Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

बी.टी. देशमुखांचा विधानपरिषदेचा राजीनामा
अमरावती, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

केंद्र शासनाची प्रश्नध्यापकांसाठीची वेतन सुधारणेची समग्र योजना आणि नेट-सेट बाबतच्या अटी याविषयी उच्च शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आश्वासनाची पूर्तता होतच नसेल तर सभागृहात काम करणे निर्थक आहे, अशी भावना विधानमंडळ सदस्यांच्या मनात निर्माण होणे हा त्याच्या ‘सदस्य’त्वाचा अंतच असतो. प्रश्नध्यापकांच्या मागण्यांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही आश्वासनाच्या बाबतीत उच्च पाठपुरावा करूनही आश्वासनांच्या बाबतीत उच्च शिक्षणमंत्री लाजिरवाणी वितरित कृती करीत आहेत. त्यामुळेच हे काम करणे निर्थक आहे, अशी भावना मनात निर्माण झाली आणि त्या भावनेतूनच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे ज्येष्ठ आमदार बी.टी. देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

पोलीस व प्रश्नध्यापकांमध्ये धक्काबुक्की अमरावतीत ‘जेलभरो’
अमरावती, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यातील प्रश्नध्यापकांना केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर ३१ मागण्यांसंदर्भात शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ ‘एम. फुक्टो’ आणि ‘नुटा’ या संघटनांच्या झेंडय़ाखाली २ हजारावर प्रश्नध्यापकांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र जमून ‘जेलभरो’ आंदोलन केले. ज्येष्ठ आमदार प्रश्न. बी.टी. देशमुख, शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह शेकडो प्रश्नध्यापकांनी स्वत:ला अटक करून घेतली.

पोलीस उपनिरीक्षक अपघातात ठार; घातपाताचा संशय
चंद्रपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

दुर्गापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रतीराम मेश्राम (५६) सोमवारी मध्यरात्री एका भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाले. हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलीस दलात व्यक्त केला जात असून वाहन व चालक फरार आहे. दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आहे. वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर मंडप टाकून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन भडकू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विवाह-परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
प्रतिनिधी

‘मिळून साऱ्याजणी’ मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विवाह-परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी ‘विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा’, विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता’, ‘विवाहबंधन - गरज की सक्ती’, विवाहपूर्व शरीरसंबंधाचा अनुभव - सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक’, आंतरजातीय विवाह - जातींचा मेळ की झळ’,

सहकार कायद्यातील सुधारणा पतसंस्थांच्या फायद्याच्या -जाधव
बुलढाणा, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यातील सहकारी पतसंस्था सध्या बिकट अवस्थेतून जात आहेत परंतु, सहकार कायद्यात झालेल्या सुधारणांमुळे त्या अडचणी दूर होतील व पतसंस्थेची स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पी.एम. जाधव यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून दीड लाखापर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३९वी आमसभा स्थानिक जिल्हा परिषद भवनात पार पडली.

विकासकामांना मंजुरी
गोंदिया, ११ ऑगस्ट / वार्ताहर

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात तीन हायमास्ट लाईटसह शहर व ग्रामीण भागाकरता विंधन विहीर, चावडी, सभामंडप मंदिर जीर्णोद्वाराच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. ही विकास कामे ४२ लाखांच्या निधीतून करण्यात येणार आहेत. शहरात मंजूर तीन हायमास्ट लाईटमध्ये मरारटोली बसस्थानक, मामा चौक व चावडी चौकाचा समावेश आहे. याशिवाय ४२ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये ग्रामीण भागासह शहरात १४ विंधन विहिरींचे खोदकाम करण्यात येणार आहे. तसेच रापेवाडा, कामठा व सिवनी येथे सभामंडपाचे र्इी, दागोटोला, सोनबिहारी, देवरी, बिरसी, सिंधीटोला, गिरोला येथे चावडी बांधकाम करण्यात येणार आहे तर तेढवा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर छताचे बांधकाम करण्यात येणार आहे.

