Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

मागणी प्रचंड, पण पुरवठा मात्र नगण्य!
मुंबई-पुण्यातील परवडण्याजोग्या घरांची बाजारपेठ ८६० अब्ज रुपयांची

व्यापार प्रतिनिधी: मुंबईत सध्याच्या अत्यल्प पुरवठा असलेल्या परवडण्याजोग्या घरांसाठीच आज सर्वाधिक मागणी असून, २०११ पर्यंत या क्षेत्रात तब्बल चार लाखांहून अधिक घरांसाठी मागणी येईल. राज्य सरकारने या क्षेत्रासाठी निर्धारीत केलेल्या पाच लाख घरांचे लक्ष्याला अनुसरूनच अंदाज जागतिक प्रश्नॅपर्टी कन्सल्टन्सी संस्था ‘नाईट फ्रॅन्क’ने आपल्या ताज्या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. परवडणाऱ्या घरांवरील या संशोधन अहवालामध्ये भारतीय मध्यमवर्गाच्या (३ ते १० लाख रुपये प्रतिवर्ष उत्पन्न असलेले कुटुंब) अपेक्षांचे आणि सर्वसमावेशक विश्लेषण करण्यात आले आहे.

मॅग्ना सीटिंग आणि कृष्ण ग्रुप यांचा भारतीय बाजारपेठेत संयुक्त उपक्रम
व्यापार प्रतिनिधी: मॅग्ना इंटरनॅशनल इंकॉर्पोरेशन कंपनीचा घटक असलेली मॅग्ना सीटिंग कंपनी आणि कृष्णा ग्रुप यांच्यात आज ५० टक्के भागीदारी तत्त्वावर संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारतात पुणे क्षेत्रातील वाहन निर्मिती उद्योगाला वाहन आसने (सीटिंग सिस्टीम) व सीट यंत्रणा पुरवण्याच्या उद्देशाने हा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

जनसामान्यांच्या गुंतवणूकनिर्णयाचा कल पाहणारा ‘इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्स’
व्यापार प्रतिनिधी: जेपीमॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रश्न. लि.ने व्हॅल्यूनोटसच्या सहयोगाने भारतातील पहिल्या इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्सची घोषणा केली आहे. जे. पी. मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट- व्हॅल्यूनोटस् इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्स दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित केला जाईल. भारताच्या आर्थिक तसेच गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असलेले रिटेल, कॉर्पोरेट गुंतवणूकदार तसेच आर्थिक सल्लागारांच्या विश्वासावर आधारून हा इंडेक्स तयार केला जाईल.

वंदना शाह नॅनो कार मिळविणाऱ्या वासन मोटर्सच्या पहिल्या ग्राहक
व्यापार प्रतिनिधी: टाटा मोटर्सचे मुंबईतील अधिकृत वितरक चेंबूरस्थित वासन मोटर्सकडून बहुप्रतिक्षित ‘नॅनो कार’ मिळविण्याचा प्रथम बहुमान वंदना एच. शाह यांनी मिळविला आहे. वासन मोटर्स लि.ने आयोजित केलेल्या एका छोटेखानी समारंभात त्यांना त्यांच्या पसंतीची लुनार सिल्व्हर रंगाची नॅनो एलएक्स गाडी बहाल करण्यात आली. जुलै महिन्यापासून टाटा मोटर्सच्या पंतनगर (उत्तराखंड) येथील उत्पादन प्रकल्पातून नॅनो कारच्या डिलिव्हरीला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे मार्च २०१० पर्यंत एक लाख गाडय़ांची डिलिव्हरी दिली जाणार असून, साणंद (गुजरात) येथील नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर या प्रक्रियेला आणखी वेग येणे अपेक्षित आहे.

‘ब्ल्यू डार्ट’तर्फे ग्राहकांकरिता वेळेवर आधारित सेवा
व्यापार प्रतिनिधी: ब्ल्यू डार्ट या दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण एक्स्प्रेस एअर आणि एकात्मिक वाहतूक व वितरण कंपनीने भारतातील काही निवडक शहरांपासून व शहरांपर्यंत वेळेवर आधारित सेवा सुरू करून आणखी एक मैलाचा दगड पार केला असून एक्स्प्रेस उद्योगातील आपली आघाडी कायम राखली आहे. या वेळेवर आधारित सेवा ब्ल्यू डार्टच्या डोमेस्टिक प्रश्नयॉरिटी आणि डार्ट अ‍ॅपेक्स उत्पादनांकरिता उपलब्ध आहेत. व्यवसायांच्या परस्पर महत्त्वपूर्ण गरजांकरिता हवाई मार्गाने ही वेळेवर आधारित डिलिव्हरी सेवा डोअर-टू-डोअर सुरू करण्यात आली असून या सेवेद्वारे सकाळी १०.३० पर्यंत सर्व कागदपत्रे आणि लहान शिपमेंट्स पोहोचवली जातील. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० वाजेपर्यंत जे नियमित क्लिअरेन्सेस आणि विशेष हॅण्डलिंग होणे आवश्यक असते अशा कमर्शिअल शिपमेंट्सकरिता हवाई मार्गाने ही डोअर-टू-डोअर वेळेवर आधारित सेवा सुरू करण्यात आली आहे. वेळेचे काटेकोर बंधन असलेल्या व्यवसायांची गरज म्हणून ही सेवा सुरू केली गेली आहे.

