Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

‘मेक्सिको’ नव्हे ‘पुणे मॉडेल’; चित्रपटगृहे पाच दिवस बंद
पुणे, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’चा प्रश्नदुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्याच्या ‘मेक्सिको मॉडेल’ची शक्यता धुडकावून लावताना पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी यासाठी ‘पुणे मॉडेल’ राबविण्यात येत असल्याचे आज स्पष्ट केले. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी शहरातील चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्स आणखी पाच दिवस म्हणजे येत्या १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘स्वाइन फ्लू’च्या भीतीमुळे शहरातील उपाहारगृहे ओस
पुणे, १३ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी
एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी, जागेसाठी तासंतास प्रतीक्षा करावयास लावणारी शहरातील बहुतेक सर्वच हॉटेल्स ‘स्वाइन फ्लू’च्या भीतीमुळे आता ओस पडली आहेत. खवय्यांच्या आग्रहाखातर रात्री उशिरापर्यंत उघडी असणारी ही उपाहारगृहे आता दहा-साडेदहालाच बंदही होऊ लागली आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा निर्णय जाहीर करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने करताच रस्त्यावरील गर्दी तर कमी झालीच पण त्याचबरोबर उपाहारगृहामधील ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.

स्वाइन फ्लू : फक्त श्रीमंतांचाच रोग नाही
मिलिंद कांबळे

पुण्यातील नायडू रुग्णालय हे ‘स्वाइन फ्लू’चा केंद्रबिंदू. फ्लूच्या शंकेने तपासणी करून घेण्यासाठी या रुग्णालयाकडे येणाऱ्या लोकांची संख्या मात्र काल थोडी कमी झाली होती, तरीही ती लक्षणीय अशीच होती. महापालिकेची तपासणी केंद्रे शहराच्या विविध भागांत असली तरी उपनगरातील शंका असणारे रुग्णही येथे येत होते. मात्र त्यांना संबंधित केंद्रात जाण्यास सांगण्यात येत होते.

पुण्यासाठी ‘मेक्सिको पॅटर्न’
स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय -केंद्रीय आरोग्यमंत्री
पुणे, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’चा प्रश्नदुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात ‘मेक्सिको पॅटर्न’प्रमाणे उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली जात असली तरी त्याबाबत स्थानिक परिस्थितीचा योग्य विचार करून, तसेच सर्व घटकांशी विचारविनिमय करून नंतर निर्णय केला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज स्पष्ट केले. त्यासाठीची बैठक बोलवावी, असे आदेश राज्य शासनाला दिले जातील, असेही आझाद यांनी सांगितले.

विषाणूंचे हवेतील अस्तित्व काही तास ते काही दिवसांचे!
पुणे, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
स्वाइन फ्लूला कारणीभूत ठरलेल्या ‘एच१एन१’ विषाणूचा हवेत टिकून राहण्याचा काळ हवामानानुसार बदलत असून, तो दोन तासांपासून ते दोन दिवसांपर्यंतही असू शकतो, असे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

सर्वात मोठा फटका ‘एसटी’ला
पुणे, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या धास्तीने शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका एसटीला बसला असून, मुंबईसह राज्याच्या इतर भागांत जाणाऱ्या गाडय़ांमधील प्रवाशांची संख्या तब्बल ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील गाडय़ांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे व खासगी बसच्या प्रवाशांमध्येही घट झाल्याचे दिसते आहे.

‘लोकसत्ता गणेशोत्सव मंच’च्या प्रेरणेतूनच गणेशोत्सवासंबंधी विधायक भूमिका
पुणे, १३ ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सुयोग्य संस्कार करण्याची गरज असून, ‘लोकसत्ता गणेशोत्सव मंच’च्या उपक्रमांमधून ती साध्य होते, असे मत हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष व यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची कल्पना प्रथम मांडणारे श्याम मानकर यांनी आज व्यक्त केले.

‘स्वाइन फ्लू’ला सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांचा गट सक्रिय

‘स्वाइन फ्लू’पासून बचावासाठी ‘एसएमएस’वरून सूचना

‘सोशल नेटवर्किंग’ला धोके
‘सायबरविश्वा’वरही आता ‘व्हायरस’चे आक्रमण!

बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालयातील ‘स्वाइन फ्लू निदान केंद्र’ तातडीने बंद

‘महापालिकेने शेवाळेवाडी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा’

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन भोसरीत उद्यानाच्या नामकरणावरून वादंग; पेंटरला मारहाण, अभियंत्याला धक्काबुक्की?

