Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गंगाखेड परिसरात मास्कचा काळाबाजार
गंगाखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

शहरासह तालुक्याच्या नागरिकांत स्वाईन फ्ल्यूमुळे भीती पसरली आहे. मात्र शहरात असा एकही

 

रुग्ण आढळलेला नाही. परिणामी नागरिकांनी घाबरू नये, असेोवाहन येथील जिल्हा उपरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर ब्याळे यांनी केले आहे.
येथील जिल्हा उपरुग्णालयात शहरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या विशेष बैठकीनंतर डॉ. ब्याळे यांनी पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यू. बी. बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. लटपटे, डॉ. श्रीमती एस. पी. चांडक आदींची उपस्थिती होती. शहरातील खासगी डॉक्टरांनी स्वाईन फ्ल्यूचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यास तात्काळ सरकारी यंत्रणेकडे पाठवावा. नागरिकांनी भीतीदायक वातावरण तयार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शहरासह तालुक्यातील नागरिकांनी काळजी मास्क वापरण्याचे ठरविले असताना व्यापारी मात्र सामाजिक भान विसरून मास्कचा काळाबाजार थाटून बसले आहेत. स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण अद्यापि परिसरात आढळलेला नाही. मात्र उपाययोजना म्हणून मास्कचा वापर करा, असे सुचविणारी सरकारी यंत्रणा मास्कचा पुरवठा करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन शहरातील काही व्याापऱ्यांनी मास्कची २० रुपये प्रति नग अशा चढय़ा दराने विक्री सुरू केली आहे.
प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.