Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

‘स्वाइन फ्लू’च्या सावटातही ‘बिग बझार’चा शॉपिंग महाधमाका
यंदा पाच दिवसात ५५ लाख ग्राहकांच्या हजेरीचा कयास
व्यापार प्रतिनिधी: ‘स्वाइन फ्लू’च्या साथीचे सावट असले तरी ‘बिग बझार’ने आपला बहुप्रतिक्षित अशी वार्षिक राष्ट्रीय योजना ‘५ डेज महाबचत’ पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दाखल केली आहे. हा पूर्वनियोजित ‘महाबचत’ महोत्सव १६ ऑगस्ट २००९ पर्यंत देशभरातील ११६ बिग बझार स्टोअरमध्ये यथासांग राबविला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंग अनुभव व बचत देण्याच्या आपल्या प्रयत्नांचीच री पुढे ओढत बिग बझार या वर्षीचीही स्वातंत्र्य दिन वीकएंड शॉपिंगमध्ये सर्वोत्तम खरेदी आणि भव्य ऑफर्समुळे ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर बचत करण्याची संधी देत आहे. बिग बझारबरोबरच महाबचत ऑफर ही फर्निचर बझार, होम बझार, नवरस आणि वन मोबाईल दुकानांमध्येही उपलब्ध असणार आहे. या तब्बल १ लाख ६० हजार उत्पादनांवर उपलब्ध असलेल्या अतुलनीय अशा ऑफर मिळविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या बिग बझार स्टोअर्समध्ये ५५ लाखांहूनही अधिक ग्राहक हजेरी लावणे अपेक्षित आहे.
आपल्या ग्राहकांना भव्य बचत दरवर्षी देण्याच्या आपल्या बांधीलकीला अनुसरून बिग बझारने ‘५ डेज महाबचत’ दाखल केली असून त्याद्वारे ग्राहकांना आकर्षक ऑफर आणि सवलती उपलब्ध असणार आहेत. घरातील दैनंदिन गरजांच्या अन्नधान्य व इतर अन्नपदार्थाबरोबरच कपडे, पादत्राणे, खेळणी, लगेज, स्वयंपाक घरातील वस्तू, बेड, न्हाणीघरातील वस्तू, होम डेकोर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, दर्जेदार सोन्याचे दागिने आणि इतरही उत्पादनांचा यात समावेश आहे. ‘महाबचत’मध्ये घरातील प्रत्येकासाठीच काही ना काही उपलब्ध आहे. त्यातून शॉपिंगचा एक वेगळा अनुभव तर ग्राहकांना घेता येईलच, पण त्याचबरोबर कमाल बचतीचाही आनंद सुटता येईल. या उपक्रमाबद्दल बोलताना बिग बझारच्या कॉन्सेप्ट विभागाचे अध्यक्ष सदाशिव नायक म्हणाले, ‘५ डेज महाबचत’ आता आपल्या चौथ्या वर्षात पदार्पण करत असून ही योजना भारतभरातील आमच्या लाखो ग्राहकांसाठी ‘व्हॅल्यू शॉपिंग’ संकल्पनेचाच एक भाग ठरली आहे.