हज यात्रेकरूंना विदेशी चलन पुरवण्याचे इंडसइंड बँकेला अधिकार
व्यापार प्रतिनिधी: भारतीय हज समितीने सौदी अरेबियातून रियाल आयात करण्याचे व त्यांचे हजला प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरूंना वितरण करण्याचे अधिकार यंदा इंडसइंड बँकेला बहाल केले आहेत. इंडसइंड बँकेने प्रथमच या अधिकारांसाठी प्रयत्न केले होते व त्यात ती यशस्वी ठरली आहे. देशातील अनेक मोठय़ा बँकांनी या अधिकारांसाठी प्रयत्न केले होते. या संबंधीच्या करारावर स्वाक्षरी करताना भारतीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद ओबाईस म्हणाले की, यंदा प्रथमच इंडसइंड बँक निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन यशस्वी ठरली आहे. बँक हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करेल याचा आम्हास विश्वास आहे. तसेच इंडसइंड बँकेच्या ट्रांझ्ॉक्शन बँकिंग विभागाचे प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष रमेश गणेशन म्हणाले की, भारतीय हज समितीच्या निवड प्रक्रियेतील पारदर्शकता व व्यावसायिकतेचा आम्ही आदर करतो. तसेच ही संधी दिल्याबद्दल हज समितीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी या उपक्रमात सहभागी होणे गौरवास्पद आहे.’’ भारताच्या सरकारी कोटय़ातून यंदा सुमारे १,१५,००० यात्रेकरू हजला प्रयाण करतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय सौदी अरेबियाच्या व्हिजिटर कोटय़ातून अन्य ५०,००० यात्रेकरू हजला प्रयाण करतील, असा अंदाज आहे. आखाती देशातील ३० चलनविनिमय केंद्रांशी इंडसइंड बँकेची भागीदारी आहे.

‘बिल्ट’ला ‘एफएससी-सीओसी’ प्रमाणपत्र
व्यापार प्रतिनिधी: तीन अब्ज अमेरिकन डॉलरचा अवंथा ग्रुपचा एक भाग असणारी आणि भारताची सर्वात मोठी कागद निर्माण करणारी कंपनी बल्लारपूर इण्डस्ट्रीज लिमिटेड (बिल्ट) ने महाराष्ट्रातील आपल्या दोन उत्पादन प्रकल्पांना ‘इंटरनॅशनल फॉरेस्ट स्टीवर्ड काऊन्सिल चेन ऑफ कस्टडी (एफएससी- सीओसी) प्रमाणन प्रश्नप्त झाल्याची घोषणा केली. हे प्रमाणन पुणे जिल्ह्य़ात भिगवान (एससीएस - सीओसी- ००२६१२) आणि गडचिरोली जिल्ह्य़ात आष्टी (एससीएस- सीओसी- ००२६१०) स्थित बिल्टच्या प्रकल्पांना प्रश्नप्त झाले आहे. फॉरेस्ट स्टीवर्डशिप काऊन्सिल एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जे जगभरच्या वनात पर्यावरणाच्या दृष्टीने उचित, सामाजिक रूपाने लाभदायक आणि आर्थिक रूपाने व्यवहार्य नियोजनाला महत्त्व देते. बिल्ट देशाची पहिली व एकमात्र कागद निर्माण कंपनी आहे. जी शुद्ध पल्पवर आधारित आहे आणि जिचे एफएससी- सीओसी प्रमाणीकरण होत आहे.

ईस्टर्न समूहाचा ‘रेडी-टू- कूक’ उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश
व्यापार प्रतिनिधी: मसाल्याच्या ब्रॅण्डस्च्या क्षेत्रातील अग्रणी ईस्टर्न समूहाने रेडी-टू-कूक खाद्यान्नाच्या उद्योगात नवीन १२ उत्पादनांसह प्रवेश घोषित केला आहे. कंपनी या नव्या व्यवसायावर रु. ३० कोटींची गुंतवणूक करीत आहे आणि त्यातून पहिल्या वर्षातच रु. १०० कोटींची उलाढाल कंपनीला अपेक्षित आहे. ईस्टर्न समूहाची ही नवीन उत्पादने सध्या हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई आणि अहमदाबादसह केरळच्या विविध भागांत प्रश्नरंभी उपलब्ध होतील. ही उत्पादने निर्यात बाजारपेठेसाठी विशेषत: आखाती देशांमध्येही पाठविली जातील. या उत्पादनासाठी कंपनीने रु. ३० कोटींच्या गुंतवणुकीतून बंगळुरूमध्ये उत्पादन प्रकल्प थाटला आहे.

हीरो होंडाची नेत्रदीपक कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: जगातील नंबर एकच्या दुचाकी उत्पादक कंपनीने (एप्रिल-जून २००९) तिमाहीत आपली सर्वोत्तम कामगिरी दर्शविली आहे. निव्वळ नफा ८३.२८ टक्के वाढून ५००.११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा २७२.८० कोटी रुपये होता. या तिमाहीत हीरो होंडाने ११,१८,९८७ दुचाकी विकल्या आहेत. एकूण उत्पन्न ३४ टक्क्यांनी वाढून रु. ३८२२.४४ कोटींवर पोहोचले आहे. हीरो होंडा बाजारहिस्सा आता ५९ टक्के झाला आहे.