विठ्ठल आत्राम यांना चार सुवर्णपदक
चंद्रपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९६ व्या दीक्षांत समारंभात सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विठ्ठल आत्राम याला एम.ए. समाजशास्त्र या विषयात चार सुवर्णपदक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. डॉ. वसंत देशपांडे सभागृह नागपूर येथे झालेल्या ९६ व्या दीक्षांत समारंभात विठ्ठल आत्राम यांना माधव देशपांडे सुवर्णपदक, महात्मा ज्योतीबा फुले स्मृती शताब्दी सुवर्ण पदक, प्रश्नचार्य के.एल. अलियास बाबासाहेब निंबाळकर सुवर्णपदक, निर्मला दिगांबर शेंडे सुवर्णपदक असे चार सुवर्णपदक आणि सत्यभामाबाई मुनशी रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विठ्ठल आत्राम आपल्या यशाचे श्रेय प्रश्न. राजेंद्र बारसागडे, प्रश्न. डॉ. सुलभा गावंडे, प्रश्न. पेठकर व आईवडिलांना दिले आहे. या यशाबद्दल प्रश्न. डॉ. इसादास भडके, प्रश्न. अशोक बनसोड, प्रश्न. मेघमाला मेश्राम, प्रश्न. इर्शाद शेख, प्रश्न. रश्मी मोटघरे, झाडे, प्रश्न. ए.एल. वानखेडे आदींनी अभिनंदन केले आहे. विठ्ठल आत्राम हा पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी तुकूम या ग्रामीण भागातला आहे. ते जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सिंचन विभागात कनिष्ठ सहाय्यक आहेत. विठ्ठल आत्राम यांना मिळालेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आदर्श विद्यालयात पर्यावरण मंडळाने राबविले सर्पज्ञान जागृती मोहीम
दर्यापूर, ११ ऑगस्ट / वार्ताहर

भारतात एकूण ५५ प्रकारचे सर्प आढळतात. त्यापैकी फक्त पाचच प्रजाती विषारी असून उर्वरित ५० प्रजातीचे साप हे बिनविषारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय हरित सेनेचे तालुका समन्वयक राजेंद्र गायगोले यांनी केले. नागपंचमीच्या पूर्वसंध्येवर आदर्श हायस्कूलमध्ये प्रश्नचार्य आर.डी. काकड यांच्या उपस्थितीत झालेल्या या अभियानाचा लाभ एक हजार विद्यार्थी तसेच उपस्थित शिक्षक, पालक यांनी घेतला. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून केवळ सापाविषयी असलेल्या अज्ञान व अंधश्रद्धेतून फार मोठय़ा प्रमाणात सापांची हत्या होते. परिणामी त्याचा दुष्परिणाम पर्यावरणाचा समतोल बिघडण्यात होतो, असेही गायगोले यांनी सांगितले. सापांच्या विविध जाती-प्रजाती, विषारी-बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंशावरील उपचार, सापाबद्दल असणारी भीती व अंधश्रद्धा या सर्वच बाबतीत सुमारे दीड-तास राष्ट्रीय हरित सेनेच्या पर्यावरण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक प्रश्न. सुरेश घोगरे यांनी केले. आभार पर्यावरण शिक्षक पुरुषोत्तम पाचे यांनी मानले. उपमुख्याध्यापक वि.वा. गावंडे, पर्यवेक्षक पी.व्ही. कडू यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील वर्ग १० क चा विद्यार्थी हिंगमिरे याचा सर्पमित्र म्हणून गौरव करण्यात आला.

