांना. याला अनुसरून गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट क्षेत्राने आऊटडोअर मॅनेजमेन्टच्या प्रश्नेग्राम्सना कात्री लावली, मात्र याचा फटका गेली अनेक वर्र्षे आऊटडोअर मॅनेजमेन्ट प्रश्नेग्राम्स यशस्वीरित्या राबवणाऱ्या पुण्याच्या ‘हाय प्लेसेस’ या संस्थेला तितकासा जाणवला नाही. कारण मुळातच त्यांच्या प्रश्नेग्राम्सचे आयोजन केवळ एखाद्या विशिष्ट प्रकारच्या (उदा. आयटी कंपन्या, वित्तीय संस्था) कंपन्यांसाठी नसून तो विस्तारित होता. त्यामुळे मंदीच्या काळात त्यांच्या प्रश्नेग्राम्सची संख्या काही अंशी रोडावली असली त्या झळांची धग त्यांना फारशी जाणवली नाही. त्याउलट समस्या या संधी घेऊन येतात, या उक्तीची प्रचीती त्यांना आली आणि याला अनुसरून ‘हाय प्लेसेस’ने साहसी पर्यटनाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
पश्चिम घाटात मुंबईपासून १४० किमी आणि पुण्यापासून ७५ किमी अंतरावर (कोलाडपासून ६० कि.मी. अंतरावर)असलेल्या गरुडमाची येथे ‘हाय प्लेसेस’ने उभारलेल्या आऊटडोअर मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट सेंटरचा विस्तार करीत आता तिथे अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त असे मॅनेजमेन्ट सेंटर उभारण्यात आले आहे. एच. आर. सेंटर प्रश्नयव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेलं हे सेंटर २४ खोल्यांनी युक्त असून त्यातील कॉन्फरन्स हॉलसह विविध खोल्यांना नक्षत्र आणि तारकापुंजांची नावे देण्यात आली आहेत. त्यात लायरा, सिग्नस, अकिला, पर्सिअस आणि ओरायन अशा विविध खोल्यांचा समावेश आहे. यात सेंटरच्या कार्यालयाचे नाव ‘सारथी’ या अर्थाने ‘ओरिगा’ ठेवण्यात आलेले आहे. गेली अनेक वर्षे ‘हाय प्लेसेस’तर्फे कॉपोरेट क्षेत्रसाठी आऊटडोअर मॅनेजमेन्ट प्रश्नेग्राम्स आयोजित केले जायचे.
यासंबंधी माहिती देताना ‘हाय प्लेसेस’चे ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख मिलिंद कीर्तने यांनी सांगितले की, नव्या सेंटरद्वारे ‘हाय प्लेसेस’ने इतर कंपन्या अथवा प्रश्नेग्राम्स आयोजित करणाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात त्या कंपन्या स्वतंत्रपणे आपापले प्रश्नेग्राम्स आयोजित करू शकतात. यात ‘हाय प्लेसेस’ सोयीसुविधा आऊटसोर्स करण्याची भूमिका बजावते.
तब्बल १५ वर्षाच्या आऊटडोअर डेव्हलपमेन्ट सेंटरच्या अनुभवानंतर ‘हाय प्लेसेस’ने ‘मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट सेंटर’ची उभारणी केली आहे. सेंटरमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याकडे सेंटरने जातीने लक्ष पुरवले आहे. सुमारे शंभर ते १२० व्यक्ती उपस्थित राहू शकतील व जिथे बसण्याची जागा ही हव्या त्या पद्धतीने बदलता येऊ शकेल, अशी तंत्रसुसज्ज कॉन्फरन्स रुम ही बैठका आणि परिसंवादासाठी आदर्श म्हणावी लागेल. सेंटरच्या व्यवस्थापन केंद्र असलेल्या कार्यालयात प्रिंटींग, कॉपी काढणे तसेच बैठकीसाठी आवश्यक ती सारी स्टेशनरी पुरवली जाते. तिथल्या प्रशस्त डायनिंग हॉलमध्ये एकाचवेळेस शंभरहून अधिकजणांची खाण्याची व्यवस्था करता येते. सेंटरमधल्या अकिला आणि लायरा हा दोन सिंडीकेट रुम्समध्ये ३० जणांच्या छोटय़ा कॉन्फरन्सची सोय करता येऊ शकते.
