Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

मखरांची लायब्ररी
याच महिन्यात महाराष्ट्रातील मोठा उत्सव- गणेशोत्सव साजरा होईल. त्यानिमित्ताने मनात आलेला हा विचार . बघा तुम्हाला ही कल्पना कशी वाटते? गणेशोत्सव घराघरातून तसेच सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात अनेक ठिकाणी साजरा होतो. गणेशमूर्तीची पाटावर/चौरंगावर स्थापना करून आजूबाजूने सुंदर सजावट/ आरास केली जाते. थर्माकोलची विकत आणलेली किंवा घरी केलेली मखरे यासाठी अधिक प्रमाणात वापरली जातात.गणेशोत्सव झाल्यावर ही मखरे घरातील माळ्यावर व्यवस्थितपणे ठेवली जातात. पुढच्या वर्षी खाली काढून पाहिली, तर मखर सुस्थितीत असते किंवा नसते. परंतु पुन्हा तीच सजावट करण्याचा कंटाळा येतो. काहीतरी नवीन हवे असते, म्हणून ते मखर टाकून देऊन नवीन मखर

 

आणले/केले जाते. पर्यायाने थर्माकोलचा हानिकारक कचरा वाढतो.
यावर उपाय म्हणून पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणे मखरांचीसुद्धा लायब्ररी चालवली तर? आपसातील नात्यामध्ये मित्र-मैत्रिणी किंवा आपण राहात असलेल्या सोसायटय़ा यामध्ये हे सहज करता येईल. आपण आणत असलेल्या गणेशमूर्तीचे आकारमान लक्षात घेऊन जर मखरांची अदलाबदल केली, तर दरवर्षी नाविन्य तर मिळेलच. शिवाय थर्माकोलचा उपद्रवकारक कचरा कमी होईल.
फक्त प्रत्येकाने एक मात्र नक्की करायचे की उतरवून ठेवलेले मखर काळजीपूर्वक ठेवून द्यायचे. कुठे काही लहानशी दुरुस्ती करायला हवी असेल, तर तेवढी करायची.
या लायब्ररीसाठी एक नोंदणी केंद्र हवे. त्याद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातूनही वेबसाइटद्वारे आपल्या मखराचे वर्णन- म्हणजे- रंग, उंची, सजावटीचा प्रकार- (म्हणजे कमळ, देऊळ, पालखी, सिंहासन इ.) तसेच आपला पत्ता व फोन नं. नोंदवायचा व  प्रत्येक वर्षी नवीन सजावटीचा आनंद घ्यायचा. (काही वर्षांपूर्वी मी व माझ्या मैत्रिणीने अशी अदलाबदल केली होती.)
वीणा फाटक