‘गरवारे नायलॉन्स’चे कामगार पुन्हा संघर्षाच्या पावित्र्यात

सांगवी भाजी मंडईतील गाळय़ांचे भाडे कमी करण्यास आयुक्तांची मान्यता

पिंपरीत दोन दिवसांत आठ लाखांच्या सीडी जप्त

‘किलरेस्कर’च्या कॅन्टीन कामगारांना फरकासह किमान वेतन मिळणार

चिंचवड की पिंपरी मतदारसंघ; काँग्रेसमध्ये तीव्र चढाओढ

सार्वजनिक, खासगी भागीदारीचा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प
‘इको फ्रेंडली’ टाऊनशिपला पिंपरी-चिंचवड प्रश्नधिक रणाची मंजुरी

‘स्वाइन फ्लूला घाबरू नका; जाणून घ्या’

‘वर्गणी नको, मास्क वापरा’

लोणावळ्यातील गुरुकुल हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यांला स्वाइन फ्लूची लागण

जुन्नरच्या तीन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे

कोकरे यांच्या संपर्कातील पाच जणांना स्वाइन फ्लू

क्रीडा विश्वभारतीय कुस्तीसाठी हवा
व्यावसायिक दृष्टीकोन

सर्वाधिक देशांचा व सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धा वैशिष्टय़पूर्ण ठरली. मात्र स्पर्धा संयोजनाबाबत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला असता व संयोजनातील चुका टाळल्या असल्या तर ही स्पर्धा अधिक अव्वल दर्जाची झाली असती. पुण्याजवळील शिवछत्रपती क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कॅडेट विभागात प्रथमच बावीस देशांच्या सहभागामुळे स्पर्धेतील लढती रंगतदार झाल्या. बाणेर- बालेवाडी परिसरात कुस्तीचे चाहते मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे या स्पर्धेस प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला. भारतीय खेळाडूंचा निवास-भोजन व्यवस्थेमधील भेदभाव, लढतींबाबतच्या तांत्रिक चुका टाळता येणे शक्य होते. आशियाई कुस्ती महासंघाचे अध्यक्ष डॉ. चेंगक्यूई किम यांनी स्पर्धेस खेळाडू व प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुकही केले. संयोजनातल्या काही अक्षम्य त्रुटी दूर केल्या तर ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता भारताकडे आहे ही त्यांनी दिलेली प्रतिक्रिया भारताच्या कुशल संघटनकौशल्यास पावतीच आहे.

जागतिक बॅडमिंटन : काही असे काही तसे
हैदराबादमध्ये चालू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेवर स्वाइन फ्लूची छाया आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संयोजकांना धक्का बसला तो इंग्लंडचा चमू पुन्हा मायदेशी परतला. चौथ्या दिवशी ऑस्ट्रियाच्या संघाने स्वाइन फ्लूच्या भीतीने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मलेशियन प्रशिक्षकाला स्वाइन फ्लूची लागण झाली नसल्याचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे संचालक आणि भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी स्पष्ट केले. या खुलाशामुळे संयोजकांना दिलासा मिळाला आहे.

----------------------------------------------------------------------------

बालक संस्थेची रविवारची सभा रद्द
पुणे, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील बालक संस्थेची रविवार दि. १६ ऑगस्ट २००९ रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा सद्य परिस्थितीमुळे रद्द करण्यात आली आहे, असे संस्थेच्या कार्याध्यक्षांनी कळविले आहे.

ख्रिस्ती तरुण-तरुणींचे आध्यात्मिक शिबिर स्थगित
पुणे, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
शहरात स्वाइन फ्लूचा प्रश्नदुर्भाव वाढू लागल्याने तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने ख्राईस्ट चर्च येथे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेले ख्रिस्ती तरुण-तरुणींचे आध्यात्मिक शिबिर स्थगित करण्यात आले आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी हे शिबिर भरते. पुणे जिल्ह्य़ातून अनेक चर्चमधील ४००-५०० युवक-युवती या शिबिराला येत असतात. स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेव्हरंड डॉ. सी. पी. भुजबळ तसेच तरुण संघाचे अध्यक्ष सचिन गनबोटे आणि सचिव मायकेल साठे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. साथीची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर हे शिबिर घेण्यात येणार आहे.

