Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बदनामीच्या भीतीने तरूणीची आत्महत्या
सोयगाव, १३ ऑगस्ट/वार्ताहर

नांदा तांडा येथील एका तरुणाने घरी एकटी असलेल्या तरुणीची छेडछाड केली. बदनामीच्या

 

धास्तीने विषारी औषध घेऊन तरूणीने आत्महत्या केली.
तालुक्यातील सावळतबारा सर्कलमधील नांदा तांडा हे गाव आहे. भाईदास राठोड हा शेतकरी आपल्या कुटुंबासह राहतो. निर्मला ऊर्फ पिंटी ही त्याची लहान मुलगी. काही दिवसांपूर्वी कर्तार ऊर्फ पिंटू देविसिंग चव्हाण या तरुणाने घरात निर्मला एकटी असताना तिची छेडछाड केली. ही गोष्ट तिने तिच्या वडिलांना सांगितली. गावच्या पंचायतमध्ये बसून हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले. यावेळी कर्तारकडून पुन्हा असे करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. यानंतर काही तास शांततेत गेले.
सकाळी देवा हजारी चव्हाण, विजय देवा चव्हाण यांच्यासह तिघांनी राठोड यांच्या घरी जाऊन चिठ्ठी का लिहून घेतली, अशा धमक्या दिल्या. यामुळे निर्मला भयभीत झाली. समाजात या प्रकारामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने तिने किटकनाशक औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.
याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद होताच फौजदार माणिक कंटकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तार देविसिंग चव्हाण, विजय मोहन चव्हाण व विक्रम चव्हाण यांना अटक केली. अन्य तीन आरोपी फरारी आहेत.