वणीत तालुक्यातील पिकांना जीवदान
वणी, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

सुमारे महिनाभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारपासून वणीत पावसाचे आगमन झाले. मंगळवारी ही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. दुबार, तिबार पेरणीनंतर हातून गेलेल्या पिकांना या पावसामुळे काही दिवस जीवदान मिळणार आहे, तर भर श्रावणातही उन्हं उकाडय़ामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला.
तथापि, पुन्हा जर पावसाने दडी मारली तर मात्र परिस्थिती आहे त्यापेक्षाही भयावह होईल, असे चित्र आहे. वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नवरगाव येथील धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आधारावर वणीकरांची तहान भागवली जात आहे. नदी-नाले कोरडे असून पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. कोरडय़ा दुष्काळाच्या तोंडावर सोमवारी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दुपारपासून मंगळवारी दुपापर्यंत पावसाच्या सरी कोसळत असल्याने काहीसे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहतूक सुरक्षा सप्ताह
वर्धा, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्य़ातील प्रत्येक शाळेत ‘वाहतूक सुरक्षा पथक’ स्थापण्याचा उपक्रम पोलीस विभागाने सुरू केला असून त्याचा शुभारंभ एका कार्यक्रमात करण्यात आला.
सर्व मुलांना अपघातविरहीत सार्वजनिक वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेतच वाहतुकीचे नियम मुलांना अवगत होणे क्रमप्रश्नप्त ठरते. हीच मुलं मोठय़ांनाही शिस्तीचे नियम सांगू शकतात. यादृष्टीने वाहतूक सुरक्षा पथक मोलाचे ठरेल. अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अश्वती दोरजे यांनी व्यक्त केली. वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी पथकाबाबत सालोड, वायगाव, बोरगाव, पिपरी व अन्य शाळेत प्रबोधनपर कार्यक्रम झाल्याचे यावेळी नमूद केले. वाहतूक सुरक्षा पथकाचे जिल्हा समादेशक म्हणून जी.एन. सारडे, जिल्हाध्यक्ष, सी.जी. काळे व सचिव अर्चना देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. हे पदाधिकारी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली काम पाहतील. पहिल्या टप्प्यात माध्यमिक शाळांमध्ये पथक सुरू केल्या जाणार असल्याची माहिती समादेशक शिक्षक सारडे यांनी दिली.

आगार व्यवस्थापक विजय कुडे यांना निरोप
ब्रह्मपुरी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

रा.प. ब्रह्मपुरी आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांची बदली झाल्यामुळे त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवीन आगार व्यवस्थापक वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रश्न. विजय मुडे उपस्थित होते. प्रश्न. विजय मुडे यांनी विजय कुडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केल. कर्मचारी वर्गाने आपल्या कर्तव्याप्रती प्रश्नमाणिक राहून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन केले. वैद्य यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करून प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याचा सल्ला दिला. सत्काराला उत्तर देताना विजय कुडे म्हणाले की, या आगारातील सर्व कर्मचारी वर्गाचे मला सहकार्य लाभले. त्यामुळे हे आगार सर्व क्षेत्रात विभागात प्रथम क्रमांक पटकावू शकले, याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रश्नस्ताविक किशोर वानखेडे यांनी केले. संचालन रवींद्र बुरले यांनी तर आभार विजय बडोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री राखडे, वैरागडे, उके, नन्नोरे, तडस, कोरे, नन्नावरे व परवेज आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

‘सण- सांस्कृतिक कार्यक्रम’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित
भंडारा, ११ ऑगस्ट / वार्ताहर