अकिला, लायरा आणि सिग्नस यात निवासाची व्यवस्था करण्यात आली असून त्यात वैशिष्टय़पूर्णरीत्या डिझाइन केलेल्या २४ खोल्या आहेत. कॉन्फरन्स अथवा मिटींग्जसाठी आलेल्यांची इथे राहण्याची व्यवस्था आहे. गरुडमाची या आऊटडोअर मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट सेंटरच्या २४ एकर जागेवर प्रशिक्षण उपक्रमांसोबत पदभ्रमण, प्रस्तरारोहण, राफ्टिंग यासोबत विविध साहसी उपक्रम आयोजित केले जातात. लवकरच येथे पॅरासेलिंग उपक्रमही सुरू केला जाणार आहे. इथे अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असे १८ तंबू उभारण्यात आले आहेत. यातील प्रत्येक तंबूमध्ये सहाजणांची निवासाची सोय आहे. त्यांच्या आऊटडोअर प्रश्नेग्राम्सना मिळत असलेल्या घवघवीत यशामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात सुरू केलेला साहसी पर्यटनाचा उपक्रम काहीसा मागे पडला होता. मात्र गेल्या वर्षभरात त्यांच्या साहसी पर्यटनाला गती मिळाली आणि गेल्या वर्षभरात त्यांनी मोठी मजल गाठली. ‘हाय प्लेसेस’चे बिझनेस डेव्हलपमेन्ट विभागाचे प्रमुख प्रेम मगदूम यांनी यासंबंधी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘हाय प्लेसेस’ने ‘वेस्टर्न हायलँडर्स’ ही नवी उपशाखा सुरू केली असून त्याद्वारे हिमालयातील ट्रेक्स तसेच लहान मुलांसाठी विविध उपक्रम सरू केले आहेत. खाडीतल्या प्रवासाची अनुभूती देणारा क्रीक जाँट, पॅरासेलिंग तसेच रिव्हर राफ्टिंगसारखे साहसी खेळही लवकर सुरू करण्यात येणार आहेत.
हाय प्लेसेसच्या या ‘आऊटडोअर सपोर्ट अॅक्टिव्हिटीज’ना वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एक दिवसीय हाइक तसेच आऊटडोअर प्रश्नेग्राम्सही ‘वेस्टर्न हायलँडर्स’तर्फे आयोजित करण्यात येतात. हिमालयीन ट्रेक्ससोबत सह्याद्रीतील गिर्यारोहणही ते आयोजित करतात. या उपक्रमाअंतर्गत पहिली हाइक लोहगड - विसापूर येथे आयोजित करण्यात आली. या हाइक तसेच आऊटिंग्जमध्ये कुणालाही सहभागी होता येईल. आऊटिंग्जच्या वेगवेगळ्या योजनाही त्यांनी आखल्या असून दहा आऊटिंग्जमध्ये सहभागी होणाऱ्यांना १२ आऊटिंग्ज करता येतील. पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक तसेच ऐतिहासिक गोष्टींना असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार साहसी पर्यटनाचे काही उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्या दृष्टीने अनुरूप मार्केट तयार करण्याचा ‘हाय प्लेसेस’चा मानस आहे. साहसी पर्यटनाचे उपक्रम राबवताना त्यांचा दर्जा आणि सुरक्षितता या बाबींकडेही जातीने लक्ष पुरवले जाते. विस्तार योजनेच्या दृष्टीने संस्थेने वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्रँचायसी नेमल्या आहेत. त्याद्वारे वेगवेगळ्या शहरांमधील लघु वा मध्यम व्यावसायिकांनाही संस्थेच्या उपक्रमांची माहिती मिळणे वा त्याचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
बँक व्यावसायिकांसाठी त्यांनी एक स्वतंत्र पॅकेज विकसित केले असून त्यात इनडोअर तसेच आऊटडोअर प्रशिक्षण उपक्रमांचा मेळ साधण्यात आला आहे. यात एमबीटीआय तंत्राचा उपयोग करण्यात येतो. यात १६ प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचे मापन करण्यात येते. त्याद्वारे तुमच्या वर्तणुकीतील योग्य - अयोग्य गोष्टींचा वेध घेणे शक्य होते. वेगवेगळ्या खेळ तसेच प्रयोगाद्वारे व्यक्तीच्या सांघिक वर्तणुकीवरही लक्ष देता येते. सिमेन्स, सिटी बँक, एल अँड टी आदी नामवंत कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ‘हाय प्लेसेस’ने शेकडो वेगवेगळ्या आऊटडोअर प्रश्नेग्राम्सचं आयोजन केलं आहे.
