Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

ओपीडीमध्ये २९३ रुग्णांची तपासणी
स्वाइन फ्लू बाधित दाम्पत्याचा मेडिकलमध्ये दाखल होण्यास नकार
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या नागपुरातील तीन बाधित रुग्णांपैकी पती-पत्नी असलेल्या दोन रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये दाखल होण्यास नकार दिला, तर तिसरा बाधित रुग्ण मात्र तेथे दाखल झाला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय आज मेडिकलच्या विशेष बाह्य़रुग्ण विभागात २९३ रुग्ण तपासणीसाठी आले. त्यापैकी फक्त २४ रुग्णांच्या रक्त व लाळेचे नमुने घेण्यात आले असून ते उद्या पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत. तसेच आज आणखी एका संशयित रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करून घेण्यात आले असून तेथे दाखल असलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे.

‘खबरदारीसाठी रुमालही चालेल’
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
शहरातही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मास्कची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे सध्या किमान १० लाख मास्कची गरज आहे. सामान्य व गरीब नागरिकांना मास्क वापरणे परवडत नसल्याने स्वच्छ रुमाल वापरावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी केले आहे.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीत कोराडी महाऔष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन
१९८० मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष्य
२०१२ पर्यंत राज्यात अखंडित वीज पुरवठा
१० महिन्यात विजेची स्थिती सुधारणार
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक तसेच, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अन्य मंत्री आणि खासदार व आमदारांच्या अनुपस्थितीत ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते महानिर्मितीच्या १ हजार ९८० मेगाव्ॉट कोराडी महाऔष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

तिरंग्याच्या रंगातील लक्षवेधी साहित्यही बाजारात
नागपूर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने कागदी आणि प्लास्टिकचे छोटेध्वज आणि तिरंग्याच्या रंगातील बिल्ले, स्टीकर, व्हॉलेंटिअर बॅचेस, स्टँड फ्लॅग, कॅप, ब्रेसलेट, तोरणे, बलून, दुपट्टे, कपाळावर बांधायच्या पट्टय़ा, आदी वस्तू बाजारपेठांमधून लक्ष वेधून घेत आहेत. इतवारीतील लिलाडिया अँड सन्सचे गिरीश लिलाडिया गेल्या अनेक वषार्ंपासून आकारातील कापडी राष्ट्रध्वजांच्या ठोक विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

अफवांचे पीक आणि चर्चाही!
नागपूर,१३ ऑगस्ट/ प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’ ची लागण झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, याची खात्री डॉकटरांसह सर्व संबंधित देत असतानाही मृतांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अफवांचे पीकही वाढू लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याच्या आवाहनाला काहींनी प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी अद्यापही उत्सव आणि सेल सुरुच आहेत. स्वाईन फ्लूच्या निमित्ताने झोपडपट्टीतील गरीब नागरिकांना लुबाडण्याच्या तक्रारीही येत आहेत.

लाच घेताना नोंदणी व मुद्रांक खात्याचा वरिष्ठ लिपिक जाळ्यात
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

एका उद्योजकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक खात्याच्या एका वरिष्ठ लिपिकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरुवारी सकाळी पकडले. अनिल रामकृष्ण भिवगडे (रा. प्रगती नगर ) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उद्योजक सुनील जेजानी यांच्या मालकीची ‘रेल डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ नावाची कंपनी असून रेल्वे रुळाच्या जोडणीसाठी आवश्यक असलेले कपिलग ही कंपनी तयार करते. या कंपनीने िहगणा औद्योगिक वसाहतीत एक भूखंड घेतला.

विभागीय समन्वय समितीची बैठक
बुटीबोरीजवळील उड्डाण पुलाचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण करा -मालिनी शंकर
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागपूर-वर्धा महामार्गावरील बुटीबोरी नजीकच्या उड्डाण पुलाचे काम डिसेंबर २००९ अखेपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या विकास आयुक्त मालिनी शंकर यांनी दिले.
बुधवारी आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर अमरावती विभागातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी विभागीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध कामांचा आढावा मालिनी शंकर यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त संजीवकुमार उपस्थित होते.