मानवी मूल्ये विस्मरणात जाऊ नयेत आणि अंधतेने त्यांचे अवडंबर माजू नये, या संकल्पनेतून लिहिलेल्या ‘तुमचे आमचे सण-सांस्कृतिक कार्यक्रम’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन या ग्रंथाचे लेखक प्रश्न. द.सा. बोरकर यांच्या ७० व्या वाढदिवशी लाखनी येथे एका कार्यक्रमात झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पोहरकर उपस्थित होते. त्यांनी हा ग्रंथ आजच्या काळात सणांचे औचित्य आणि त्यांची सांस्कृतिक महत्ता सांगणारा असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामण लंजे होते. त्यांनी तीन दशकापूर्वी लाखनीला विदर्भ सहित्य संघाची शाखा काढून बोरकरांनी अनेकांना बोलते-लिहिते केल्याचे सांगितले. या प्रसंगी प्रश्न. प्रमिला हरडे, विठ्ठल लांजेवार, प्रश्न.डॉ. अल्का सोरदे, दौलत लांजेवार यांचीही भाषणे झाली. विदर्भ साहित्य संघ लाखनी शाखेच्या वतीने लेखक प्रश्न. द.सा. बोरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बोरकर यांनी ग्रंथामागील भूमिका मांडली व कृतज्ञता व्यक्त केली. प्रश्नस्ताविक प्रश्न. बे.तु. आगाशे यांनी केले. आभार डॉ. मुक्ता बोरकर यांनी मानले.

त्र्यंबक परशुरामकर याने पटकावली ११ पारितोषिके
दीक्षांत समारंभात कुलपतींच्या हस्ते सन्मानित
ब्रह्मपुरी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागाचा विद्यार्थी त्र्यंबक परशुरामकर याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ११ पारितोषिके पटकावून महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. त्र्यंबक परशुरामकरला सात सुवर्ण, एक रजत व तीन वेगवेगळ्या पदकांनी कुलपती व राज्यपाल एस.सी. जमीर यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, प्र कुलगुरू डॉ. पाराशर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्र्यंबक परशुरामकर याच्या यशाबद्दल संस्था सचिव मारोतराव कांबळे, प्रश्नचार्य डॉ. अजिमूल हक, माजी प्रश्नचार्य डॉ. मिता रामटेके, तसेच प्रश्नध्यापकवृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
वाशीम, ११ ऑगस्ट / वार्ताहर

जिल्ह्य़ात यावर्षी पाऊस कमी झाल्याने पिकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये संपूर्ण वाशीम जिल्हा हा निसर्गावर अवलंबून असून यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्य़ातील खरिपाची ७० टक्के पिके पावसाअभावी सुकलेले आहेत. पाऊस गेल्या १५ दिवसांपासून न आल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी व मशागतीसाठी लागलेला खर्चही वसूल होणे शक्य नसल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम देवळे, शहर अध्यक्ष समाधान माने, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काळबांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव गोटे, शहर अध्यक्ष गोपाल खोटे, रवी वऱ्हाडे, संजय गोटे, भागवत गोटे, मनोहर जाधव, काशीराम काळबांडे, शिवाजी काळबांडे, सुनील मापारी, हनुमान सोळके, संजय मापारी, सुधाकर कड, अनिल काकडे आदी कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

महसूल विभागाच्या जागेवर विनापरवानगीने बांधकाम केल्याची तक्रार
मोर्शी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

मोर्शी नगरपालिकेने महसूल विभागाच्या जागेवर विनापरवागीने बांधकाम केल्याची तक्रार माजी नगराध्यक्षाने वरिष्ठांकडे केली आहे. जयस्तंभ चौकाच्या बाजूला महसूल विभागाची खुली जागा होती. या जागेवर पालिकेने परवानगी न घेता शौचालयाचे बांधकाम सुरू केले. वास्तविक ही जागा महत्त्वाच्या टप्प्यावर असून मुख्य बाजार ओळीत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रोडे यांनी त्यांच्या काळात या जागेवर मार्केट उभारण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, नगरपालिकेची सत्ता पालट झाल्याने मार्केटच्या बांधकामाचा प्रस्ताव रेंगाळला. आज पालिकेने याच जागेवर शौचालय व मूत्रीघराचे बांधकाम सुरू केले आहे. झालेल्या बांधकामाचा खर्च झाला आहे. दुसरीकडे जयस्तंभ चौक व मुख्य बाजार ओळीत सार्वजनिक शौचालय व मूत्रीघर नसल्यामुळे स्त्री-पुरुषांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दूरचित्रवाणीच्या माध्यमातून गुन्हेगारीत वाढ -पठाण
हिंगणा, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

