Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबादमधील सर्कस बंद करण्याचे आदेश
* कोणतेही सेल न लावण्याचे मॉल्सला आदेश
* खासगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड
* सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्याबाबत लवकरच निर्णय
* पालिकेच्या रुग्णालयातही स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याचे आदेष
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
शहरात सुरू असलेली सर्कस तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी

 

आज दिले आहेत. त्याबरोबरच शहरातील कोणत्याही मॉलमध्ये ग्राहकांना आकर्षित करणारा एकही सेल लावता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्कसमध्ये बंद हवा असते, शिवाय या ठिकाणी लहान मुले मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे सर्कस काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावी. मॉलमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सेल लावू नये याची खबरदारी पालिकेने घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सिद्धार्थ उद्यानातही मुलांची मोठी गर्दी होते. आत्ताच त्यावर निर्णय घेण्यात आला नसला तरी पालिकेने त्यांच्या पातळीवर याचा निर्णय घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयाबरोबरच पालिकेनेही एक स्वतंत्र वॉर्ड या स्वाइन फ्लूसाठी तयार करावा, असे सांगण्यात आले आहे. पालिकेकडे सामग्री नाही. त्यामुळे त्यांनी ती खरेदी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.