ट्रकच्या धडकेने मौद्यातील फूल-दुकानदार ठार
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

वेगात आलेल्या ट्रकच्या धडकेने मौद्यातील फुल दुकानदार ठार झाला. पारडीमधील कामडी सभागृहासमोर गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अनिल रमेश गायधने (रा़ शारदा चौक, मौदा) हे ठार झालेल्याचे नाव आहे. फुल दुकानदार असलेला अनिल यामाहाने (एमएच४०/एसआर/२२९८) नागपूरला येत होता. मागून वेगात आलेल्या ट्रकने (एमएच३१/सीक्यू/२५०४) त्याला धडक दिली. या अपघातात अनिल जागीच ठार झाला. अपघात झाल्याचे दिसताच ट्रक तेथेच सोडून चालक पळून गेला. कळमना पोलिसांनी तातडीने शोध घेत ट्रक चालक आरोपी गेंदलाल हंसाराम परतेकी (रा़ विजयनगर) याला अटक केली़

१५ सप्टेंबरपासून दहावी-बारावीची परीक्षा
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार पुरवणी परीक्षा १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व दीपावलीनिमित्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुटय़ा बघता सप्टेंबर महिन्यात पुरवणी परीक्षेचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधित होणार असून तोंडी व श्रेणी परीक्षा ८ ते १४ सप्टेंबर या दरम्यान घेण्यात येणार आहे. शास्त्र विषयाच्या प्रश्नत्याक्षिका या लेखी परीक्षेच्या कालावधितच होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा १५ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रश्नत्याक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ८ ते १४ सप्टेंबर या कालावधित घेण्यात येईल. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांंनी पूर्वी बसलेल्या सर्व विषयाची फक्त लेखी परीक्षा द्यावयाची आहे. अधिक माहिती विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा व महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

‘दत्ता मेघे तंत्रनिकेतनच्या रौप्य महोत्सवी वर्षात सहभागी व्हा’
नागपूर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दत्ता मेघे तंत्रनिकेतनतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दत्ता मेघे तंत्रनिकेतनचे २००९ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे व्यवस्थापन संस्थेचे प्रश्नचार्य, शिक्षक आणि देशभरातील माजी विद्यार्थ्यांची एक बैठक १९ ऑगस्टला होऊ घातली आहे. बैठक शंकरनगर चौकातील आयडब्लूडब्लूएच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आपसातील संवाद आणि स्नेह अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारच्या बैठकीची आवश्यकता असल्याचे संस्थेने पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सामील होण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन प्रश्नचार्य चरडे यांनी केले आहे.

आडका येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
नागपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

कामठी पंचायत समितींतर्गत ग्रामपंचायत आडका येथे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आमदार निधीतून ३ लाख ७३ हजार रुपयांच्या बचतभवन ते नदीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला कामठी पंचायत समितीचे सभापती रामकृष्ण वंजारी, पंचायत समिती सदस्य संजय खराबे, आडका ग्रामपंचायत सरपंच त्रिशला पाटील, उपसरपंच अमोल खोडके, सदस्य निरंजन खोडके, पद्माकर ठाकरे, कैलास चांभारे व नागरिक उपस्थित होते. संचालन उपसरपंच अमोल खोडके यांनी केले. आभार बुद्धिमान पाटील यांनी मानले.

वडगाव उच्च प्रश्नथमिक शाळेत सहा खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन
नागपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

हिंगणा तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत उच्च प्रश्नथमिक शाळा येथे सहा खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती विजय घोडमारे यांच्या हस्ते नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुमगाव जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज आष्टनकर व प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा पंचायत समितीच्या सभापती रेखा आष्टणकर, उपसभापती आतिष उमरे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर पारधी, मारोतराव हजारे, भाजपा वडगाव शाखेचे अध्यक्ष दादाराव लोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा आष्टणकर, पंचायत समिती सदस्य कविता भोयर, हिंगणा पंचायत समिती सदस्य हर्षल मेश्राम, मोहगाव सूतगिरणीचे संचालक कवडू डेरकर, माजी सरपंच पंढरी कापसे, सरपंच दीपक धाबर्डे, उपसरपंच कवडू निखाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला सुरसकर, चंदा कोरडे, अरूण कावळे, दयाराम भोंग, विजय मडावी उपस्थित होते.

