Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती संच देशाला अर्पण
राज्य विजेच्या बाबतीत तीन वर्षात स्वयंपूर्ण -तटकरे
परळी वैजनाथ, १३ ऑगस्ट/वार्ताहर
२०१२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ७५० मेगाव्ॉटचे परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. वीज निर्मिती करण्याबरोबरच

 

या भागातील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून परळी व परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उर्जामंत्री सुनील तटकरे यांनी येथे दिली. त्यांच्या हस्ते नवीन २५० मेगाव्ॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला.
महानिर्मितीच्या नवीन परळी औष्णिक वीजप्रकल्प संच क्रमांक ६चा राष्ट्रार्पण, संच क्रमांक ७चे बॉयलर प्रदीपन व संच क्र. ८च्या कोनशिलेचा समारंभ उर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके, आमदार उषाताई दराडे, महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालक सुब्रत रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, प्रकल्प संचालक अरुण डवलेकर, संचालक मधुकर शेलार, निर्मिती व प्रकल्प संचालक विजयसिंह, मानव संसाधन संचालक रवींद्र चौधरी, महाव्यवस्थापक यदुराज गुजर, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रश्नरंभी श्री. तटकरे यांनी प्रकल्पात जाऊन कळ दाबून हा प्रकल्प राष्ट्रार्पण केला.
विजेची मागणी व होणारी निर्मिती यामध्ये प्रचंड तफावत आल्याने महाराष्ट्राला भारनियमन करण्याची वेळ आली. १९९५ पूर्वी विजेने स्वयंपूर्ण असणारे राज्य विजेची निर्मिती वाढू न शकल्याने मागे पडले. एन्रॉन प्रकल्प सुरू न झाल्याने विजेची तूट वाढली. मात्र आघाडी सरकारने वीजनिर्मितीकडे लक्ष देऊन विजेच्या बाबतीत राज्याला गतवैभव प्रश्नप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे सांगून सुनील तटकरे म्हणाले की, वीजनिर्मिती केंद्रांना स्वत:च्या जमिनी देणाऱ्या त्या त्या भागातील भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही समजून घेऊन त्यांचे हित जोपासण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परळी व परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. त्याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे सांगून वडगाव या गावच्या ग्रामस्थांच्या इच्छेनुसार संपूर्ण पुनर्वसन करण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचप्रमाणे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उभी करण्यासाठीचा कोटय़वधींचा निधी पुरवला जाईल, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना थेट भरतीने कंपनीच्या सेवेत सामावून घेण्यात येईल.ज्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांचे तंत्रशिक्षण झालेले नाही त्यांना प्रशिक्षण व दोन वर्षापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार वाढीव मावेजा देण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रत रथो यांनी केले. यावेळी आमदार सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृत्तनिवेदिका वासंती वर्तक यांनी केले. कार्यक्रमास निमंत्रित नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
परळी भारनियमन करण्याची ग्वाही
दरम्यान, वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळी शहराला भारनियमन मुक्त करावे, या पत्रकारांच्या मागणीवर भूमिका मांडताना उर्जामंत्र्यांनी सांगितले की, राज्याचे भारनियमन हे राज्य वीज नियामक आयोग ठरवते. त्यामुळे आयोगाकडे आग्रह धरून आपण भारनियमन मुक्त परळीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मान्यवरांची अनुपस्थिती
वीजनिर्मित कंपनीच्या आजच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, खासदार गोपीनाथ मुंडे, बीडचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री डॉ. विमलताई मुंदडा, उर्जा राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्ह्य़ातील सर्व आमदार आदी येणार असल्याचे जाहीर केले होते. तशा जाहिरातीही वृत्तपत्रात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात उर्जामंत्री सुनील तटकरे, आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार उषाताई दराडे यांच्याशिवाय कोणीही उपस्थित राहिले नाही.
दुष्काळी परिस्थिती अन् लाखोंची उधळपट्टी
संच क्र. ६ सुरू होऊन दोन वर्षे झाल्यानंतर त्याचा राष्ट्रार्पण सोहळ्याचा मुहूर्त ऐन दुष्काळात काढला. या सोहळ्याला लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ही सर्व उठाठेव केवळ निवडणुका समोर ठेवून केली असल्याचे नागरिकांत चर्चा होती. कार्यक्रमाला नागरिकांपेक्षा पोलिसच जास्त असल्याचे दिसत होते. या कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र माजी उर्जा राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार प्रश्न. सुरेश नवले यांना मात्र निमंत्रित करण्यात आले नव्हते.