गुन्ह्य़ावर आधारित मालिका दूरचित्रवाणीवर दाखवल्या जात असल्याने त्याचा परिणाम बेरोजगार तरुणांवर होत असल्याने ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात, असे मत सामाजिक कार्यकर्ते बब्बूभाई पठाण यांनी व्यक्त केले. वागदरा (गुमगाव) येथील आश्रमशाळेत आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम व पोलीस मित्र यांच्या संयुक्त सभेत पठाण बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी हिंगणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक बागूल होते, तर पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतचे संघटनमंत्री इंगळे, उपसरपंच संजय फुलकर, मुख्याध्यापक एस.पी. महल्ले, डोंगरगावचे सरपंच प्रमोद फुलकर, अरविंद वाळके, पत्रकार संजय खडतकर आदी उपस्थित होते. समस्या कितीही मोठी असली तरी ती एकमेकांच्या सहकार्याने सुटल्याशिवाय राहात नाही. नागरिकांनी पोलिसांना आपले मित्र समजून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार अशोक बागूल यांनी केले. यावेळी अलीम महाजन, संजय खडतकर, राजेंद्र सांभारे, नामदेव आमनेरकर, अरविंद वाळके, यादव आंबेकर, संदीप लोणारे, विजय वैद्य, मधुकर माहुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक व संचालन अशोक ढोमणे यांनी केले. नंदकिशोर सोमकुंवर यांनी आभार मानले.
यावेळी जमादार शेंडे काका, शिपाई बनसोड, अशोक भगत, प्रेमदास मानकर, राहुल माहुरे आदी उपस्थित होते.

साखरखेर्डात ग्रामीण रुग्णालयाला मान्यता
बुलढाणा, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

साखरखेर्डा येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ग्रामीण रुग्णालयाची जागा व इमारतीचे बांधकाम याबाबत लवकरच शासन स्तरावरून कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाने सिंदखेडराजा तालुक्यातील ३० खाटांचे रुग्णालय होणार आहे.
येथे सध्या प्रश्नथमिक आरोग्य केंद्र आहे. साखरखेर्डा हे ठिकाण सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणापासून ७ कि.मी. पेक्षा अधिक अंतरावर असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने साखरखेर्डा येथे विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी काढला पीक विमा
आर्णी, ११ ऑक्टोबर / वार्ताहर

तालुक्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी २४ लाख रुपयांचा पीक विमा भरला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेअंतर्गत येणाऱ्या २ हजार ३८ शेतकरी सभासदांनी १२ लाख ६८ हजारांचा विमा उतरवला आहे. तालुक्यातील सावळी शाखेत ३६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४८ हजार, तळणी शाखेत २१५ शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार, जवळा बँकेत १२६५ शेतकरी सभासदांनी ७ लाख २ हजार तसेच लोणी बँकेत १२३ शेतकऱ्यांनी २९ हजार रुपयांचा पीक विमा भरल्याची माहिती बँक सूत्रांनी दिली. तालुक्यातील आर्णी, जवळा, सावळी, तळणी येथील मध्यवर्ती सहकारी बँकेत हा पीक विमा भरण्यात आला असून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी आदी पिकांचा त्यात समावेश आहे. दारव्हा तालुक्यात १४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी ८८ लाख ६८ हजारांचा, दिग्रस तालुक्यात १ हजार ६८८ शेतकऱ्यांनी १० लाख ६० हजार, नेर तालुक्यात १ हजार ९१९ शेतकऱ्यांनी १० लाख ५८ हजार रुपयांचा विमा भरला आहे. दारव्हा उपविभागात येणाऱ्या एकूण आर्णी, दारव्हा, नेर, दिग्रस या चार तालुक्यातून २२ हजार ४४७ शेतकऱ्यांची १ कोटी ३४ लाख रुपयांचा पीक विमा भरला आहे.