अनाथ विद्यार्थी गृहातील मुलांना राख्या बांधताना विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी.
विद्यार्थिनींनी बांधल्या अनाथालयातील मुलांना राख्या

लकडगंजमधील हरीहर मंदिराजवळील अनाथ विद्यार्थीगृहातील मुलांना गोविंदराव वंजारी विधि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रश्नचार्य डॉ. स्नेहल फडणवीस व प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स इंटरनॅशनलचे आर.जी. मिश्रा, जी.एस. गांधी, दशरथ सोनटक्के उपस्थित होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास व जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा, असे आवाहन आर.जी. मिश्रा यांनी केले. जी.एस. गांधी यांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. समाजात होणारी स्त्रियांची अवहेलना, अपमान याचे रक्षण करण्यासाठी समाजातील सर्व बांधवांनी हातभार लावावा, असे आवाहन याप्रसंगी प्रश्नचार्य फडणवीस यांनी केले. याप्रसंगी विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनाथ विद्याथीगृहातील मुलांना राख्या बांधल्या. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक कृषि विभाग भंडाराचे उपअभियंता जी.के. राव व संचालन कविता दमाहे यांनी केले. पुरुषोत्तम भोयर यांनी आभार मानले.

वृक्षांना बांधल्या राख्या
नागपूर महापालिकेच्या दुर्गानगर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. याप्रसंगी नगरसेवक अशोक काटोले, मुख्याध्यापक अशोक टालाटुले उपस्थित होते. याप्रसंगी निसर्ग शाळा मंडळाचे राजहंस वंजारी यांनी आपल्या भाषणात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विषद केले. राष्ट्रीय हरित सेनेतर्फे उन्हाळय़ाच्या सुटीत विद्यार्थ्यांकडून संकलित केलेल्या बियाण्यांचे याप्रसंगी रोपण करण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षाचे पालकत्व देण्यात आले.

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार दीनानाथ पडोळे.
रामटेकेनगरात डांबरी रस्त्याचे भूमिपूजन

दक्षिण नागपूरचे आमदार दीनानाथ पडोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून रामटेकेनगर येथे डांबरी रस्त्याचे भूमिपूजन आमदार दीनानाथ पडोळे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी गजभिये, बिजवार, कडू, दिनेश तराळे, महेंद्र वासनिक, तोषी साखरकर उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू योजनेच्या माध्यमातून व खासदार विलास मुत्तेमवार यांच्या प्रयत्नाने १ हजार कोटी रुपये नागपूर शहराच्या विकासाकरता केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. यामुळे विकास कामांना गती मिळेल, असे प्रतिपादन आमदार दीनानाथ पडोळे यांनी केले. संचालन रामभाऊ कावडकर यांनी केले. राजू गायकवाड यांनी आभार मानले.

‘महावितरण’च्या पथकास धमकावल्याबद्दल डॉक्टर, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘महावितरण’च्या पथकास धमकावत कागदपत्र हिसकल्याप्रकरणी शहरातील एका डॉक्टर, वकिलासह तिघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शंकर नगरातील अक्षयलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. डॉ. योगेश पापडे यांचा अक्षयलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दवाखाना आहे. त्यांच्यासंबंधी तक्रार आल्याने ‘महावितरण’च्या शंकर नगर विभागाच्या कनिष्ठ अभियंता दीपिका विजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञांचे पथक तेथे गेले. घरगुती वापरासाठी असलेल्या मीटरमधून डॉ. योगेश पापडे दवाखान्यासाठी वीज वापरत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे कारवाई सुरू असताना डॉ. योगेश पापडे, सदावर्ते वकील व आणखी एक अशा तिघांनी कारवाईत अडथळा आणला. हातातील कागदपत्र जबरदस्तीने हिसकावून घेत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शंकर नगर विभागाच्या कनिष्ठ अभियंता दीपिका विजय शिरसाट (रा़ वैभवनगर, दिघोरी रोड) यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

परप्रश्नंतीयासह चार चोरटय़ांना अटक
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

