Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

जनसामान्यांच्या गुंतवणूकनिर्णयाचा कल पाहणारा ‘इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्स’
व्यापार प्रतिनिधी: जेपीमॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रश्न. लि.ने व्हॅल्यूनोटसच्या सहयोगाने

 

भारतातील पहिल्या इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्सची घोषणा केली आहे. जे. पी. मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट- व्हॅल्यूनोटस् इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स इंडेक्स दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित केला जाईल. भारताच्या आर्थिक तसेच गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असलेले रिटेल, कॉर्पोरेट गुंतवणूकदार तसेच आर्थिक सल्लागारांच्या विश्वासावर आधारून हा इंडेक्स तयार केला जाईल.
या इंडेक्सची सुरुवात केली जात असल्याच्या निमित्ताने केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, आपल्या स्थानिक बाजारांकडे पाहण्याचा भारतातील आर्थिक क्षेत्राचा सध्याचा दृष्टिकोन हा सावध आशावादी असा आहे.
व्हॅल्यूनोटस् ही एक स्वतंत्र मार्केट रिसर्च कंपनी असून जे. पी. मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंटने सर्वेक्षणासाठी या कंपनीला नियुक्त केले होते. रिटेल गुंतवणूकदार (ज्यांची गुंतवणूकक्षम मालमत्ता २००,००० भारतीय रुपयांपेक्षा जास्त आहे.) कॉर्पोरेट गुंतवणूकदार, आर्थिक सल्लागार यांची विनाक्रम नमुना यादी तयार करून त्यानुसार त्यांच्या मुलाखती घेऊन हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे. दिल्ली/ एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बेंगलुरू, हैदराबाद व पुणे या आठ शहरांमध्ये जुलै २००९ मध्ये हे सर्वेक्षण केले गेले.
गुंतवणूकदार व सल्लागारांच्या मनात आर्थिक वातावरणाबद्दल कितपत विश्वास आहे हे निश्चित करणे हा आयसीआयचा मुख्य उद्देश आहे. भारतीय तसेच जागतिक पातळीवर आर्थिक वातावरणात होत असलेल्या सुधारणा, सर्वसामान्य गुंतवणूक वातावरण, गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व अशाच इतर अनेक महत्त्वाच्या बाबींच्या आधारे गुंतवणूक वागणूक व त्याच्याशी संबंधित भावनांचा अभ्यास करणे हा प्रयत्न या सर्वेक्षणाद्वारे केला जात आहे. याही पुढे जात आयसीआयद्वारे गुंतवणूक तसेच वितरकांच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक वर्तणूक व चौकसतेत दर तीन महिन्यांनी होत असलेल्या लघुकालीन व दीर्घकालीन बदलांचे स्वरूप निश्चित करून त्यांचे विश्लेषणही केले जाईल.
हा निर्देशांक शून्य (नकारात्मक) ते २०० (अत्यंत सकारात्मक) या दरम्यान असू शकेल. १०० निर्देशांक हा तटस्थ दृष्टिकोनाचा प्रतीक असेल.