सरदार पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
चंद्रपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत झळकलेल्या सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सत्कार नुकताच येथे करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मार्च २००८ मध्ये झालेल्या परीक्षांची गुणवत्ता यादी नुकतीच विद्यापीठाने घोषित केली असून वाणिज्य शाखेतील बी.कॉम. अंत्य या परीक्षेत सरदार पटेल महाविद्यालयातील गगनदीप कौर इंद्रजीतसिंग सलुजा हिने गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच कवलदीपकौर रगबीरसंग सलुजा हिने गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकाविला आहे. महाविद्यालयातून एकाच वेळी बी. कॉम.मध्ये प्रथमच दोन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी या विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या यशाचे श्रेय त्यांनी मुख्यत: वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राजेश इंगोले, डॉ. मोहरीर, डॉ. सोमलकर, प्रश्न. मेश्राम, प्रश्न. सावलीकर व इतर प्रश्नध्यापकांना व आई-वडिलांना दिले. याप्रसंगी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

आईचे दूध बाळासाठी अमृतच- डॉ. सुवर्णा हुबेकर
भंडारा, ११ ऑगस्ट / वार्ताहर

लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य पुष्पा गिऱ्हेपुंजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. श्वेता नंदेश्वर, आशा रंगारी उपस्थित होत्या. नवजात शिशूसाठी स्तनपानाचे महत्त्व विशद करताना डॉ. सुवर्णा हुबेकर म्हणाल्या, बाळाच्या जन्मानंतर लगेचच एक तासाच्या आत त्याला आईचे दूध दिले पाहिजे कारण, सुरुवातीचे जे चीक दूध असते त्यातील कोलोस्ट्रममध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचे सामथ्र्य असते. त्यामुळे नवजात शिशूसाठी स्तनपान म्हणजे पहिली लस आहे. ज्या माता बाळांना बॉटलने दूध न पाजता स्तनपान करतात त्यांची बालके कुपोषित होत नाहीत. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा गिऱ्हेपुंजे म्हणाल्या, परिचारिकांनी गर्भवती महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे. परिचारिका सुरेखा दहेकर यांनी संचालन केले.

वणीत संशयित रुग्ण
वणी, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथून जवळ असणाऱ्या वांजरी या गावातील तरुण पुण्याला गेला होता. पुण्याहून वांजरी येथे परत आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला, ताप आला आणि घशाच्या दुखण्यामुळे तो बेजार झाला. सोमवारी दुपारी तो उपचारार्थ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. मात्र, येथून त्यास यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. यवतमाळ येथे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. तेथील तपासणी अहवालानंतरच हा रुग्ण स्वाईन फ्लूने बाधीत आहे की नाही, हे निश्चित होईल. स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण वणीत आढळल्यानंतर शहर व ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून वणी परिसरात तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वाईन फ्लूचा अधिकच धसका घेतला आहे.

पुण्यातील विद्यार्थी परतले; ‘मास्क’ची मागणी वाढली
चिखली, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

‘स्वाईन फ्लू’ सदृश्य एकही रुग्ण अद्याप शहर किंवा परिसरात आढळला नसला तरी त्याची दहशत मात्र सर्वत्र दिसून येत आहे. शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुणे येथे राहत असून स्वाईन फ्लूच्या धास्तीने सर्व विद्यार्थी घरी परतले आहेत. तोंडावर लावण्याचा ‘मास्क’ला अचानक मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढली असली तरी हा मास्क बाजारपेठेत उपलब्ध नाही. दीर्घकाळ वापरात येऊ शकणारा एन- ९५ मास्क उपलब्ध नसून २ फ्लाय मास्कसह नवीन उत्पादने दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत निलगिरी तेलाचे थेंब रुमालावर टाकून तो रुमाल तोंडावर बांधण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वाईन फ्लूच्या दहशतीने सरकारी व खासगी दवाखाने व औषधविक्री दुकाने गजबजली आहेत.