Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नगरसेवक आजोबांसह नातू सभागृहात!
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

सर्वसाधारण सभा सुरू असताना एक सहा वर्षाच्या मुलाने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. अनेकांच्या

 

नजरा त्याच्याकडे वळल्या. आपल्या सभागृहात कोणी लहान बाळ आले आहे काय, असा प्रश्न थेट महापौरांनीही उपस्थित केला. त्यावर अर्थातच कोणी उत्तर दिले नाही. तो सहा वर्षाचा मुलगा म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक हाजी शेरखान यांचा नातू होता. मला सभागृह बघायचेच, असा हट्ट त्याने कदाचित धरला असावा. बालहट्टापुढे नमलेल्या खान यांनी सध्या स्वाइन फ्लूची साथीकडेही दुर्लक्ष केले असावे.
स्वाइन फ्लूवर चर्चा सुरू असतानाच खान यांचे सभागृहात आगमन झाले. त्यांच्या सोबत त्यांचा नातू होता. सभागृहात मुलाला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. छायाचित्रकार पुढे सरसावले. कॅमेऱ्यांचे फ्लॅश सुरू होताच सरसावलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यानेही हात उंचावून अभिवादन केले. या प्रकारामुळे सभागृहाच्या कामकाजावर व्यत्यय आला. प्रश्नरंभी महापौर विजया रहाटकर यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. ‘सभागृहात आलेल्या या लहान मुलाला ‘आपला’ रोग लागू देऊ नका’ अशी विनंती संजय सिरसाट यांनी आजोबाला केली. मात्र सर्वजण त्याच्याकडेच बघत असल्यामुळे ‘सभागृहात कोणी लहान बाळ आहे का,’ असा सूचक प्रश्न त्यांनी विचारला. महापौरांनी या प्रकाराची दखल घेतल्यामुळे शेरखान यांनी सभागृहाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.