Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पत्रकार भवनाचे उद्या जिंतूरमध्ये उद्घाटन
जिंतूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ ऑगस्ट)

 

दुपारी १ वाजता होत आहे. याप्रसंगी कै. मरतडराव कोठेकर व कै. प्रभाकर हेलसकर स्मृती पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
जिंतूर येथे तालुका पत्रकारसंघाच्या कार्यालयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आसाराम लोमटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाषचंद्र राठी, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष धारासूरकर, नगराध्यक्षा अनुराधा जाधव, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी वनिता मोरे, तहसीलदार महेश सुधळकर, प्रभारी मुख्याधिकारी सतीश सोनी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी कै. मरतडराव कोठेकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा विकास वार्ता पुरस्कार व कै. प्रभाकर हेलसकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा शोधवार्ता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रवीण देशपांडे, प्रदीप चक्रपाणी, माणिक रासवे, नेमीनाथ जैन, ज्ञानदेव कुदळे यांचा समावेश आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष एम. ए. माजीद यांनी केले आहे.