एका परप्रश्नंतीय आरोपीसह चार अट्टल आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक करून गेल्या महिन्यात चोरीस गेलेले दागिने जप्त केले. सीताबर्डी मेनरोडवरील अर्पण ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याचे २० जूनला सकाळी उघडकीस आले होते. दुकानाचे शटर वाकवून, कुलूप तोडून चोरटय़ाने दुकानातील चांदीचे दागिने (वजन अंदाजे २२ किलो किंमत ३ लाख २० हजार रुपये) ऐवज चोरून नेल्याची तक्रार दुकान मालकाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जर्नलसिंग उर्फ राहुलसिंग जोगिंदरसिंग टाक (रा़ खंबाली, जामनगर, गुजरात), राजेन्द्रसिंग महिपालसिंग बावरी (रा़ शिवाजीनगर, नयी बस्ती, बडनेरा) व विजय तुळशीराम काळे (रा़ महावीरनगर, अमरावती) व बादशाहसिंग अजाबसिंग टाक (रा़ वडाळी, फैजलपुरा, अमरावती) या आरोपींना ५ ऑगस्टला अटक करून चोरलेली चांदी जप्त केली.

उष:काल भजनी मंडळ भजन स्पर्धेत प्रथम
नागपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट व गोरक्षण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ ऑगस्टला महिला भजन स्पर्धा झाली. स्पध्रेचा पुरस्कार वितरण समारंभ दिलरुबा वादक शुभदा पेंढारकर यांच्या हस्ते झाला. स्पध्रेतील प्रथम पुरस्कार १००१ रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक राधाबाई व गोविंदराव रिसालदार स्मृतिप्रीत्यर्थ उष:काल भजनी मंडळ, रामदासपेठ यांना देण्यात आला. द्वितीय पुरस्कार ७०१ रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक विजया व गोपाळराव गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ नारायणी भजनी मंडळ, तात्या टोपे नगर यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार ५०१ रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक श्री गोपाळ कृष्ण भजन मंडळ, साधु मंदिर, महाल यांना देण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना २०१ रुपये रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. याप्रसंगी शुभदा पेंढारकर यांनी भक्तीगीत व भजन सादर केले. संचालन निरंजन रिसालदार यांनी केले. निखिल मुंडले यांनी आभार मानले. यावेळी गोरक्षण सभेच्या उपाध्यक्ष डॉ. वासंती वैद्य उपस्थित होत्या.

उमरेडमध्ये विवाहितेची आत्महत्या
उमरेड, १३ ऑगस्ट / वार्ताहर

येथील भांडारकर लेआऊटमध्ये गुरुवारी दुपारी एका विवाहितेने घरीच गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. भारती मुकुंदराव नागपुरे (३४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. तिच्या पश्चात पती, सागर व प्रेम ही दोन मुले आहेत. दुपारी दोन वाजता मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. त्यांनी आईला आवाज दिला, परंतु दार उघडण्यात आले नाही. दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या काकांना मुलांनी बोलावले. त्यांनी खिडकीचा काच फोडून आत बघितले असता भारती घरात गळफास लावलेल्या स्थितीत दिसली. तिचे पती मुकुंदराव नागपुरे हे सिंचन विभागात नोकरीला आहेत. त्यांना व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भारतीने लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. उद्या, शुक्रवारी सिर्सी येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार
नागपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व गुणवत्ताप्रश्नप्त विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी, १६ ऑगस्टला सकाळी १० वाजता समाजाच्या सक्करदरा येथील छत्रपती शिवाजी स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष मनोहर मोहिते व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतीश चतुर्वेदी, आमदार राजेंद्र मुळक, विदर्भ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संचालक विनोद गायकवाड, सुनील लोंढे आदी मान्यवर उपस्थित राहतील. दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा तसेच विशेष क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

काव्यस्पर्धेसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन
नागपूर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयीन युवक-युवतींच्या काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महालवरील सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयातर्फे एक आंतरमहाविद्यालयीन काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बी.ए.पासून एम.फील. स्तरापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सहभागी होता येईल. तीन सर्वोत्तम काव्यरचनांना अनुक्रमे १०००, ७०० आणि ५०० रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येतील. प्रत्येक युवा कवीने स्वतंत्र स्वरूपाची व स्वरचित एक कविता डॉ. राजेंद्र नाईकवाडे, संयोजक आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धा, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय तुळशीबाग, महाल या पत्त्यावर २५ ऑगस्टपूर्वी पोहोचेल, या बेताने पाठवावी, तीन पुरस्कारांशिवाय यापैकी सर्वोत्तम ५० रचनांचा समावेश महाविद्यालयातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्फूर्ती युवहृदयाची’ या काव्यविशेषांकात करण्यात येईल.