ओमानमधील ‘बँक ऑफ मस्कत’साठीही त्यांनी गेल्या दीड-दोन वर्र्षामध्ये अनेक प्रश्नेग्राम्स आखले. दुबईच्या महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने तेथील शाळकरी मुलांसाठी सुटीच्या अवधीत इथे वेगवेगळे प्रशिक्षण देणारी शिबिरं आयोजित केली. आवश्यकतेनुसार ते प्रश्नेग्रामच्या रचनेत बदलही करतात. टाटा पॉवरच्या
भिरा, खोपोली व भिवपुरी येथील सुमारे दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय प्लेसेस’ने अलीकडेच दहा प्रश्नेग्राम्स सिंहगडावर राबवले. कर्मचाऱ्यांचे वय, पद आणि कामाचे स्वरूप लक्षात घेत त्यांनी प्रश्नेग्राम्समध्ये आवश्यक ते
बदल केले. या उपक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थींचे मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेले आणि हाय प्लेसेसमध्ये अधिकारपद भूषवणारे सुरेंद्र चव्हाण यांचे मनोगत प्रेरणादायी ठरते.
आज कॉर्पोरेट क्षेत्रात एकात्मिकीकरणाची संस्कृती बळावत चाललेली असताना त्यातील एक गट हा स्वतला इतरांपेक्षा वरचढ मानत असतो. या दोन्हीही गटांना असुरक्षितता भेडसावत असते. अशा वेळी दोन्ही गटांमध्ये सांघिक भावना रुजवून एक नवी कार्यसंस्कृती विकसित करण्यासाठी ‘हाय प्लेसेस’ वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम आयोजित करत असतात. याचे उदाहरण देताना हाय प्लेसेसचे संचालक वसंत वसंत लिमये यांनी सांगितले की, एका बडय़ा बहुराष्ट्रीय कंपनीत काही वर्र्षापूर्वी अचानक अतिवरिष्ठ अधिकारीवर्ग एकाएकी सोडून गेला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्यच ढासळले. त्यावेळी चार-पाच महिन्यांच्या अवधीत ‘हाय प्लेसेस’ने त्यातील वेगवेगळ्या अधिकारी - कर्मचारीवर्गासाठी सुमारे २७ प्रश्नेग्राम्स आखले. कर्मचाऱ्यांचा कंपनीवरील विश्वास टिकवण्यापासून तिथे कार्यसंस्कृती रुजवण्यापर्यंत अनेक गोष्टी या प्रश्नेग्राम्समुळे साध्य झाल्याची पावती तिथल्या व्यवस्थापनाने ‘हाय प्लेसेस’ला दिली.
निसर्गाशी बांधिलकी जपणारे अत्यंत साधेसोपे व सौंदर्यदृष्टी जपणारे इथले आर्किटेक्चर म्हणजे ‘हाय प्लेसेस’ची जमेची बाजू. या अफलातून आर्किटेक्चरची संकल्पना संस्थेच्या संचालक मृणाल परांजपे यांची आहे.
आऊटडोअर मॅनेजमेन्ट प्रश्नेग्राम्सपासून साहसी पर्यटनापर्यंत वेगवेगळ्या मिती ‘हाय प्लेसेस’ने प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी दर्जेदार प्रश्नेग्राम्स ते करीत असलेली आखणी आणि त्यात आवश्यकतेनुसार करीत असलेले बदल याच्या शिदोरीवर ‘हाय प्लेसेस’ मार्गक्रमण आहे.
(‘हाय प्लेसेस’च्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी info@hpmpl.com या वेबसाइटला भेट देता येईल.)
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@hotmail.com