Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘योगेश्वरी गिरणीची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील’
अंबाजोगाई, १३ ऑगस्ट/वार्ताहर

केज मतदारसंघातील वाढत्या कापसाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने

 

प्रयत्न सुरू असून मतदारसंघात एकमेव असलेल्या योगेश्वरी सूत गिरणीची क्षमता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष रमेशराव आडसकर यांनी केले.
योगेश्वरी सूत गिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. केज तालुक्यातील योगेश्वरी सहकारी सूत गिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबा कारखान्याचे अध्यक्ष मेघराज आडसकर, लक्ष्मणराव गायकवाड, डॉ. ज्ञानोबा तांदळे, कार्यकारी संचालक एस. टी. चव्हाण, अशोक गायकवाड, संभाजी आंबाड, बाळासाहेब इंगळे, इंदरराव गोरे, प्रकाश सोळंकी, जयकुमार लोढा, दत्तात्रेय दमकोंडवार यांची तर अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे उपाध्यक्ष वसंतराव मुळे यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले, सूत गिरणीने अल्पावधीतच नेत्रदीपक कामगिरी केली असून हा प्रकल्प टप्याटप्प्याने २५ हजार चात्यापर्यंत नेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
हा टप्पा पूर्ण झाल्यावर या भागातील तरुणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून यावर्षी कापसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाल्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यापासून होणारी लूट थांबणार आहे.
वार्षिक सभेचा अहवाल आडसकर यांनी वाचन केला. सभेस केज तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सोसायटय़ाचे अध्यक्ष, कापूस उत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार वसंतराव मुळे यांनी मानले.