शिवसेनेचे विदर्भात शनिवारपासून मेळावे
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने इच्छुकांची चाचपणी केल्यानंतर आता शिवसेना नेतेही मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. सेना नेते आमदार गजानन किर्तीकर येत्या शनिवारी सायंकाळी नागपुरात येणार असून चार दिवसात तब्बल दहा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. पहिला मेळावा रामटेकला १६ तारखेला सकाळी ११ वाजता, काटोलमध्ये दुपारी ३ वाजता आणि हिंगण्यात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी १७ तारखेला सकाळी ११ वाजता वर्धा, दुपारी २ वाजता हिंगणघाट आणि सायंकाळी ६ वाजता चंद्रपूरला मेळावा होणार आहे. १८ तारखेला सकाळी ११ वाजता राजुरा आणि दुपारी ४ वाजता आरमोरी येथे मेळावा होईल. त्या दिवशी किर्तीकर यांचा मुक्काम गोंदियात असून १९ तारखेला सकाळी ११ वाजता गोंदिया आणि दुपारी ३ वाजता भंडाऱ्यात मेळावा होणार आहे, असे स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस चंद्रहास राऊत यांनी कळवले आहे.

स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी साहस शिबीर
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

साहसी खेळांच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी सीएसी ऑलराऊंडर या संस्थेने येत्या शनिवारी, स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मोहगाव झिलपी येथील मैत्रबन अ‍ॅडव्हेंचर कॅम्पिंग परिसरात दिवसभरात विशेष साहस शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात प्रस्तरारोहण, व्हॅली क्रॉसिंग, रोप कोर्स, नेचर ट्रेल, इम्प्रश्नेवाईज्ड राफ्टिंगचा अनुभव शिबिरार्थीना घेता येणार असून या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अधिक माहितीसाठी अमोल खंते यांच्याशी ९३७०७७२२२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.

ट्रेलर चोरण्याचा प्रयत्नातील आरोपीस अटक
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

ट्रेलर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस कळमना पोलिसांनी अटक केली. कृष्णकुमार श्रीहरीसिंग (रा. नेताजीनगर) यांचा १८ चाकी ट्रेलर (एमएच/४३ /ई/८०७३) भारतनगर चौकात बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा करून चालक जेवण करत होता. आरोपी कालासिंग जिसमेरसिंग हरिजन (रा, बजलिया, लुधियाना) व त्याचा एक साथीदार तेथे आला. ट्रेलरच्या केबीनची काच फोडून आत शिरले व ट्रेलर सुरू करण्याचा प्रयत्न करू लागले. चालकाला हे दिसताच तो धावला आणि त्याने कालासिंगला पकडून कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले.

रविवारी ‘अलबत्या गलबत्या’
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
रंजन कला मंदिरतर्फे १६ ऑगस्टला दुपारी १.३० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या तीन अंकी बालनाटय़ाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकात आदित्य घुळघुळे, अथर्व जोशी, श्रेयस मोघे, अभिजित ढोबळे, पुष्कर गानु, तेजस देशपांडे, सचिन गिरी, शिवानी दीक्षित, कुंजिका खर्डेनवीस, साक्षी वसू, जुई गडकरी, मृण्मयी रहाळकर, सई वानकर, मनीषा देशकर, सुप्रिया निलावार आणि संजय वानकर यांच्या भूमिका आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू जोशी, व शिक्षक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय नारके उपस्थित राहणार आहेत. नाटकाची निर्मिती सचिन गिरी व किर्ती मानेगावकर यांची आहे.