पिंपरीत ‘स्वाइन फ्लू’चे १७ रुग्ण
पिंपरी, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या आज आणखी दोनने वाढली. त्यामुळे ही संख्या आता १५ वरून १७ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी पत्रकारांना दिली. पालिकेच्या वतीने शहरातील आठ विभागीय रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी केंद्र सुरू केली आहेत, आज एकाच दिवशी आठ रुग्णालयांमध्ये मिळून ७०३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३१०० रुग्णांमध्ये ‘फ्लू’सदृश लक्षणे आढळून आली. जवळपास २०८ रुग्ण संशयित वाटल्याने त्यांना पुण्यातील औंध तसेच नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले, असे डॉ. कुणचगी यांनी सांगितले. पालिकेच्या ज्या आठ रुग्णालयांमधून तपासणीची सुविधा आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

नांदगुडे फाउंडेशनचे स्वच्छता आभियान सुरू
पिंपरी, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

पिंपळे निलख येथील लक्ष्मीबाई नांदगुडे फांऊडेशनच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आजपासून स्वच्छता आभियान सुरू करण्यात आले. दरवर्षी हे अभियान राबविण्यात येते. यंदा त्यात ३५ वॉर्डमधील विविध बचत गटांनी सहभाग घेतला आहे. स्वच्छता मोहिमेसाठी प्रथम क्रमांकाच्या बचतगटाला दोन लाख रुपयांची रिक्षा भेट देण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्त्री-मुक्ती, एकता, मुंजाबा, समृद्धी, आदिशक्ती, राजमुद्रा, झाशीची राणी, धम्माई, अन्नपूर्णा, श्री संत, सार्थक, अजितदादा, योगेश्वर, यलम्मा, पवनामाई, प्रश्नजक्ता आदी १८ बचत गटांनी भाग घेतला आहे. चिंचवड मतदार संघात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत अनेक स्वयंसेवकही सहभागी झाले आहेत.१५ ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

चिंचवडला बॅग हिसकावून ७० हजारांची चोरी
पिंपरी, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथे आज दुपारी बँकेतून पैसे घेऊन जाणाऱ्याच्या हातातील बॅग गुरु वारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चोरून नेली. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदूलाल गुलाबदास जामगावकर (वय ४२, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जामगावकर यांनी गुरु वारी दुपारी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरील कॉसमॉस बँकेतून सत्तर हजार रु पये काढले. त्यांनी रोकड आपल्या मारु ती व्हॅनमध्ये ठेवली. त्यानंतर ते निगडी, चिंचवड व पिंपरी भाजी मंडईमध्ये गेले. मंडईमध्ये भाजी घेऊन घरी परतत होते. दरम्यान, एम्पायर इस्टेट येथे ते गाडीतून रोकड बॅगेमध्ये घेऊन घराच्या दिशेने जात होते. मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून रोकड लांबविली. चिंचवड पोलिसांचा जामगावकर यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होता. अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

नाईक तालीम मंडळाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय
पुणे, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

वस्ताद शेकचंद नाईक तालीम मंडळाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तसेच गोवर्धन मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. ‘एच१एन१’ विषाणूची साथ आटोक्यात आणण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले होते. यानुसार मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंडळाचे उपाध्यक्ष बिपीन मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मंडळाचा मंडप शिवाजी रस्त्यावरच असल्याने तेथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर होत असते. त्यामुळे मंडळातर्फे यंदाच्या वर्षी केवळ मंडपात साधी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष दीपक मिसाळ यांनी घेतल्याची माहिती उत्सवप्रमुख मयूर गांधी व सुनील मिश्रा यांनी या वेळी दिली.

‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर नेहरू भाजी मार्केट बंद
हडपसर, १३ ऑगस्ट / वार्ताहर

‘स्वाइन फ्लू’ च्या पाश्र्वभूमीवर हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट आज (१३ ऑगस्ट)पासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी व शेतकऱ्यांनी घेण्यात. त्याचप्रमाणे भाजी मार्केटच्या वतीने होणारा दहीहंडीचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. मार्केट व्यापारी मित्र मंडळ, हडपसर भाजीपाला व्यापारी संघटना व शेतकरी संघ यांनी याबाबत आज बैठक झाली. ‘स्वाइन फ्लू’ चा झपाटय़ाने होणारा संसर्ग टाळण्यासाठी मार्केट बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदच्या काळामध्ये महापालिकेच्या वतीने मार्केटची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे नगरसेवक दत्ता ससाणे यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीला नगरसेवक ससाणे यांच्यासह शेतकरी संघटनेचे माउली तुपे, माउली घुले, व्यापारी संघटनेचे अनिल काळे, बाळासाहेब भिसे, प्रमोद बडदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे आदी प्रमुख उपस्थित होते.