Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेचे आज जालना येथे परितोषिक वितरण
जालना, १३ ऑगस्ट/वार्ताहर

‘लोकसत्ता’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ (२००८) या शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचा

 

जालना जिल्ह्य़ातील पारितोषिक वितरण समारंभ उद्या (दि. १४) दुपारी ३ वाजता जालना येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत होणार आहे.
नूतन जिल्हाधिकारी विलास ठाकूर त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. त्याचप्रमाणे आमदार अर्जुन खोतकर, आमदार अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आमदार कैलास गोरंटय़ाल, जालना मर्चंट सहकारी बँकेचे संचालक डॉ. संजय राख, नगर परिषद सदस्य विलास नाईक, जालना स. भु. प्रशालेचे मुख्याध्यापक एम. डी. चोले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानव विकास मिशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जालना जिल्ह्य़ातील कुंभार पिंपळगाव यथील सरस्वती भुवन विद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती चत्रभुज राऊत हिला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.
त्याचप्रमाणे जालना जिल्ह्य़ातील कुंभार पिंपळगाव, मंठा, वाटूर फाटा, जांब समर्थ, पांगरी गोसावी, तीर्थपुरी, जयपूर, गुंज बु., वायाळ पांगरी, वैघवडगाव, मूर्ती इत्यादी गावांतील २६ विद्यार्थ्यांना या पर्यावरण विषयाची संबंधित ‘कात्रण चिकटवही’ स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके मिळालेली आहेत.