दादा कोठीवान यांना आदरांजली
उषकाल थिएटर्सतर्फे ज्येष्ठ नकलाकार नारायण पांडुरंग उपाख्य दादा कोठीवान यांना १०५व्या जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांनी दादासाहेब कोठीबान यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. संस्थेचे सचिव गणेश वडोदकर यांनी प्रश्नस्ताविक केले. आभार अंजली वडोदकर यांनी मानले. यावेळी मंगेश बावसे, महेंद्र रोडे, कृष्णा रामेकर, उदय खानापूरकर, डॉ. जयंत काळे उपस्थित होते.

स्वाइन फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांचे आवाहन
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्ल्यूचा प्रसार होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन दहीहंडीच्या आयोजकांना पोलिसांनी केले आहे. स्वाइन फ्ल्यूचे देशभरात थैमान घालणे सुरू असून नागपुरातही अनेकांना त्याची लागण झाली आहे. त्याचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून गर्दी करणे नागरिकांनी टाळावे, अशी आरोग्य खात्याची सूचना आहे. दहीहंडी कार्यक्रमात नागरिकांची गर्दी होतेच. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांची बैठक अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात घेतली. स्वाइन फ्लूचा संसर्ग होऊ नये, याकरिता मास्क वापरावे व आजारी व्यक्तीने गर्दीच्या कार्यक्रमांना जाणे टाळावे आदी सूचना करण्यात आल्या. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त पुंडलिक पाटील, सहायक पोलीस आयुक्त जीवराज दाभाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सुपारे याप्रसंगी प्रश्नमुख्याने उपस्थित होते.

भगवान महावीरांवर उद्या नाटय़प्रयोग
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

तरुण सागर महाराज यांच्या प्रेरणेतून डॉ. ललित जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता अहिंसा भवनच्या परिसरात पलक कुसुमगर यांच्या दिग्दर्शनाखाली भगवान महावीरांवर नाटक सादर केले जाणार आहे. भगवान महावीर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर हे नाटक आधारलेले आहे.

तरुणाला जखमी करून लुटणारा अटकेत
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

गंगा जमनात सिगारेट घेत असलेल्या एका तरुणास लुटारूने चाकूने जखमी करून पैसे हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंगा जमनात गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
आनंद सुरेंद्रकुमार जैन (रा. जबलपूर) हा त्याच्या मित्रासह गंगा जमनाच्या रस्त्याने जात होता. एका पान टपरीसमोर तो थांबला आणि सिगारेट घेऊन निघत असताना आरोपी अमोल उर्फ भद्या विजू पवार (रा़ कुंभार मोहल्ला, मासुरकर चौक) तेथे आला. चाकूने आनंदच्या पायावर मारत त्याने पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला़ तेथून जाताना त्याने ‘मै रिजवान का भांजा हूॅ’ असे म्हटले होते. तेवढय़ा माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली़

शेजाऱ्याच्या मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. प्रताप नगराजवळील जोशी ले-आऊटमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जनाबाई कुमरे या सत्तर वर्षाच्या वृद्धा सायंकाळी घरीच होत्या. त्यांच्या शेजारी राहणारा लालू बनवारीलाल श्रीवास्तव हा त्यांच्या घराच्या आवारात खड्डा खोदत असल्याचे त्यांना दिसले. त्यास खड्डा खोदू नको, असे स्पष्ट म्हटल्याने लालू चिडला व त्याने हातातील लोखंडी पहारीने (सब्बल) जनाबाईला मारहाण केली. तिच्या डोके, हात व इतर ठिकाणी जखमा झाल्या. तिला पडोळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लालू बनवारीलाल श्रीवास्तव याला अटक केली़

प्लास्टिकच्या ध्वजविक्रीवर बंदी आणण्याची मागणी
नागपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनासाठी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकच्या आणि कागदी तिरंगा ध्वजांची विक्री होत असून त्यानंतर ते ध्वज रस्त्यावर पडलेले दिसतात. त्यामुळे सागर कल्चरल फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ यासाठी रस्त्यावर पडलेले तिरंगा ध्वज उचलण्याचे काम करणार आहेत. तसेच प्लास्टिकच्या तिरंगा ध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.