Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
बुंदेलखंड प्रदेशातील चित्रकूट आणि बांदा या जिल्ह्यातील ग्रामीण महिलांपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी २००२ साली ‘निरंतर’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘खबर लहरिया’ या पाक्षिकाला यंदाचा युनेस्कोचा किंग सेजाँग हा मानाचा ‘साक्षरता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ग्रामीण महिलांसाठी चालविण्यात येणारे ‘खबर लहरिया’ हे पाक्षिक नवसाक्षर महिलांतर्फे चालविण्यात येते. युनेस्कोच्या पॅरिसमधल्या मुख्यालयात डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. साहित्याची तितकीशी जाण नसलेल्या नवसाक्षर महिला तसेच कनिष्ठ वर्गातील स्त्रियांचा हे

 

पाक्षिक आता आवाज बनले आहे. बातम्यांधिष्ठित अशा या पाक्षिकाच्या दोन आवृत्त्या निघत असून बुंदेलखंडच्या आसपासच्या ४०० गावांमध्ये या पाक्षिकाचा सुमारे २५ हजार खप आहे.
‘खबर लहरिया’ ज्याचा शब्दश अर्थ हा ‘बातम्यांच्या लाटा’ असा होतो, यात नवसाक्षर महिलांना पत्रकारितेचे योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरवी माहिती गोळा करून बातम्यांचे काम त्या उत्तमरित्या निभावतात. पाक्षिकाला पुरस्कार जाहीर करताना युनेस्कोने त्यांच्या अधिकृत अहवालात म्हटले आहे की, ‘खबर लहरिया’मध्ये नवसाक्षर महिलांना पत्रकारितेचे योग्य प्रशिक्षण दिले जाते. त्या बातमीविषयक काम उत्तमरित्या करतात. त्यांच्यातील नवसाक्षरतेला वार्ताहराला आवश्यक असणाऱ्या क्षमतेत रुपांतरित करण्यासाठी विशेष कष्ट घेतले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील मोठय़ा व्यक्तींशी संवाद साधणे, माहिती गोळा करणे तसेच संपादनाची कला शिकणे याबाबत विशेष प्रशिक्षण या महिलांना दिले जाते.
हे पाक्षिक चालविणारा २० जणांचा संघ असून ते केवळ बातम्या गोळा करीत नाहीत, तर त्या बातम्यांचे संपादन करणे आणि पान लावण्याचे कामही हे सारेजण करतात. त्यांची चित्रकूटमधील कर्वी आणि बांदा येथे कार्यालये आहेत. आठ पानांच्या या पक्षिकाची किंमत दोन रुपये असून बुंदेली या स्थानिक भाषेमध्ये प्रकाशित होणाऱ्या या पाक्षिकात देशातील महिलाविषयक आणि महिलाकेंद्रित बातम्यांचा समावेश करण्यात आलेला असतो. यात कविता आणि लघुकथाही छापल्या जातात. त्याचबरोबर राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक तसेच मनोरंजन या विषयांवरील बातम्या व लेखांचाही ‘खबर लहरिया’मध्ये समावेश केला जातो.
‘निरंतर’ ही संस्था नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात लिंगसमानता तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करते. याचाच एक भाग म्हणून नवसाक्षर महिलांना योग्य ते प्रशिक्षण देत ग्रामीण महिलांसाठी ‘खबर लहरिया’ सुरू करण्यात आले आहे. या पुरस्काराअंतर्गत संस्थेला २० हजार डॉलर, रौप्य पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.                                   
प्रतिनिधी