Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

चिकन सूप...
अनोखी जाणीव
आयुष्याच्या वाटचालीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाच्या खुणा बदलत जात असतात : अवलंबत्व, आकर्षण, समाधान (तृप्ती), चिंता, निष्ठा, दु:ख इ. परंतु हृदयातून वाहणारा प्रेमाचा स्रोत मात्र एकच असतो. कोणत्याही कठीण प्रसंगातही एकमेकांशी भावनिक संवाद साधण्याची विशेष कला मानवालाच लाभलेली आहे.
- मायकेल डॉरीस

 

s जमिनीकडे नजर लावून खाली मानेने तो चालत होता.
जेव्हा त्याने मला पाहिलं व तो बोलू लागला अन् मी त्याला निरखलं.
तो होता एक फाटका, ओबडधोबड माणूस
डोळ्यात नव्हती अजिबात तेजाची झाक.
तो म्हणाला, ‘‘बाई, मी भुकेला आहे हो.’’
बोलताना तो खूपच नम्र वाटला.
मी हळुवारपणे उद्गारले, ‘माझ्याजवळ तर पैसे नाहीयेत आता.
पण माझ्याकडे आहेत काही कुपन्स
ती देऊन मी घेते तुझ्यासाठी काही पदार्थ.’
तो बेघर माणूस व मी चालू लागलो शांतपणे
तो म्हणाला, ‘तुमचा फोन नंबर द्याल मला-
शक्य होईल तेव्हा मी पैसे परत करीन तुमचे.’
त्याच्या निस्तेज, डोळ्यांत बघत मी म्हणाले,
‘त्याची नको काळजी करूस तू.
तू पैसे फेडावेस ही नाही माझी अपेक्षा’
दुकानात पोहोचता क्षणात त्याने उचलले काही पदार्थ
एखाद्या लहान मुलासारखे
आणि दुसऱ्या काही पदार्थाची केली मागणी
मीही आनंदाने त्याला सांगितलं
अगदी हवं तेवढं घेण्यासाठी. कारण-
पूर्वी मीही केली होती काही दुष्कर्म
ज्याचा मला कधीच पडणार नाही विसर.
तो निघून गेला, पण जाता-जाता काहीतरी देऊन गेला
ज्याची फेड करणं अशक्य आहे मला.
मी काही देऊ शकते- आणि त्याने दिली मला तशी संधी.
ज्याला बघून मनात किन्तु येतो
त्याला दिलं मी प्रेम आणि माया
इतर कोणी केलं नसतं, ते मी केलं.
त्याला देऊन पोटभर अन्न.
खरंच एक उत्तम व्यक्ती बनण्याची सुसंधी मला मिळाली.
लक्तरं घातलेल्या त्या माणसाची राहीन मी कायम ऋणी.
अन्नाच्या रुपाने मला दिलं त्याने प्रेमाचं दर्शन
त्याच्यापेक्षा आहे माझी सुस्थिती, याची दिली करून जाणीव
अन्नाची मागणी करून घडवलं माझ्या हातून त्याने सत्कार्य
खरं सांगते- ‘मी’ अनेकांना दुखावलंय पूर्वी आणि
या अनोळखी माणसाने अल्पशा सहवासात
माझ्यातल्या ‘मी’ पणाला उडून जाण्याची दिली सुवर्णसंधी।।
ज्यूड रिव्होली
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com